मागील लेखामध्ये सामान्य अध्ययन पेपर एकचे विश्लेषण याबाबत चर्चा करण्यात आली. या पेपरमधील इतिहास घटक विषयाच्या तयारीबाबतची चर्चा या व पुढील लेखांमध्ये करण्यात येत आहे.
इतिहासाच्या तयारीपूर्वी मागील काही वर्षांच्या परीक्षांमधील प्रश्न व त्यांचे विश्लेषण पाहिल्यास तयारीची दिशा ठरविण्यास मदत होते. सन २०१५ पासूनच्या परीक्षांमध्ये विचारलेले काही प्रश्न पाहू.
प्रश्न – १९१९च्या मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायद्यात खालीलपैकी कोणत्या तरतुदी होत्या?
(a) भारतीय मंत्र्याचा पगार इंग्लंडच्या तिजोरीतून दिला जावा.
(b) भारतीय उच्चायुक्त हा भारताचा व्हॉइसरॉयचा इंग्लंडमधील प्रतिनिधी म्हणून काम पाहील.
(c) प्रांतांमध्ये द्विदल राज्यपद्धती निर्माण
करावी.
(d) भारतीय मंत्र्याचा पगार भारताच्या तिजोरीतून दिला जावा.
पर्यायी उत्तरे
१) (a), (b) आणि (c)
२) (a), (c) आणि (d)
३) (b), (c) आणि (d)
४) (c) आणि (d)
प्रश्न: १८५७ च्या उठावात खालीलपैकी कोण सहभागी होते?
(a) सावंतवाडीचे रामजी शिरसाट
(b) झीनत महल बेगम
(c) खान बहादूर रोहिला
(d) नसरत शाह
पर्यायी उत्तरे
१) (a), (b) आणि (c)
२) (a), (a) आणि (d)
३) (a) आणि (c)
४) (c) आणि (d)
* प्रश्न – पंडिता रमाबाईंना ‘कैसर इ हिंद’ किताब का देण्यात आला?
१) त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला म्हणून
२) त्यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्याचा गौरव करण्यासाठी
३) दुष्काळग्रस्त स्त्रियांना आश्रय दिला म्हणून
४) रमाबाई असोसिएशन स्थापन केले म्हणून
* प्रश्न – मुंबईच्या टेलिफोन खात्यात नवे मशीन आल्याने २२८ मुलींची नोकरी गेली. याची दखल घेत भांडवलशाही व्यवस्थेत भांडवलदार विज्ञानाचा व तंत्रज्ञानाचा वापर स्वत:च्या फायद्यासाठी करतात.. नवी मशीन ही कामगार चळवळीपुढील मोठी समस्या आहे, असे ‘सोशॉलिस्ट’मध्ये कोणी लिहिले?
१) ना. म. जोशी २) जॉर्ज फर्नाडिस
३) कॉम्रेड रणदिव ४) कॉम्रेड डांगे
* प्रश्न —- मधून व्हिएतनामींना बाहेर काढण्यासाठी भारताने भूमिका बजावली.
१) लाओस
२) ख्रिसमस आयलंड्स
३) कंपुचिया
४) फिलिपिन्स
* प्रश्न – पुढील वर्तमानपत्रे आणि त्यांचे संपादक यांच्या जोडय़ा लावा-
(a) वसुमती (i) अ. ब. कोल्हटकर
(b) प्रबासी (ii) बालमुकुंद गुप्ता आणि
अंबिका प्रसाद बाजपेयी (c) भारतमित्र (iii) रामचंद्र चॅटर्जी (d) संदेश (iv) हेमचंद्र प्रसाद घोष
पर्यायी उत्तरे
(a) (b) (c) (d)
१)(ii) (i) (iv) (iii)
२) (i) (ii) (iii) (iv)
३) (iv) (iii) (ii) (i)
४) (iii) (iv) (i) (ii)
बहिष्कार चळवळीला मुंबई इलाख्यात मिळालेले पुढारी — होते.
(a) बा. गं. टिळक (b) शि. म. परांजपे
(c) सौ. केतकर (d) सौ. अ. वि. जोशी
(e) विष्णू गोिबद बिजापूरकर
(f) महादेव राजाराम बोडस
पर्यायी उत्तरे
१) (a), (b), (e)
२) (a), (b), (c), (f)
३) (a), (b), (d), (e)
४) (a), (b), (c), (d), (e), (f)
* प्रश्न —– यांनी १८६५ मध्ये विधवा विवाहोत्तेजक मंडळ स्थापन केले.
१) म. गो. रानडे आणि विष्णुशास्त्री पंडित
२) धों. के. कर्वे आणि विष्णुशास्त्री पंडित
३) गोपाळ गोखले आणि धों. के. कर्वे
४) धों. के. कर्वे आणि पंडिता रमाबाई
* प्रश्न – ‘माझा प्रवास’ हे पुस्तक कोणी लिहिले?
१) गोिवद बल्लाळ देवल
२) बाबा पद्मनजी
३) गोडसे भटजी
४) विष्णुदास भावे
हे प्रश्न सामान्य अध्ययन पेपर एकमधील इतिहास घटकाचे प्रातिनिधिक प्रश्न आहेत. यांचे स्वरूप सर्वसाधारणपणे पुढीलप्रमाणे असल्याचे दिसते
* बहुपर्यायी प्रश्नातील मुद्दय़ाबाबत किमान एक मुद्दा तरी असा आहे जो बारकाईने अभ्यास केलेल्या उमेदवारालाच सहजपणे कळणे शक्य होईल.
* वर्तमानपत्रे आणि त्यांचे संस्थापक, सामाजिक संस्था आणि त्यांचे संस्थापक, पदाधिकारी आणि कार्य तसेच ब्रीदवाक्ये यांचा नेमका आणि वस्तुनिष्ठ अभ्यास आवश्यक आहे.
* महाराष्ट्राच्या कला व संस्कृतीबाबतच्या घटकाच्या तयारीसाठी कुठल्या तरी एकाच स्रोतावर अवलंबून राहण्यापेक्षा त्या स्रोताचा संदर्भ घेऊन अतिरिक्त माहिती मिळविण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.
* महाराष्ट्राच्या इतिहासाची तयारी जास्त सखोलपणे करणे आवश्यक आहे.
* स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासाची तयारी जास्त वस्तुनिष्ठपणे करायला हवी.
* अभ्यासक्रमातील समाजसुधारक व महत्त्वाच्या व्यक्तींबाबत सहसा प्रसिद्ध नसलेली माहिती मिळविणे आणि त्यांच्याबरोबर कार्य करणाऱ्या व महत्त्वाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींबाबतही माहिती असणे आवश्यक आहे.