मुदपाकखान्यामध्ये तयार जितक्या कौशल्याने पदार्थ तयार होतात, तितक्याच अदबीने आणि अलवारपणे ते वाढलेही जावे लागतात.  निरनिराळ्या प्रकारचे पदार्थ, पेय कशा प्रकारे वाढावीत, सादर करावीत याचे प्रशिक्षण फूड अँड बेव्हरेज सव्‍‌र्हिस या विषयातून मिळते. एकूणच पदार्थ सादरीकरणातले सौंदर्य जपण्याची संथाच मिळते.

पाश्चिमात्य पद्धतीची जेवणाची सामग्री, त्यातले रीतीरिवाज, मेन्यू, मद्यपेय, कॉकटेल्स याची माहिती अभ्यासक्रमाच्या पहिल्या दोन वर्षांत दिली जाते. तिसऱ्या वर्षी बँक्वेट अर्थात मेजवानीचे नियोजन कशा प्रकारे करावे यावर भर असतो. यात अगदी १० माणसांच्या समारंभापासून १,००० माणसांना सामावणाऱ्या समारंभापर्यंत सगळ्यांची तयारी कशी करावी, हे शिकायला मिळते. कशा प्रकारच्या समारंभाला कोणत्या खुच्र्याची मांडणी असावी, त्यासाठीच्या साहित्य सामग्रीची तयारी कशी करावी, किती पाहुण्यांमागे केवढे कर्मचारी असावेत, याशिवाय मोठय़ा परिषदा, प्रदर्शने याचे नियोजन कसे करावे, याचेही प्रशिक्षण दिले जाते.

Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात
Garlic Rate, Vegetable Rate, Pune, Garlic,
लसूण महागला, परराज्यातील लसणाची आवक कमी
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
Purple Cabbage Healthy Salad Recipe In Marathi
वाढलेले वजन झपाट्याने होईल कमी; नाश्त्यामध्ये करा पर्पल कॅबेज सॅलेडचा समावेश, ही घ्या सोपी रेसिपी
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
Amit Shah alleges that Ajit Pawar group is occupying the sugar factories Print politics news
आजारी साखर कारखान्यांवर अजित पवार गटाचाही कब्जा; अमित शहांच्या आरोपानंतर विरोधी नेत्यांसह सत्ताधारी गटाचीही चर्चा

फूड अँड बेव्हरेज सव्‍‌र्हिस विषयाच्या तिन्ही वर्षांच्या अभ्यासाक्रमात ग्रूमिंगला अत्यंत महत्त्व असते. स्वतचे सादरीकरण, कसे असावे? जेणेकरून भिन्न प्रकारच्या लोकांबरोबर राहणे, वागणे सुलभ होईल. जराही चिडचिड न करता समोरचा ग्राहक आपल्या अंगावर खेकसत जरी असला तरी शांत डोक्याने आणि विनम्रतेने त्याच्याशी कसे वागावे, या महत्त्वाच्या कसबाची तयारी इथे होते. हॉस्पिटॅलिटीमधले हे सर्वात महत्त्वाचे कसब आहे.

फूड अँड बेव्हरेज सव्‍‌र्हिसेसमध्ये करिअर करण्यासाठी काय गुण असावे? सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे पीपल ओरिएंटेशन असावे. लोकांशी बोलण्यात, त्यांच्याशी उत्तम संवाद साधण्यात आनंद मिळवता यायला हवा. अनेक भाषा बोलता येत असतील तर उत्तमच. पदार्थ निर्मिती विभागाप्रमाणेच इथेही प्रचंड शारीरिक कष्ट घ्यायची तयारी असावी लागते. सुरुवातीला जड ट्रे सांभाळण्याची सवय करावी लागते. पेयाने भरलेले अनेक ग्लास गर्दीतून सांभाळत कौशल्याने नेणे, जमायला हवे. अर्थात याची थोडी सवय कॉलेजमधील प्रात्यक्षिकातून होते. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जोपर्यंत समारंभातील सर्व पाहुणे जात नाहीत, तोवर तिथून जाता येत नाही. मेजवान्यांदरम्यान तर १०-१२ तास काम करणे, गृहीतच धरले जाते. याशिवाय ब्रेक-शिफ्ट नावाचा एक प्रकार असतो. ही उपाहारगृहे फक्त दुपार आणि संध्याकाळच्या जेवणासाठी चालू असतात, त्याचे कर्मचारीही शिफ्ट करतात. मधले ४ तास त्यांना मोकळे असतात. या वेळात हॉटेलच्या लॉकर रुममध्ये त्यांना झोपण्याची, विश्रांतीची सोय केली जाते.

विद्यार्थी बेव्हरेज स्पेशालिस्ट बारटेंडिंग आणि सोमेलिये (sommelier – wine service specialist) म्हणून काम करू शकतात. बारटेंडिंगमध्ये फ्लेअर बारटेंडिंग हा लोकप्रिय प्रकार आहे. हवेत बाटल्या उडवून आणि सफाईने झेलून ग्लासमध्ये पेय ओतणे, मद्याला आग लावून कॉकटेल्स बनवणे, आदी प्रकार यात केले जातात. मोठय़ा मेजवान्यांमध्ये प्रशस्त बार लावून फ्रीलान्स करता येते. सोमेलिये व्हायला वाइनचा सखोल अभ्यास करावा लागतो. आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध परीक्षा द्याव्या लागतात.

फूड अँड बेव्हरेजमध्ये स्पेशलायझेशन केल्यावर क्रूझ लाइन्स, विमान कंपन्यात नोकरी मिळू शकते. हवाई-सुंदरी किंवा केटरिंग सुपरवायझर म्हणून निवड होऊ शकते. क्लब्ज, कंपनीची अतिथीगृहे, सुविधा व्यवस्थापन कंपन्यांमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करता येते. पंधराएक वर्षांपूर्वी अचानक अनेक कॉल सेंटर्सनी हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना भक्कम पगाराच्या नोकऱ्या दिल्या. याचे कारण म्हणजे, या कंपन्यांना आयता प्रशिक्षित कर्मचारी वर्ग मिळत होता, ज्याचे इंग्रजीवर प्रभुत्व होते आणि ग्राहकांशी अदबीने बोलण्याचे कौशल्य होते. कारण हे शिक्षण हॉटेल मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमातच असते. त्यावेळी या अचानक आलेल्या नोकऱ्यांच्या लाटेमुळे सारेच आश्चर्यचकित झाले होते. आता परिस्थिती बदलली आहे. ही लाटही ओसरत आहे. पण याच गुणधर्मामुळे कोणत्याही कस्टमर इंटरफेस असलेल्या नोकरीत फूड अँड बेव्हरेजमध्ये स्पेशलायझेशन असलेले विद्यार्थी आजही काम करूच शकतात.