‘शब्दभ्रमकला’ अर्थात बोलक्या बाहुल्या म्हटल्या की रामदास पाध्ये आठवतात. त्यांची मागची पिढी यशवंत पाध्ये आणि आता पुढची पिढी सत्यजित पाध्येसुद्धा या बोलक्या बाहुल्यांचे खेळ करीत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सीए असलेला सत्यजित सध्या पूर्णवेळ शब्दभ्रमकार म्हणून काम करतो आहे. त्याच्या करिअरची ही कथा..
घरातलीच कला असल्याने लहानपणी सत्यजितलाही बोलक्या बाहुल्यांनी भुरळ घातली होती. वडिलांसोबत कार्यक्रमाला जाताना त्याचीही या बाहुल्यांशी ओळख होत होती. तो अभ्यासातही हुशार होता. दहावीला ८३ टक्के, तर बारावीला ८४ टक्के इतके घसघशीत गुण त्याने मिळवले. शब्दभ्रमकलेचा वारसा जरी मिळालेला असला तरीही आधी शिक्षण पूर्ण करायचे, मगच हवे ते करिअर निवडायचे, अशी घरातून शिकवण होती. त्यामुळे सत्यजितने पोदार महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी मिळविली. महाविद्यालयात असतानाही विद्यापीठ आणि आंतरमहाविद्यालयीन पातळीवरील विविध महोत्सवांतून त्याचा सहभाग असायचा. बोलक्या बाहुल्यांचे कार्यक्रम सुरूच होते. पदवी मिळविल्यानंतर सत्यजितने ‘सी.ए.’ करायचे ठरवले आणि दुसऱ्याच प्रयत्नात तीही पदवी मिळवली. त्याचे काकाही सी.ए. आहेत. त्यांच्या कंपनीत त्याने पहिली दोन वर्षे काम केले. पुढे ‘इंडियाज् गॉट टॅलेंट’ या कार्यक्रमात तो सहभागी झाला. ‘कौन बनेगा करोडपती’साठी साक्षात अमिताभ बच्चन यांच्याबरोबरही काम करण्याची संधी मिळाली. सलमान खानच्या ‘बिग बॉस’ कार्यक्रमातही तो होता. त्या वेळी ‘सी.ए.’चे काम/ नोकरी सांभाळून विविध ठिकाणी तो स्वत:चे बोलक्या बाहुल्यांचे कार्यक्रम करत होता. त्याच्या वडिलांनाही मदत करीत होता. पण नोकरी आणि कार्यक्रम यामध्ये त्याची खूपच ओढाताण होत होती. त्यामुळेच पूर्णवेळ शब्दभ्रमकलेकडे वळावे, असे त्याने ठरवले. पालकही याच क्षेत्रातील असल्याने सत्यजितच्या या निर्णयाचे स्वागतच झाले.
आवडीच्या क्षेत्राला पूर्णवेळ देताना मग सत्यजितने कल्पकता पणाला लावली. ‘डिजिटल पपेट’ ही नवी संकल्पना आणली आणि ते कार्यक्रमही विविध ठिकाणी केले. ‘कॉर्पोरेट’ क्षेत्रातही बोलक्या बाहुल्यांचे कार्यक्रम सुरू केले. तिथेही खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि अजूनही मिळतो आहे. रामदास पाध्येंकडे ‘अर्धवटराव’ आणि ‘आवडाबाई’ हे लोकप्रिय बाहुले होते.
नव्या पिढीला या कलेकडे आकृष्ट करून घेण्यासाठी सत्यजितने रामदासजींच्या मदतीने काही नवीन बाहुले तयार केले. यात ‘छोटूसिंह’, ‘अस्लमभाई’, ‘डॉग कॉम’ यांचा समावेश आहे. प्रामुख्याने तरुण वर्ग हा आपला प्रेक्षक आहे, असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून कार्यक्रमाची बांधणी केली. सत्यजितने आत्तापर्यंत सुमारे दोन हजार कार्यक्रम विविध ठिकाणी केले आहेत. अगदी छोटय़ातल्या छोटय़ा कार्यक्रमापासून ते अगदी ‘कॉर्पोरेट’ पातळीपर्यंतच्या कार्यक्रमांचा यात समावेश आहे. तो म्हणतो, ‘कोणत्याही कार्यक्रमाला कधीही नाही म्हणायचे नाही, अशी बाबांची शिकवण होती. ती मी तंतोतंत पाळतो. अनेकदा लहान कार्यक्रमातून आपल्याला बरेच शिकायला मिळते. पाया पक्का होतो. अनुभवातूनच आपण घडत असतो.’
वडिलांच्या नावामागे असलेल्या वलयाचा फायदा सत्यजितला नक्कीच होतो आहे, पण त्याने स्वकलेच्या आधारे शब्दभ्रमकलेत आपले स्थान निर्माण केले आहे. http://www.satyajitpadhye.com असे त्याचे स्वत:चे संकेतस्थळही आहे. सत्यजित म्हणतो, ‘सी.ए. असूनही मी हा व्यवसाय करतो याचे अनेकांना आश्चर्य वाटते. शब्दभ्रमकलाही काही सोपी नाही. यातही प्रचंड मेहनत आहे. इथे फक्त बाहुल्यांना बोलते करायचे नसते. लेखन करावे लागते, थोडेफार अभिनयाचे अंगही असणे आवश्यक असते. वर्तमानाची आणि घडामोडींची माहिती असावी लागते. परदेशात शब्दभ्रमकलेला पुरेसा सन्मान आहे. त्याचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आहेत. आपल्याकडे तुलनेत हे प्रमाण कमी आहे. भारतात राजस्थान, दिल्ली आदी ठिकाणी बोलक्या बाहुल्या/ शब्दभ्रमकलेचे कलाकार आहेत. शासनस्तरावरही या कलेला उत्तेजन देण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. परदेशात ‘बोलक्या बाहुल्या’ सहजतेने दुकानांमधून विकत मिळतात. आपल्याकडे तसे होत नाही. त्यामुळे त्या करणे किंवा कुठून तरी विकत आणणे, हेच मोठे काम असते. भविष्यात आपल्याकडेही या बोलक्या बाहुल्या सहजतेने मिळतील, त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.’’
shekhar.joshi@expressindia.com