आजचा विषय किंवा क्षेत्र म्हणजे यू आय आणि यू एक्स डिझायनर हे चित्रकलेशी थेट संबंधित नाही. मग आपण ते या लेखात का घेत आहोत असा प्रश्न नक्की पडेल. तर पारंपरिक विचारसरणीने यू आय आणि यू एक्स डिझायनर हा विषय चित्रकलेशी निगडित नाही. या विषयाचे शिक्षण देणाऱ्या संस्थांची संकेतस्थळे पाहिली तरी त्या विषयातील अभ्यासक्रमांसाठीच्या अर्हतेमध्ये चित्रकला शिक्षणाचा उल्लेख नाही. परंतु आपले हे सदर चित्रकला विषयासंबंधीच्या शिक्षणाला असलेल्या भविष्यातील संधींचा वेध घेते. त्यामुळे यू आय आणि यू एक्स डिझायनरबद्दल बोलणे आवश्यक आहे.
यू आय म्हणजे यूजर इंटरफेस. तर यू एक्स म्हणजे यूजर एक्सपीरियन्स. हा यूजर कोण? तर आपण सर्व. जेजे तंत्रज्ञान वापरतात किंवा भविष्यात वापरतील ते सगळे. आज अनेक गोष्टी संगणकीय (कॉम्प्युटराइज्ड) झाल्या आहेत. उदा. फोन, एटीएम, बिलिंग मशिन, लिफ्ट इ. या सगळ्यामागे असलेल्या यंत्रणेची आपल्याला पुसटशीही कल्पना नसते, इतके ते अदृश्यपणे चाललेले असते. संगणक वापरताना आपल्यासमोर स्क्रीन म्हणजे पडदा असतो. ती वापरून कार्य करण्याचा अनुभव म्हणजे यूजर एक्सपिरियन्स.
इंटरफेस म्हणजे काय?
आपण आपला मोबाईल फोन वापरतो, एटीएम, कम्प्युटर, टॅब सर्व काही वापरताना आपल्यासमोर जो स्क्रीन असतो, त्यावर आपण कृती करावी, याकरता अनेक कीज उपलब्ध असतात. आपण कशा कृती करू, त्याच्या अनेक शक्यता गृहीत धरून त्या स्क्रीनच्या मागे संगणक अनेक आज्ञाप्रणाली तयार ठेवत असतो. या आज्ञाप्रणाली आणि आपण यामध्ये जी स्क्रीन असते तिला काही रंगरूप असते. तिलाच यूजर इंटरफेस म्हणतात.
संगणक वापरताना त्याच्या पडद्यावर (स्क्रीन) संगणकाला आज्ञा देण्यासाठी काही कीज असतात. त्या शब्द/भाषा आणि चित्र/चिन्ह यांचा वापर करून आपल्याला दिसतात. त्या अशाअर्थी केलेल्या असतात, जेणेकरून आपल्यला जे काम संगणकाला सांगायचे आहे ते सहज जमावे. पण इथेच खरी मेख असते.
संगणकाच्या पडद्यावरील मेन्यू वापरून कशा प्रकारे काम केले जाईल, याची काही कल्पना करून ते बनवले जाते. पण यूझर त्याचप्रमाणे विचार करेल, त्याला भाषा आणि आयकॉन कळतील, त्याद्वारे संगणक कसा वापरावा या करता सुचवलेला मार्ग कळेल याची काही खात्री देता येत नाही. त्यामुळे यूजर म्हणजे आपण गोंधळतो. एटीएममध्येही हेच होते. अनेकांना पडद्यावरील मेन्यू आणि मशिनचे कीपॅड यातील नातंच समजत नाही. त्यामुळे गोंधळ होतो. अनेक ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट फोनचा वापर समजत नाही. ही दोन्ही उदाहरणे यूजर एक्सपिरियन्स आहेत. पण याच कीज आणि मेन्यू, आयकॉन्स यातला परस्परसंबंध लक्षात आल्यावर यूजर एक्सपिरियन्स आनंददायी होतो.
यामध्ये पडद्याचा रंग, तिची विभागणी, त्यावरील मेन्यू, त्यांची मांडणी, आकार, त्यामुळे करायची कृती, ती करतानाचे टप्पे, त्याला लागणारा वेळ, यातून यूजरला अपेक्षित कृती होणे, समाधान मिळणे, यूजरच्या मनात संगणकाबद्दल, त्याद्वारे सेवा प्रदान करणाऱ्या संस्थेबद्दल काही भावना तयार होणे आदी सर्व गोष्टी यूजर एक्सपिरियन्सचा भाग असतात.
सर्वसाधारणपणे या अनुभवाची हाताळणी, निर्मिती, प्रॉडक्ट डिझाइनर, जाहिराततज्ज्ञ, सॉफ्टवेअर डिझाइनर, इंटरॅक्शन डिझायनर आदींनी करावी असे मानले जायचे. पण जगातले सगळ्यात यशस्वी आणि परिणामकारक यू एक्स डिझायनर हे वरील क्षेत्रातील नाहीच मुळी. हीच तर गंमत आहे. म्हणूनच चित्रकला शिकणाऱ्या व्यक्ती हे काम करण्यात सरस ठरू शकतात. ते कसे ते पाहू.
चित्रकार चित्र रंगवतो आणि ते प्रेक्षकाने पाहावे या करता चित्रात काही योजना करत असतो. ही योजना म्हणजे आकार, रंग, रेषा यांची एक विशिष्ट मांडणी. जी एकाच वेळा चित्रकाराला मांडायचा विषयही दर्शवते. शिवाय प्रेक्षकाने चित्र कसे पाहावे, कोणत्या क्रमाने चित्राचे कोणते भाग पाहावे याची ही एक क्रमवारी तयार करते. चित्रकलेच्या शिक्षणात डिझाईन हा विषय चित्रामध्ये आकार, रंगरेषा यांची मांडणी कशी करावी याचे शिक्षण देत असतो. या मांडणीत प्रेक्षकाने चित्र ठरावीक क्रमाने पाहण्याकरता आकार, रंग, रेषा यांची मांडणी कशी करावी हे शिकणे होत असते. त्याचवेळी या मांडणीतून दृश्यपातळीवर चित्रामध्ये जो परिणाम साधता येतो, त्यामुळे भावना, विचार यांची मांडणीकरता येते हेसुद्धा समजत असते.
चित्राचा पृष्ठभाग हा येथे संगणकाच्या पडद्यासारखा काम करतो. तो चित्रकार आणि प्रेक्षक यात एका इंटरफेस प्रमाणे काम करतो. संगणकाच्या इंटरफेस मागे जशा यूजरच्या वापराच्या शक्यता गृहीत धरून अनेक आज्ञाप्रणाली तयार ठेवलेल्या असतात अगदी त्याचप्रमाणे चित्रकार चित्राच्या दृश्यभागामागे प्रेक्षकाने ते पाहण्याचा क्रम आणि प्रतिसाद हे ठरवतो. प्रेक्षकाने चित्राचा कोणता भाग सगळ्यात आधी पाहावा, नंतर कोणता पाहावा, ते पाहताना जे आकार दिसत आहेत, त्याचा कसा अर्थ लावावा, मनात कोणती भावना जागृत व्हावी हे सगळे ठरवत असतो. चित्रातील आकार रंग, रेषा या संगणकीय पडद्यावरच्या कीज, आयकॉन्सप्रमाणे काम करतात. ज्याप्रमाणे मोनालिसाच्या ओठांवरील अस्फुट स्मित जाणवते. बुद्धाच्या चेहऱ्यावरील असीम शांती आपल्यापर्यंत पोहोचते.
या सगळ्याचा अर्थ चित्रकला शिकलात की यू एक्स डिझाइन आलेच असा नव्हे. पण ते करण्यासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत घटकांचे शिक्षण इथे होते. अर्थात यू आय आणि यू एक्स डिझाइनमध्ये यासोबत संगणकाच्या आज्ञाप्रणाली, पडद्याचा दृश्यरूप आणि परिणाम अशा अनेक तांत्रिक गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या असतात. त्यासाठी त्या विषयातील अभ्यासक्रम करावे लागतात.
पर्ल इन्स्टिटय़ूट, सिम्बॉयसिस, मणिपाल, एमआयटी अशा अनेक संस्था त्यातील शिक्षण देतात. या संस्थांमध्ये एचसीआय अर्थात ह्य़ुमन कॉम्प्युटर इंटरॅक्शन डिझाइन या नावाखाली असलेले अभ्यासक्रम घ्यावेत. किंवा यूआययूएक्स असे नाव असलेले काही अभ्यासक्रम असतात. त्याचे शिक्षण घ्यावे. परंतु महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे शिक्षण घेताना एकीकडे तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर आणि कलेतील अनुभवाची रचना, मांडणी याचा तुलनात्मक विचार करत राहणे गरजेचे आहे. चित्रकलेचे शिक्षण पूर्ण झालेल्यांनी या नवीन संधींचा डोळसपणे विचार केल्यास ते नक्कीच एका नव्या करिअर विश्वाचा भाग होतील.
mahendradamle@gmail.com