यूपीएससी पेपर -१

यूपीएससीने २०११ पासून पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये बदल केलेला आहे. पूर्व परीक्षेसाठी एकूण दोन पेपर आहेत आणि प्रत्येक पेपर हा २००गुणांसाठी असून, यातील पहिल्या पेपरमध्ये १०० प्रश्न असतात आणि प्रत्येक प्रश्नाला २ गुण असतात तसेच चुकीचा पर्याय निवडल्यास पेनल्टी गुण असतात. उदाहरणार्थ एका प्रश्नासाठी ०.३३अशा पद्धतीने एकूण मिळविलेल्या गुणांमधून पेनल्टीचे गुण कापले जातात. याचबरोबर २०१५पासून यूपीएससीने पूर्व परीक्षेमध्ये परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. पेपर दोन हा क्वालिफाियग केलेला आहे (एकूण ८०प्रश्न आणि प्रत्येक प्रश्न २.५ गुणांना असतो), ज्यामध्ये उत्तीर्ण होण्यासाठी कमीत कमी एकूण मार्क्‍सपकी ३३% गुण प्राप्त करणे अनिवार्य आहे. या पेपरमध्येही चुकीचा पर्याय निवडल्यास एका प्रश्नासाठी ०.३३अशा पद्धतीने एकूण मिळविलेल्या गुणांमधून पेनल्टी गुण कापले जातात. तसेच या पेपरचे गुण गुणवत्ता यादी ठरविण्यासाठी ग्राह्य धरले जात नाहीत. पहिल्या पेपरमधील प्राप्त केलेल्या गुणांवरून अंतिम गुणवत्ता यादी ठरवली जाते.

civil society politics loksatta article
कसला ‘नागरी समाज’? हे तर राजकीय अवडंबर…
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Innovative and radical changes in the Indian market
आधुनिक किराणा बाजाराचा नादस्वर : शॉपिंग… गेट सेट गो!
article about weakness problem in wome causes of weakness in women
स्त्री आरोग्य : बायांनो, तुम्हाला विकनेस जाणवतो?
India Nuclear powered Ballistic Missile Submarine SSBN INS Arighat
‘आयएनएस अरिघात’चा चीनला धसका का?
documentary making, Abhijit Kolhatkar, Shilpa Godbole, producer director duo, documentary, Urdu ghazal, Shashikala Shirgopikar, Reverb Production, passion project, artistic journey
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : अद्यायावतीकरणाचा उद्योग…
hsc result
HSC Result : इयत्ता बारावीच्या निकालात आता नववीपासून अकरावीपर्यंतचे गुण समाविष्ट होणार? NCERT चा नवा प्रस्ताव काय?
loksatta kutuhal human friendly artificial intelligence
कुतूहल : बुद्धिमत्तेची कुरघोडी

आजच्या लेखामध्ये आपण पूर्व परीक्षा पेपर पहिलामधील ‘भारतीय इतिहास आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळ’ या घटकाची तयारी कशी करावी याची चर्चा करणार आहोत. तसेच २०११पासून ते २०१६पर्यंत या घटकावर किती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, याचा आढावा घेणार आहोत. या घटकामध्ये प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत आणि आधुनिक भारत तसेच भारतीय कला आणि संस्कृती याचाही अंतर्भाव होतो. सर्वप्रथम आपण या घटकावर वर्षनिहाय विचारण्यात आलेल्या प्रश्नांची संख्या पाहू

या प्रश्नांच्या संख्येवरून आपणाला  लक्षात आलेच असेल की, परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी  या घटकाचा अभ्यास किती महत्त्वाचा आहे. आता आपण या घटकाची थोडक्यात उकल करून घेऊ या. हा घटक अभ्यासाच्या दृष्टीने पुढीलप्रमाणे विभागता येऊ शकतो. त्यामुळे आपणाला या विषयाचा परीक्षाभिमुख आवाका लक्षात घेऊन याचे योग्य नियोजन करता येऊ शकते.

प्राचीन भारत

प्राचीन भारताच्या इतिहासाचे महत्त्व आणि अभ्यासाची साधने, प्रागतिहासिक भारत, ताम्रपाषाण कृषी संस्कृती, सिंधू अथवा हडप्पा संस्कृती, वैदिक संस्कृती, बौद्धयुग अथवा महाजनपदाचा कालखंड, मौर्योत्तर कालखंड, मौर्योत्तर कालखंड, गुप्त कालखंड आणि गुप्तोत्तर कालखंड इत्यादी.

मध्ययुगीन भारत

प्रारंभिक मध्ययुगीन कालखंड ( इ.स. ७५०१२००), दिल्ली सल्तनत, उत्तर भारतातील प्रादेशिक देशी सत्ता, विजयनगर साम्राज्य, बहामनी राजघराणे, मुघल साम्राज्य, मराठा कालखंड आणि मध्ययुगीन भारतातील धार्मिक चळवळी इत्यादी.

आधुनिक भारत

युरोपीयनांचे आगमन आणि ब्रिटिश सत्तेची भारतात स्थापना, ब्रिटिश सत्तेचा भारतावरील परिणाम, ब्रिटिश सत्तेच्या विरोधातील उठाव, १९व्या शतकातील सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी, शिक्षण आणि वृतपत्रे यांची वाढ आणि विकास, भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ, क्रांतिकारी चळवळी, कामगार चळवळ, भारतातील सांप्रदायिकतेची वाढ, गव्हर्नर जनरल आणि व्हाइसरॉय, भारतातील घटनात्मक विकास, महत्त्वपूर्ण व्यक्ती इत्यादी.

भारतीय कला आणि संस्कृती

भारतीय स्थापत्यकला आणि शिल्पकला, भारतीय चित्रकला, भारतीय संगीत, नृत्य आणि नाटय़, भारतीय साहित्य, भारतीय हस्तकला इत्यादी.

सर्वसाधारणपणे आपणाला उपरोक्त पद्धतीने या घटकाची विभागणी करून अभ्यासाचे नियोजन करता येऊ शकते. यातील नेमका कोणता भाग परीक्षेच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचा आहे याचे आकलन आपणाला गतवर्षीय परीक्षेमध्ये या घटकावर विचारण्यात आलेल्या प्रश्नावरून लक्षात येते. या घटकाची व्याप्ती खूप मोठी आहे तसेच याचे स्वरूप पारंपरिक पद्धतीचे आहे. त्यामुळे हा घटक सर्वप्रथम सखोल पद्धतीने अभ्यासणे गरजेचे आहे आणि त्यानंतर या घटकावर स्वत:च्या उजळणी स्वरूपातील नोटस् तयार कराव्यात, जेणेकरून हा घटक कमीत कमी वेळेमध्ये परीक्षेच्या दृष्टीने अभ्यासता येऊ शकतो. सर्वसाधारणपणे या घटकामध्ये प्राचीन भारत, आधुनिक भारत, भारतीय कला आणि संस्कृती यावर सर्वाधिक प्रश्न विचारले जातात तसेच गतवर्षीय परीक्षेमधील प्रश्नांचे विश्लेषण केल्यास असे दिसून येते की भारतीय कला आणि संस्कृती यावर अधिक प्रश्न विचारण्यात येऊ लागले आहेत. त्यामुळे हा भाग व्यवस्थित अभ्यासणे गरजेचे आहे. या घटकावर ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाची स्थळे, सामाजिक आणि आíथक संबंधित घडामोडी आणि संकल्पना, राजकीय घडामोडी, व्यक्तीसंबंधित माहिती, साहित्य, विविध कला इत्यादीशी संबंधित वस्तुनिष्ठ पद्धतीने प्रश्न विचारले जातात आणि अशा प्रकारच्या प्रश्नांची संख्या अधिक असते, तसेच विश्लेषणात्मक प्रश्न विचारले जातात पण यांची संख्या तुलनेने कमी असते, ज्यामुळे हा घटक अभ्यासताना वस्तुनिष्ठ माहितीचा अचूक अभ्यास करणे गरजेचे आहे. चुकीच्या पर्यायासाठी पेनल्टी गुण असल्यामुळे अचूक पद्धतीने अभ्यास करणे अपरिहार्य बनलेले आहे.

या घटकासाठी एन.सी.ई.आर.टी. बोर्डाची शालेय पुस्तके सर्वप्रथम वाचावीत, ज्यामधून या घटकाची मूलभूत माहिती आपणाला मिळते. बाजारात या घटकासाठी अनेक गाईड्स स्वरूपात पुस्तके उपलब्ध आहेत. यातील नेमकी कोणती पुस्तके या घटकाची परीक्षाभिमुख तयारी करण्यासाठी महत्त्वाची आहेत याची माहिती ठेवा. वरील प्रत्येक भागाची आपण पुढील लेखामध्ये चर्चा करणार आहोत. यामध्ये गतवर्षीचे भागनिहाय विचारले गेलेले प्रश्न, संबंधित भागाचा मूलभूत अभ्यास करण्यासाठी एन.सी.ई.आर.टी.ची कोणत्या वर्गाची पुस्तके वाचावीत तसेच संबंधित भाग अधिक सखोल आणि सर्वागीण पद्धतीने अभ्यासण्यासाठी कोणती संदर्भग्रंथ अभ्यासावीत याची सविस्तर माहिती घेणार आहोत. तसेच यातील आधुनिक भारत आणि  भारतीय कला आणि संस्कृती हा भाग मुख्य परीक्षेच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. त्यामुळे याचा अधिक सखोल आणि सर्वागीण अभ्यास करणे गरजेचे आहे. या पुढील लेखामध्ये आपण प्राचीन भारत या घटकाचा परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारा सर्वागीण आढावा घेणार आहोत.