बालसुरक्षा, त्या संबधित तक्रारी आणि सूचना यासाठी बाल अधिकार संरक्षण राष्ट्रीय आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. त्याचे कार्य खाली विशद करण्यात आले आहे.

  • मुलांसाठीच्या संरक्षण कायद्यातल्या कुठल्याही सुरक्षा उपायांची पडताळणी आणि त्याच्या फेरतपासणीसाठी आणि प्रभावी कार्यान्वयनासाठीचे उपाय सुचविणे.
  • आतंकवाद, हिंसा, दंगे, प्राकृतिक आपदा, घरेलू हिंसा, एचआयव्ही/एड्स, चोऱ्या, र्दुव्‍यवहार, यातना आणि शोषण, वेश्यावृत्ती आणि अश्लील साहित्य अशा गोष्टी ज्यामुळे मुलांचे जीवन प्रभावित होते अशा कारणांचा अभ्यास करणे व त्यावर उपाय शोधणे.
  • मुलांच्या जीवनात येणाऱ्या संकटांसंबंधित असलेल्या गोष्टींमध्ये लक्ष घालणे व संकटात सापडलेली मुले आणि परिवारापासून हरवलेली मुले वा परिवारहीन मुले आणि तुरुंगात असलेली मुले यांच्या पुर्नवसनाचे काही उपाय शोधणे.
  • समाजाच्या विभिन्न विभागांतील मुलांच्या अधिकारांचा व साक्षरतेचा प्रचार करणे आणि त्यांच्यासाठी असलेल्या या अधिकारांच्या सुरक्षा उपायांची त्यांना जाणीव करून देणे.
  • बाल सुधारगृहे, कुठलेही शैक्षणिक संस्थांवर लक्ष ठेवणे वा त्यावर लक्ष ठेवण्याची कारणे पाहणे किंवा मुलांसाठीच्या कोणत्याही राहण्याच्या ठिकाणांवर लक्ष ठेवणे जेथे मुलांना सुधारण्यासाठी किंवा संरक्षणासाठी ठेवून घेतले जाते.

तक्रार प्रणाली

official language in india article 343 for official language of the union
संविधानभान : राष्ट्रभाषा नव्हे; राजभाषा
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
PM Vidyalakshmi Scheme
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज; काय आहे ‘पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना’?
Loksatta balmaifal The fun of sharing kid moral story
बालमैफल : शेअरिंगची गंमत
readers reaction on different lokrang articles
पडसाद : हा तर बुद्धिभेद
Rahul Gandhi Devendra Fadnavis Red Book
Red Book : ‘संविधान बदलणार’ या मविआच्या नरेटिव्हला भाजपाचं प्रत्युत्तर; विधानसभेला ‘लाल पुस्तका’ची चर्चा का होतेय?
Canada has ended fast track visas for foreign students
कॅनडात शिक्षणासाठी जाणे कठीण, फास्ट ट्रॅक व्हिसावर घातली बंदी; याचा भारतीय विद्यार्थ्यांवर काय परिणाम होणार?
पुन्हा ‘३७० कलम’ राहुल गांधींना आता कायमचे अशक्य- अमित शहा यांचे काँग्रेसवर टीकास्र

आयोगाच्या मुख्य अधिकाऱ्यांमधून एक बाल हक्काच्या तक्रारींवर चौकशी करतो. आयोगाला बाल हक्कांच्या काही गंभीर तक्रारींवर स्वत: लक्ष घालून आणि त्यावर परिणाम करणाऱ्या कारणांचा शोध लावते. त्यांना बालहक्क प्राप्त करून देते.

  • संविधानाच्या ८व्या सूचीप्रमाणे तक्रारी या आयोगाकडे कोणत्याही भाषेत दिल्या जाऊ शकतात.
  • अशा तक्रारींवर कोणताही दर आकारला जाऊ नये.
  • तक्रारीच्या कारणाचे स्वरूप स्पष्ट व कारणाचे संपूर्ण स्पष्टीकरण केलेले असावे.
  • आयोग पुढील माहिती शपथपत्र गरज भासल्यास काढू शकते.
  • तक्रारी खालील पत्त्यावर पत्राद्वारे करता येऊ शकतात.

बाल अधिकार संरक्षण राष्ट्रीय आयोग ५वा मजला; चंद्रलोक बिल्डिंग, ३६, जनपथ; नवी दिल्ली-११०००१, भारत.