नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटर, मानेसर, हरियाणा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्रथमेश आडविलकर itsprathamesh@gmail.com

हरियाणामधील गुरगांव जिल्ह्य़ातील मानेसर या छोटेखानी शहरात नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटर नावाची एक संशोधन संस्था आहे. एनबीआरसी या नावाने ओळखली जाणारी ही संस्था न्युरोसायन्स विषयामध्ये संशोधन करणारी एक महत्त्वाची आणि प्रगत संशोधन संस्था आहे. या संशोधन संस्थेच्या स्थापनेची चळवळ १९६४ साली सुरू झालेली होती, मात्र संस्थेने प्रत्यक्षात आकार घ्यायला १९९७ साल उजाडावे लागले. केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करणारी ही संस्था मात्र सीएसआयआरशी (वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद) संलग्न नाही.

संशोधन संस्थेविषयी 

नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटर ही न्युरोसायन्स या विषयामध्ये संशोधन करणारी भारतीय संशोधन क्षेत्रातील एक अग्रगण्य संशोधन संस्था आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर न्युरोसायन्समध्ये संशोधन करणाऱ्या प्रा. बी. के. आनंद, बलदेव सिंग, बी. के. बच्छावत यांसारख्या नामवंत संशोधकांना या क्षेत्रातील एका स्वतंत्र संशोधन संस्थेची आवश्यकता वाटू लागली. त्यामुळे या संशोधकांनी ‘AIIMS’कडे या संस्थेच्या स्थापनेसाठीचा पाठपुरावा केला. मात्र, न्युरोसायन्ससारख्या तत्कालीन निकषांनुसार ‘प्रगत’ असलेल्या विषयासाठी संशोधन संस्थेची गरज एवढय़ा गांभीर्याने शासनाने घेतली नाही. अर्थ पुरवठय़ाअभावी ही संस्था तेव्हा आकारास येऊ शकली नाही. पुढे १९७०च्या दशकात मात्र अककटरमध्ये क्लिनिकल न्युरोसायन्स सेंटर या नावाचा न्युरोसायन्समध्ये संशोधन करणारा एक छोटासा संशोधन विभाग स्थापित झाला. कालांतराने नियोजन आयोगाशी चर्चाच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतर शेवटी दि. १४ नोव्हेंबर १९९७ रोजी भारताच्या स्वातंत्र्याच्या सुवर्णवर्षांच्या निमित्ताने या संस्थेच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली. संस्था स्थापनेनंतर देशाला अर्पण करण्यात आली. नंतर मानेसरमध्ये संस्थेचे औपचारिक उद्घाटन २००३ साली तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या हस्ते करण्यात आले. नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटर ही एक स्वायत्त शासकीय संशोधन संस्था आहे.

संस्थेला स्वायत्त दर्जा असल्यामुळे ती मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या दर्जाचे शैक्षणिक केंद्रदेखील आहे. केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करणारी ही संस्था मात्र सीएसआयआरशी (वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद) संलग्न नाही. मात्र संस्था भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैवतंत्रज्ञान विभागाअंतर्गत कार्यरत असलेली एक अग्रगण्य प्रयोगशाळा निश्चितच आहे.

संशोधनातील योगदान 

एनबीआरसी ही संस्था न्युरोसायन्समध्ये मूलभूत व उपयोजित संशोधन करणारी संस्था आहे. संस्थेकडे न्युरोसायन्सच्या संशोधनातील अत्याधुनिक उपकरणे जसे की DNA Sequencing, DNA Microarray, Whole-cell Intracellular and Extracellular Physiological Recording, Magnetic Resonance Imaging (3T) उपलब्ध आहेत.

संस्था सर्व प्रकारच्या उत्तम पायाभूत सुविधांसह सुसज्ज आहे. यामध्ये अ‍ॅनिमल फॅसिलिटी, एपिलेप्सी सेंटरपासून ते न्युरो इमेजिंगसारख्या सुविधा संस्था विद्यार्थी व संशोधकांना बहाल करते. नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटर विज्ञानाच्या इतर विद्याशाखांमध्ये इंटरडिसिप्लिनरी संशोधन करणारी देशातील एक महत्त्वाची संशोधन संस्था आहे. संस्थेमध्ये जास्तीतजास्त भर उपयोजित संशोधनावरतीच दिला जातो. संस्थेचे महत्तवाचे संशोधन प्रामुख्याने सेल्युलर अ‍ॅण्ड मॉलिक्युलर न्युरोसायन्स, डेव्हलपमेंटल  न्युरोसायन्स, सिस्टम्स अ‍ॅण्ड कॉग्निटिव्ह न्युरोसायन्स, कॉम्प्युटेशनल न्युरोसायन्स आणि ब्रेन इमेजिंग या विषयांमध्ये चालते.

विद्यार्थ्यांसाठी संधी

एनबीआरसी ही भारतातील इतर संशोधन संस्थांसारखी फक्त संशोधन संस्था नाही तर विद्यापीठाच्या दर्जाचे एक स्वायत्त शैक्षणिक केंद्रही आहे. त्यामुळे या संस्थेमध्येही विद्यार्थ्यांना पदव्युत्तर, पीएचडी व पोस्ट डॉक्टरल संशोधन अभ्यासक्रम पूर्ण करता येतात. न्युरोसायन्समधील संशोधनासाठी कुशल मनुष्यबळ मिळावे व संशोधनाच्या माध्यमातून या क्षेत्राशी संबंधित असलेल्या समस्यांचे निराकरण व्हावे या उद्दिष्टाने केंद्र शासनाने संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण व संशोधनाची संधी दिलेली आहे. संस्थेचे अनेक पीएचडी पदवीधारक भारतात व परदेशातदेखील संशोधन, औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य करत आहेत. नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटर ही संस्था आजसुद्धा देशातील विविध विद्यापीठांबरोबर संलग्न होऊन अनेक शैक्षणिक व संशोधन प्रकल्प राबवत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील फकङएठ ब्रेन सायन्स इन्स्टिटय़ूट जपान, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ मेंटल हेल्थ, यूएसए, अट्रेट विद्यापीठ नेदरलँड्स,पावलोव्ह इन्स्टिटय़ूट रशिया आणि फ्रान्समधील nstitut national de la santé et de la recherche médicale (Inserm), या संस्थाशी एनबीआरसी पदव्युत्तर व पीएचडी अभ्यासक्रमासाठी संलग्न आहे. विद्यापीठांमध्ये पीएचडीचे संशोधन करणारे अनेक विद्यार्थी संशोधनाचा विशिष्ट भाग अथवा माहिती संकलन किंवा माहिती प्रक्रिया इत्यादीसारख्या बाबी पूर्ण करण्यासाठी इथे ठरावीक काळ व्यतीत करत असतात. तसेच दरवर्षी अनेक जेआरएफ व एसआरएफ विद्यार्थी इथे पीएचडीचे संशोधन करण्यासाठी प्रवेश घेतात.

संपर्क

नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटर,

राष्ट्रीय महामार्ग क्र. ८, मानेसर, गुरगांव

हरियाणा – १२२०५२

दूरध्वनी:  +९१-१२४-२८४५२००

ईमेल  – info@nbrc.ac.in

संकेतस्थळ  –  http://www.nbrc.ac.in/