स्टॅनफर्ड विद्यापीठाच्या Center on Democracy, Development, and the Rule of Law (CDDRL) या केंद्राकडे उपलब्ध असलेल्या विषयामध्ये प्री डॉक्टरल व पोस्ट डॉक्टरल संशोधनासाठी विद्यार्थ्यांना पाठय़वृत्ती दिली जाते. या पाठय़वृत्ती कार्यक्रमाअंतर्गत अभ्यासक्रमासाठी प्रवेश व पाठय़वृत्तीचे विविध लाभ देण्यात येतात. या पाठय़वृत्तीसाठी पीएच.डी. चालू असलेल्या व ती पूर्ण केलेल्या अशा दोन वर्गवारीतल्या आंतरराष्ट्रीय अर्जदारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पाठय़वृत्तीविषयी –
जगद्विख्यात स्टॅनफर्ड विद्यापीठाचा परिचय सर्वाना आहेच. ‘जगातलं दुसऱ्या क्रमांकाचे विद्यापीठ’ हे बिरुद स्टॅनफर्ड विद्यापीठ अभिमानाने मिरवत आहे. हे विद्यापीठ अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील सॅन जोसेजवळील स्टॅनफर्ड शहरातील एक खासगी संशोधन विद्यापीठ आहे. स्टॅनफर्ड विद्यापीठामध्ये जवळपास प्रत्येक विषयांच्या विशिष्ट अभ्यासासाठी समर्पित अनेक अभ्यास केंद्रे आणि लघू संशोधन संस्था आहेत. ही केंद्रे आणि संस्था जशी विभागांमध्ये असतात तशीच ती एखाद्या विभागाबाहेरही असू शकतात, एखादी स्वतंत्र प्रयोगशाळा असू शकते किंवा एखादे केंद्र थेट शेकडो किलोमीटर विद्यापीठाच्या बाहेरही असू शकते. मात्र ही सर्व केंद्रे विद्यापीठाची स्वतचीच असतात. फक्त स्वतंत्रपणे कार्यरत असतात. त्यातीलच एक महत्वाचे केंद्र म्हणजे Center on Democracy, Development, and the Rule of Law (CDDRL). स्टॅनफर्ड विद्यापीठाच्या या केंद्राची स्थापना २००२ मध्ये झाली. स्थापनेपासूनच या केंद्राने लोकशाहीतील परिस्थिती, आर्थिक विकास, मानव अधिकार व कायदा या घटकांवर व्यापक संशोधन व्हावे या हेतूने जगभरातील नामवंत प्राध्यापक-शास्त्रज्ञ, धोरणकर्ते आणि कायदेपंडित यांच्या सहकार्याने स्वत:ची वाटचाल चालू ठेवलेली आहे. या संशोधनाचा फायदा जगभरातील गुणवंत विद्यार्थ्यांना व्हावा या हेतूने CDDRL केंद्राकडून संशोधनासाठी पाठय़वृत्ती चालू करण्यात आलेली आहे.
दरवर्षी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना प्री डॉक्टरल व पोस्ट डॉक्टरल अभ्यासक्रमांसाठी मोफत प्रवेश व पाठय़वृत्तीचे संपूर्ण लाभ या पाठय़वृत्ती कार्यक्रमाच्या माध्यमातून दिले जातात. यावर्षीदेखील ही पाठय़वृत्ती २०१८-१९ साली दिल्या जाणाऱ्या प्री डॉक्टरल व पोस्टडॉक्टरल अभ्यासक्रमाच्या संशोधन प्रवेशासाठी आहे. प्री डॉक्टरलसाठी अर्जदार CDDRL च्या संशोधनाशी संबंधित कोणताही विषय निवडू शकतात. तर पोस्टडॉक्टरल अभ्यासक्रमाचे विद्यार्थी Democracy, development, evaluating the efficacy of democracy promotion, rule of law या विषयांपैकी कोणत्याही एका विषयामध्ये आपले संशोधन करू शकतात. पाठय़वृत्तीच्या माध्यमातून प्री डॉक्टरल फेलोजना मासिक निधी, आरोग्य विमा व इतर लाभ तर पोस्टडॉक्टरल फेलोजना या सर्व गोष्टी त्यांचा संशोधन अनुभव लक्षात घेऊन ठरवल्या जातील. याव्यतिरिक्त पाठय़वृत्तीधारकांना सेमिस्टर्समध्ये तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प पूर्ण करता येईल, विविध आंतरराष्ट्रीय सेमिनारमध्ये सहभाग घेण्यापासून ते ठिकठिकाणच्या शिक्षण, कायदा व प्रशासन क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींशी संवाद साधता येईल. इतर सुविधांमध्ये मग स्टॅनफोर्ड कॅम्पसमध्ये केंद्रांच्या सुविधांमध्ये कार्यालय व क्यूबिकल्स यांचा समावेश आहे व पाठय़वृत्तीधारकांना स्टॅनफोर्ड लायब्ररी तसेच व्यायामशाळेमध्ये थेट प्रवेश असेल.
आवश्यक अर्हता –
ही पाठय़वृत्ती सर्व आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी खुली आहे. या पाठय़वृत्तीअंतर्गत ज्या अर्जदारांना प्री डॉक्टरल फेलोशिपला अर्ज करावयाचा आहे, त्याचा सध्या (या पाठय़वृत्तीला आवश्यक असलेल्या विषयांमध्ये) पीएच.डी. अभ्यासक्रम नामांकित विद्यापीठ किंवा संशोधन संस्थेमधून सुरू असावा व पोस्ट डॉक्टरल फेलोशिपला अर्ज करणारा अर्जदार पीएच.डी.धारक असावा. अर्जदाराची पदवी व पदव्युत्तर स्तरावर शैक्षणिक पाश्र्वभूमी अतिशय उत्तम असावी. अर्जदाराचा पदव्युत्तर अभ्यासक्रमादरम्यान केलेल्या संशोधनाचा प्रकल्प अहवाल हा एक महत्त्वाचा निकष निवडीकरिता स्टॅनफर्ड विद्यापीठाच्या प्रवेश समितीकडून ठरवलेला आहे. त्यामुळे अर्जदाराने गुणात्मक संशोधन व दर्जात्मक अहवाल या बाबींना प्राधान्यक्रम द्यावा. अर्जदाराचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. अर्जदार जीआरई परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेला असावा. तसेच अर्जदाराने त्याच्या विषयातील जीआरई परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवले असल्यास त्याच्या निवडीची शक्यता वाढेल. कोणतेही विद्यापीठ विषय जीआरई परीक्षा देणे अर्जदाराला बंधनकारक करत नाही. मात्र, अर्जदाराने टोफेल या इंग्रजीच्या परीक्षेमध्ये किमान आवश्यक गुण मिळालेले असावेत. तसेच, ही पाठय़वृत्ती पीएच.डी. सुरू असलेल्या किंवा नुकतीच पीएच.डी. झालेल्या अर्जदारांची आहे, त्यामुळे तीन वर्षांपूर्वी पीएच.डी. पूर्ण केलेले अर्जदार या पाठय़वृत्तीसाठी अपात्र आहेत.
अर्ज प्रक्रिया –
या पाठय़वृत्तीसाठी अर्जदाराने त्याचा अर्ज ऑनलाइन अर्जप्रणालीद्वारे पूर्ण करून यादीमध्ये दिलेल्या कागदपत्रांच्या सॉफ्ट प्रतींसह स्टॅनफर्ड विद्यापीठाच्या संकेतस्थळावरच जमा करायचा आहे. त्यानंतर त्या अर्जाची प्रिंट व सर्व कागदपत्रे त्याने आंतरराष्ट्रीय कुरिअर सेवेने विद्यापीठाच्या प्रवेश कार्यालयाकडे पाठवून द्यावीत. अर्जदारांनी कुरिअर दि. २५ डिसेंबर ते ५ जानेवारीदरम्यान (ख्रिसमस व हिवाळी सुट्टय़ांच्या निमित्ताने विद्यापीठ बंद असल्याने) पोहोचतील अशा तारखा टाळाव्यात. अर्जदाराने प्रिंट काढलेल्या अर्जासह त्याचे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रशस्तिपत्र, एसओपी, सीव्ही, जीआरई व टोफेल या परीक्षांचे गुण, शाळा सोडल्याचे प्रशस्तिपत्र, आतापर्यंतच्या सर्व ट्रान्सस्क्रिप्ट्सच्या प्रती, तीन बंद लिफाफ्यातील शिफारसपत्रे, संशोधनाचे कार्यानुभवाचे प्रशस्तिपत्र, पदवी/पदव्युत्तर अभ्यासक्रमादरम्यान केलेल्या संशोधनाचा प्रकल्प अहवाल, अर्जदाराच्या चालू व प्रस्तावित संशोधनाचा पाच ते दहापानी लघु प्रबंध इत्यादी गोष्टी जोडाव्यात.
निवड प्रक्रिया –
स्टॅनफर्ड विद्यापीठाच्या निवड समितीकडून या पाठय़वृत्तीसाठी आलेल्या केवळ पूर्ण अर्जाचीच तपासणी केली जाईल. अर्जदाराची शैक्षणिक व संशोधनातील गुणवत्ता लक्षात घेऊन त्यानुसार अंतिम निवड करण्यात येईल. अंतिम निवड झालेल्या अर्जदारांना मार्चमध्ये त्यांच्या निवडीबाबत कळवले जाईल.
उपयुक्त संकेतस्थळ –
http://cddrl.fsi.stanford.edu
अंतिम मुदत –
या पाठय़वृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १२ जानेवारी २०१८ आहे.
itsprathamesh@gmail.com