आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मूलभूत विज्ञानामध्ये संशोधन करण्याची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना या राष्ट्रीय कार्यक्रमाद्वारे फेलोशीप दिली जाते.

पात्रता –  (१) स्ट्रीम ‘एसए’ -२०१७-१८ मध्ये ११ वी सायन्ससाठी प्रवेश घेतलेले आणि ज्यांना बी. एससी.साठी २०१९-२० मध्ये प्रवेश घ्यावयाचा आहे असे विद्यार्थी.

(२) स्ट्रीम ‘एसएक्स’ – १२वी सायन्सला २०१७-१८ मध्ये प्रवेश घेतलेले आणि २०१८-१९ मध्ये बी.एस्सी. ला प्रवेश घेऊ इच्छिणारे उमेदवार.

(३) स्ट्रीम ‘एसबी’ – बी.एससी. मॅथेमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीच्या प्रथम वर्षांसाठी २०१७-१८ मध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थी.

दरवर्षी ११ मे रोजी टेक्नॉलॉजी डेच्या दिवशी आणि जुल महिन्याच्या दुसऱ्या रविवारी केव्हीपीवाय् फेलोशिपची जाहिरात वर्तमानपत्रात दिली जाते.

बी.एससी.च्या पहिल्या ते तिसऱ्या वर्षांपर्यंत दरमहा रु. ५,०००/- स्टायपेंड दिले जाते. शिवाय आकस्मिक खर्चासाठी रु. २०,०००/- दिले जातात. एम.एससी.च्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षी दरमहा स्टायपेंड रु. ७,०००/- दिले जाते. शिवाय आकस्मिक खर्चासाठी वर्षांतून एकदा रु. २८,०००/- दिले जातात.

निवड पद्धती – अ‍ॅप्टिटय़ूड टेस्टमधील गुणवत्तेनुसार उमेदवार मुलाखतीसाठी निवडले जातात. फेलोशीप मिळविण्यासाठी उमेदवार अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट आणि मुलाखत यांच्या एकूण गुणवत्तेवर आधारित निवडले जातात. डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांच्या वतीने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस, बंगलोर हा कार्यक्रम राबवीत असते. अधिक माहितीसाठी http://www.kvpy.iisc.ernet.in/ या संकेतस्थळावर संपर्क साधावा.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teen scientific incentive plan