अ‍ॅडव्हान्स्ड मटेरियल्स अ‍ॅण्ड प्रोसेसेस रिसर्च इन्स्टिटय़ूट, भोपाळ

मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये असलेल्या या संस्थेत मटेरिअल सायन्समधील मूलभूत आणि उपयोजित संशोधन केले जाते. ही संस्था सीएसआयआरशी संलग्न आहे. 

ayurvedic experts to hold seminar on garbhavigyan event at iit bombay
आयआयटी प्रांगणात ‘गर्भविज्ञान’ धडे; उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून विरोध
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Beed Sarpanch Murder Case Prime Accused Valmik Karad Cast
अग्रलेख : कूच बिहार!
Science and technology as a tool of power
तंत्रकारण : विज्ञान – तंत्रज्ञानातून सत्तेकडे…
what is the genome india project why it matters
विश्लेषण : जिनोमइंडिया प्रकल्प भारतासाठी किती महत्त्वाचा?
Higher education , skill courses, guidelines UGC,
उच्च शिक्षणात आता कौशल्य अभ्यासक्रमांवर भर; ‘यूजीसी’कडून मार्गदर्शक सूचनांचा मसुदा प्रसिद्ध
readers feedback on loksatta editorial readers reaction on loksatta articles
लोकमानस : उत्तर निसर्गकेंद्री विकासाचे…
Kavikulaguru Kalidas Sanskrit University ,
‘या’ विद्यापीठात मिळणार कर्मकांडाचे प्रशिक्षण! उद्देश वाचून थक्क व्हाल…

संशोधन संस्थेविषयी

या संस्थेची स्थापना १९८१ मध्ये झाली. संस्थेचे त्या वेळचे नाव ‘प्रादेशिक संशोधन प्रयोगशाळा’ (Regional Research Laboratory) असे होते. सीएसआयआरशी संलग्न असल्यामुळे, संस्थेचे अधिकृतपणे कामकाज नवी दिल्ली येथून होत असे. नंतर ही संस्था भोपाळ येथे स्थलांतरित झाली. सुरुवातीच्या काळात भोपाळमध्ये एएमपीआरआय बरकततुल्ला विद्यापीठ परिसरात ही संस्था स्थित होती. यानंतर ही संस्था डिसेंबर १९८३ मध्ये सध्याच्या जागेत स्थलांतरित झाली. त्या वेळी संस्थेत फक्त १५ शास्त्रज्ञ होते. सीएसआयआरने पूर्वी स्थापन केलेल्या पाच प्रादेशिक संशोधन प्रयोगशाळांपैकी ही संस्था एक होती. मात्र २००७ साली संस्थेचे नाव बदलल्यापासून अधिकृतरीत्या ती अ‍ॅडव्हान्स्ड मटेरियल्स अ‍ॅण्ड प्रोसेसेस रिसर्च इन्स्टिटय़ूट म्हणून संबोधली जाते.

संशोधनातील योगदान 

एएमपीआरआय ही मटेरियल्स सायन्समधील संशोधन करणारी भारतातील एक महत्त्वाची संशोधन संस्था आहे. या संस्थेमध्ये मूलभूत व उपयोजित असे दोन्ही प्रकारचे संशोधन केले जाते, मात्र जास्तीत जास्त भर उपयोजित संशोधनावरतीच दिला जातो. संस्थेने अ‍ॅल्युमिनियम-ग्राफाइट, मेटल मॅट्रिक्स कम्पोझिट्स आणि नैसर्गिक फाइबर यांसारख्या विषयांवर प्रचंड संशोधन करून त्यांचे संशोधन केलेले आहे. याबरोबरच कृषी, आरोग्य, खाणकाम, साखर कारखाने, थर्मल पॉवर प्लांट मशिनरीच्या घटकांशी संबंधित समस्या, पाण्याची समस्या यांसहित मिनरल प्रोसेसिंग, एन्व्हायर्मेटल इम्पॅक्ट असेसमेंट, वॉटर रिसोर्स मॉडेलिंग इत्यादी कित्येक विषयांवर संस्थेचे संशोधन चालू आहे. जल संसाधन मॉडेलिंगवरील विविध उपक्रम, कृषी अवजारे, बेल मेटल आर्टफॅक्स व सुपारी फॅबरचा इत्यादींचा उपयोग शेती सुधारण्यासाठी केला जातो. त्यामुळे एएमपीआरआय मध्य प्रदेश राज्यातील ग्रामीण तंत्रज्ञानासाठी एक उपयुक्त संस्था म्हणून काम करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विद्यार्थ्यांसाठी संशोधनातील विविध संधी

एएमपीआरआय ही प्रामुख्याने मटेरियल्स सायन्स म्हणजे पदार्थ विज्ञान या शास्त्रामध्ये संशोधन करणारी संस्था आहे. मुळात मटेरियल्स सायन्स हा विषय भौतिकशास्त्र व रसायनशास्त्राशी संबंध असलेला विषय आहे. त्यामुळे आंतरविद्याशाखीय संशोधनाला (Interdisciplinary research) या संस्थेचे असलेले योगदान अधोरेखित होते. आजघडीलासुद्धा संस्थेमध्ये मटेरियल्स सायन्समधील लाईट वेट मटेरियल्स, नॅनो मटेरियल्स, फ्लाय अ‍ॅश व रेड मड सारख्या इंडस्ट्रियल वेस्ट इत्यादी विविध उपविषयांमध्ये संशोधन चालू आहे. भारतातील इतर संशोधन संस्थांसारखे या संस्थेमध्येही Academy of Scientific & Innovative Research (AcSIR) च्या अंतर्गत विद्यार्थ्यांना पदव्युत्तर, पीएचडी व पोस्ट डॉक्टरल संशोधन अभ्यासक्रम पूर्ण करता येतात. त्यामुळेच एएमपीआरआय फक्त संशोधन संस्था न राहता एक प्रमुख शैक्षणिक केंद्र बनून जाते. ही संस्था पीएचडी अभ्यासक्रमासाठी अनेक विद्यापीठांशी संलग्न आहे. विद्यापीठांमध्ये पीएचडीचे संशोधन करणारे अनेक विद्यार्थी संशोधनाचा विशिष्ट भाग अथवा माहिती संकलन किंवा माहिती प्रक्रिया इत्यादीसारख्या बाबी पूर्ण करण्यासाठी इथे ठरावीक काळ व्यतित करत असतात. तसेच दरवर्षी CSIR च्या परीक्षांमधून गुणवत्ताप्राप्त अनेक जेआरएफ/ एसआरएफ विद्यार्थी इथे पीएचडीचे संशोधन करण्यासाठी प्रवेश घेतात. सध्या तिथे १३ विद्यार्थी आपापल्या तज्ज्ञ संशोधक मार्गदर्शकांच्या मदतीने स्वत:चे पीएचडीचे संशोधन पूर्ण करत आहेत. या संशोधक विद्यार्थ्यांना देशविदेशातील अनेक कार्यशाळांना पाठवून त्यांचे कार्य सादर करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते.

संपर्क

अ‍ॅडव्हान्स्ड मटेरियल्स अ‍ॅण्ड प्रोसेसेस रिसर्च इन्स्टिटय़ूट (अटढफक)

हबीबगंज नाक्याजवळ, होशंगाबाद मार्ग, भोपाळ- ४६२०२६.

दूरध्वनी: +९१ ७५५- २४५७१०५.

ईमेल : helpdesk@ampri.res.in

संकेतस्थळ :- http://www.ampri.res.in/

Story img Loader