मी सध्या बीकॉमच्या दुसऱ्या वर्षांला शिकत आहे. मला बँकिंग क्षेत्रात करिअर करायचे आहे. त्यासाठी लघु किंवा दीर्घ मुदतीचा कोणता अभ्यासक्रम उपयुक्त ठरू शकतो?   रियाझ शेख

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ बँकिंग अ‍ॅण्ड फायनान्स या संस्थेने पुढील अभ्यासकम सुरू केले आहेत. यापैकी काही अभ्यासक्रम करून तुम्ही बँकिंग क्षेत्रात करिअर करण्यासाठी उतरू शकता.

Aditi Tatkare, Ladki Bahin Yojana, Ladki Bahin Yojana Fund, Fund Issue, Aditi Tatkare Pune,
लाडक्या बहीण योजनेसाठी इतर कोणत्याही विभागाचा निधी वळविण्यात आलेला नाही – मंत्री आदिती तटकरे
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
11 thousand 500 students passed ca final examination conducted in November 2024 Mumbai
‘सीए’ अभ्यासक्रमाच्या परीक्षेचा निकाल जाहीर, ११ हजार ५०० विद्यार्थी ‘सीए’ म्हणून पात्र
Recruitment of various posts in the State Government Service of the State Public Service Commission MPSC
एमपीएससीच्या तेवीस परीक्षांसाठी पुन्हा अर्जाची संधी, तुम्ही अर्ज केला नसेल तर…
students failed in 5th and 8th standard in maharashtra
राज्यात पाचवी, आठवीचे किती विद्यार्थी अनुत्तीर्ण?
Success Story Of Safin Hasan In Marathi
Success Story : जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेला भेट देताच मनात जागं झालं स्वप्न; यूपीएससी परीक्षेला जाताना बसला मोठा धक्का अन्…; वाचा ‘या’ आयपीएस अधिकाऱ्याची गोष्ट
Dhirubhai Ambani International School Fees
‘धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल’ची फी किती? आकडा ऐकून थक्क व्हाल! ऐश्वर्या रायची लेक, शाहरुखचा मुलगा आहे या शाळेचा विद्यार्थी
teachers Adjustment , Group Education Officer,
शिक्षकांच्या प्रतिनियुक्तीची चौकशी, जव्हारच्या प्रभारी गटशिक्षण अधिकारी यांच्या काळात समायोजन

(१) डिप्लोमा इन ट्रेझरी, इन्व्हेस्टमेंट अ‍ॅण्ड रिस्क मॅनेजमेंट

(२) डिप्लोमा इन इंटरनॅशनल बँकिंग अ‍ॅण्ड फायनान्स

(३) डिप्लोमा इन बँकिंग टेक्नॉलॉजी

(४) डिप्लोमा इन अ‍ॅडव्हान्स्ड वेल्थ मॅनजेमेंट कोर्स

(५) डिप्लोमा इन होम लोन अ‍ॅडव्हर्टायझिंग

(६) अ‍ॅडव्हान्स्ड डिप्लोमा इन अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकिंग

(७) सर्टिफिकेट एक्झामिनेशन इन कस्टमर सव्‍‌र्हिस अ‍ॅण्ड बँकिंग कोड्स अ‍ॅण्ड स्टॅडर्डस

(८) सर्टिफिकेट एक्झामिनेशन इन मायक्रोफायनान्स. संपर्क  http://iibf.org.in/

(९) पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बँकिंग हा अभ्यासक्रम आयसीआयसीआय बँक आणि मणिपाल ग्लोबल एज्युकेशन यांनी संयुक्तरीत्या सुरू केला आहे. हा एक वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम आहे. हा अभ्यासक्रम केलेल्या उमेदवारांना आयसीआयसीआय बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर्स या पदावर नियुक्ती दिली जाते.

संपर्क – http://www.icicicareers.com

मी सध्या टेलीकॉम कंपनीत नोकरीला आहे. आता मला डिजिटल मार्केटिंगच्या क्षेत्रात जायचे आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वीकृत प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची माहिती हवी आहे किंवा मी गुगल अ‍ॅडवर्ड्स आणि अनॅलिटिक्स एक्झामिनेशन देऊ ?   मयूर मोहिते

डिजिटल मार्केटिंगचे अनेक अभ्यासक्रम विविध कंपन्यांनी सुरू केले आहेत. हे अभ्यासक्रम वा प्रशिक्षणाचे महत्त्व व्यक्तिपरत्वे वेगवेगळी राहू शकतात. या अभ्यासक्रमांचा फायदा वेगवेगळ्या व्यक्ती कशा प्रकारे प्रत्यक्ष व्यवहारात करून घेतात यावरही अभ्यासक्रमांची उपयुक्तता ठरत असते. कोणताही अभ्यासक्रम केल्यावर त्याचा प्रत्यक्ष उपयोग करण्याची क्षमता आणि कौशल्य यावर सध्याच्या काळात यश मिळू शकते आणि यशोशिखरावरही जाता येते. त्यामुळे अमुक एका संस्थेचा अभ्यासक्रम हाच केवळ दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण असा शिक्कामोर्तब करता येत नाही. डिजिटल मार्केटिंग अभ्यासक्रम चालवणाऱ्या काही संस्था-

(१) एज्युप्रिस्टाइन- http://www.edupristine.com/

(२) लर्निग कॅटिलिस्ट- http://learningcatalyst.in/

(३) व्हिडिजिट मार्केटिंग- vdigitalmarketing.com

(४) स्कूल ऑफ डिजिटल मार्केटिंग-  School of Digital Marketing

(५) सॉफ्ट प्रो- डीएम टीआय- http://www.digitalmarketingtraining.co.in/

(६) डिजिटल विद्या-  http://www.digitalvidya.com/

(७) एनएमआयएमएस ग्लोबल सक्सेस स्कूल फॉर कंटय़ुनिईंग एज्युकेशन- http://distance.nmims.edu/

(८) आयआयएम बेंगलुरू या संस्थेने डिजिटल मार्केटिंग फॉर बिझिनेस ग्रोथ हा लघुमुदतीचा प्रशिक्षण सुरू केला आहे.http://www.iimb.ernet.in/eep/product/56/Digital-Marketing-for-Business-Growth   ईमेल-openpro@iimb.ernet.in

(९) भारत सरकारच्या मायक्रो, स्माल अँड मीडियम एंटरप्रायजेस मंत्रालयामार्फत डिजिटल मार्केटिंग या विषयातील दोन दिवसांचे लघु प्रशिक्षण नियमितरीत्या मुंबई व इतरत्र आयोजित केले जाते. संपर्क संकेतस्थळ- http://www.ppdcagra.in  ईमेल-  info@ppdcagra.in गुगलच्या मदतीने अनेक ऑनलाइन अभ्यासक्रमसुद्धा करता येतील; पण अशा अभ्यासक्रमांना बाजारात कितपत स्थान मिळेल याविषयी कुणी  ठामपणे सांगू शकत नाही. अविरत ज्ञान मिळवण्यासाठ ते अधिक उपयुक्त ठरतात.

मला एज्युकेशन मॅनेजमेंट या विषयात दूरशिक्षण पद्धतीने एमबीए करायचे आहे. हा अभ्यासक्रम केल्यावर कोणती संधी मिळेल? हा अभ्यासक्रम भारतातून करणे चांगले की परदेशातून करणे चांगले राहील?     –  सुहासिनी जाधव

आपल्या देशात अजूनही स्पेशलाइज्ड एमबीएला तात्काळ चांगली करिअर संधी मिळेलच याची खात्री देता येत नाही. दुर्दैवाने दूरशिक्षण पद्धतीच्या एमबीएला करिअरच्या क्षेत्रात म्हणावा तितका सन्मान मिळत नाही. एज्युकेशनल एमबीए केल्यावर तुम्हास विविध खासगी शैक्षणिक संस्था, खासगी डिम्ड युनिव्हर्सिटी, खासगी महाविद्यालये यामध्ये विविध प्रकारचे व्यवस्थापनविषयक कार्ये करण्याची संधी मिळू शकते. मात्र अशी संधी सतत शोधावी लागेल.

Story img Loader