तुमच्याकडे उत्तम आवाज असेल तर तुम्हाला करिअरच्या अनेक संधी आहेत. आरजे, डबिंग आर्टीस्ट, व्हॉइस ओव्हर आर्टीस्ट अशा करिअरच्या वाटांविषयी आर जे रश्मी वारंग यांनी माहिती दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
एखाद्याचं व्यक्तिमत्त्व जसं भाव खाऊन जातं तसंच एखाद्याच्या आवाजाचीही भुरळ पडते. प्रभावी आवाजाची देणगी लाभलेल्या तरुण-तरुणींसाठी आवाजातील करिअर नक्कीच प्रभावशाली ठरेल. निवेदक किंवा रेडियो जॉकी म्हणून आवाजाच्या क्षेत्रात काम करण्यासाठी चांगला आवाज, सुस्पष्ट उच्चार, अनेक भाषांचं- त्यातील लकबीचं- ज्ञान, निरीक्षणक्षमता, उत्स्फूर्तता हे गुण आवश्यक आहेत.
दिवसागाणिक या क्षेत्राभोवतीचं प्रसिद्धीचं वलय आणि पैसा वाढत आहे. म्हणूनच त्यामध्ये चांगला वाव आहे. आपल्या आवाजावर परिश्रम घेऊन या क्षेत्रात आपला आवाज ठसविण्यास खूप वाव आहे. आवाजाच्या देणगीचा कौशल्यपूर्ण उपयोग करण्याची संधी देणारं हे क्षेत्र आज बरंच विस्तारलंय. तरुणांना या क्षेत्रातली आव्हानं खुणावू लागली आहेत. वृत्तनिवेदक, जाहिरातींना आवाज देणं, कार्टुन्सना आवाज देणं, कार्यक्रमांसाठी निवेदन करणं असे असंख्य पर्याय सध्या उपलब्ध आहेत.
रेडिओ चॅनल्स, टीव्ही चॅनल्स, चित्रपट, जाहिराती यांत प्रचंड वाढ झाली आहे व त्याबरोबर आवाजातील करिअरच्या कक्षाही रुंदावत चालल्या आहेत.
या क्षेत्राला पूर्णवेळ उपजीविकेचं साधन म्हणून पाहण्यास हरकत नाही. यासाठी बऱ्याच खासगी संस्थामध्ये कोर्सेस उपलब्ध आहेत. त्याचबरोबर आकाशवाणीच्या माध्यमातून दर नऊ महिन्यांनी ऑडिशन घेण्यात येतात. आवाजाच्या क्षेत्रात काम करण्याची इच्छा असल्यास ऑडिशन देऊन आपली क्षमता पडताळावी. या ऑडिशनमध्ये यशस्वी झाल्यानंतर ‘वाणी प्रमाणपत्र कोर्स’ घेण्यात येतो. तो पूर्ण केल्यावर खासगी तसंच सरकारी एफएम चॅनल्समध्ये काम करण्यासाठी आपण पात्र ठरू शकतो. तसेच विद्यार्थ्यांसाठीही आकाशवाणीमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध आहे. त्यांच्या युवावाणी या उपक्रमाच्या माध्यमातून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील चांगला अनुभव मिळतो त्यासोबत मानधनही मिळतं. शिवाय या क्षेत्रातील बारकावे शिकण्याची संधी येथे उपलब्ध होते.
* रेडिओ
आकाशवाणीबरोबरच खासगी एफ.एम. रेडिओ चॅनल्समुळे या माध्यमाला नवचैतन्य प्राप्त झालं आहे. यातूनच रेडिओ जॉकीचा उदय झाला. रेडिओ जॉकी बनण्यासाठी आवाजावर व उच्चारावर प्रभुत्व असायलाच हवं, पण त्याबरोबरीनेच प्रसंगावधान, चांगला शब्दसंग्रह, सर्जनशीलता (क्रिएटिव्हिटी), उत्स्फूर्तता व आत्मविश्वास आदी गुण आवश्यक ठरतात. खासगी रेडिओ चॅनल्समध्ये आरजे व्हायचं तर त्यांच्याकडे आपल्या आवाजाचं सॅम्पल द्यावं लागतं. तसंच आरजे हंटमध्ये सहभागी व्हावं लागतं.
* जाहिरातीचं क्षेत्र
जाहिरातीमध्ये निवेदन तसंच जिंगल्स गाण्यासाठीही व्हॉइस कलाकारांना मागणी असते. प्रमोशनल व्हिडीओ, सेल्स प्रेझेंटेशन आदींमध्येदेखील या कलाकारांना कामाच्या संधी आहेत.
* निवेदन
संगीतरजनी, सांस्कृतिक कार्यक्रम, मान्यवरांच्या मुलाखती यांसारख्या कार्यक्रमांमध्ये निवेदकाची भूमिका महत्त्वपूर्ण असते. निवेदनासाठी चांगल्या आवाजाबरोबरीनेच शब्दावर जोर कुठे द्यायचा, कुठे विराम घ्यायचा, हे लक्षात घेणं महत्त्वाचं असतं. बोलण्याच्या लयीवर लक्ष देणंही आवश्यक असतं. उत्तम पाठांतर आणि चांगलं वाचन असावं लागतं. ध्वनिक्षेपकाच्या तंत्राने बोलण्याचा अभ्यास करणं आवश्यक ठरतं.
* अॅनिमेशन
मुलांबरोबरीनेच मोठी माणसंदेखील कार्टून्सच्या दुनियेत हरवून जातात. कार्टून पात्रांचा आवाज मन मोहून घेणारा असतो. हा आवाज देण्याचं काम व्हॉईस आर्टीस्ट करतात. आवाज देणारे कलाकार बदलले तरी त्या कार्टूनचा आवाज तोच राहतो. हे नेमकेपण टिकवण्याचं कौशल्याचं काम कलाकारांना करावं लागतं.
* डबिंग
मूळ इंग्रजी कलाकृती हिंदी व अन्य प्रादेशिक भाषांमध्ये डब करण्याची सुरुवात झाली आहे. मूळ पात्राचा आवाज, पोत, स्टाइल लक्षात घेऊन तशाच प्रकारचा आवाज, अन्य भाषांतील डबिंगमध्ये देऊ शकणाऱ्या कलाकारांना प्रचंड मागणी आहे. इंग्रजी वा अन्य परदेशी भाषांतील चित्रपट हिंदी किंवा प्रादेशिक भाषांत डब करताना चित्रपटातील अभिनेत्याला व त्याच्या भूमिकेला साजेसा आवाज देणं, हे या कलाकारांचं काम असत.
प्रायोजक
टायटल पार्टनर -अॅमिटी युनिव्हर्सिटी, मुंबई.
असोसिएशन पार्टनर – विद्यालंकार आणि एमआयटी-एडीटी युनिव्हर्सिटी, पुणे</p>
सपोर्टेड बाय पार्टनर्स – आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स
पॉवर्ड बाय पार्टनर – युक्ती, गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर एज्युकेशन अॅण्ड डेव्हलपमेंट, लक्ष्य अॅकॅडमी, विजय शेखर अकॅडमी, अरेना अॅनिमेशन, आदित्य ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स, आयडीईएमआय, मराठा मंदिर बाबासाहेब गावडे इन्स्टिटय़ूटस, रिलायन्स एज्युकेशन, सासमिरा, श्रीनिवासन्स आयआयटी अॅकॅडमी
हेल्थ पार्टनर – युअरफिटनेस्ट
संकलन – शलाका सरफरे