|| किरण सबनीस
kiran.sabnis123@gmail.com

अभिकल्प अर्थात डिझाइनिंगमध्ये भर असतो ते नवे काहीतरी घडवण्यावर, नवनिर्मितीच्या वाटा धुंडाळण्यावर. म्हणूनच करिअर घडवताना या महत्त्वाच्या क्षेत्राचा आढावा घ्यायलाच हवा. महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी जाणून घेऊया डिझाइनिंगमधील करिअरसंधी..

devmanus marathi movie annoucement
‘देवमाणूस’ चित्रपटात झळकणार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी, सोबतीला दिसणार सुबोध भावे; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Samruddhi Highway Thane Nashik tunnels Warli painting
समृद्धी महामार्गावरील बोगद्यांना आकर्षक चित्रांचा साज, ठाणे – नाशिकला जोडणाऱ्या बोगद्यावर स्थानिक वारली चित्रकलेचा आविष्कार
mahajyoti obc loksatta news
ओबीसी विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय : ‘महाज्योती’चे ५ जिल्ह्यांत ‘उत्कृष्टता केंद्रे’ स्थापन होणार…
investment opportunities in India,
साहसी भांडवलदारांसाठी संधीचा सुकाळ
Bhushan Gagrani inaugurated the 'Home Away From Home' building
बीएमटी केंद्रातील रुग्ण, पालकांच्या निवासासाठी स्वतंत्र इमारत, मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे हस्ते झाले लोकार्पण
portfolio, investment , Alphaportfolio Concept ,
चला अल्फापोर्टफोलिओ तयार करूया
Portfolio With Alpha
अल्फा पोर्टफोलिओ कसा तयार करायचा?

डिझाइन रंग अंतरंग या सदरातून.. तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न कधी पडतात?

दहा तोंडी रावणाच्या मोबाइलच्या श्रोत्रिका (Headphone) कशा असतील? हत्तीच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ (surface area) कसे काढायचे? भेंडीचा काट छेद (cross section) पंचकोनी का असतो? खेळायचे पत्ते आयताकृती का असतात? रिक्षा चालवणाऱ्या काकांना कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागत असेल?

तर मग ही लेखमाला जरूर वाचा!

आजचा विद्यार्थी व युवकवर्ग आपल्या समाजातील, राजकारणातील, औद्योगिक जगतातील व वातावरणातील बदल सजगपणे पाहात आहे. २०२० मधील करोना या महामारीने जणू सर्व जुन्या विचारसरणीला कात्रीच लावली आहे, नावीन्याची कास धरा, नवनवीन – शाश्वत संशोधन करत राहा अन्यथा गंभीर परिस्थितीला सामोरे जा, याची तीव्रतेने जाणीव करून दिली आहे. गेल्या पाच-सात वर्षांत प्रसिद्ध झालेली आकडेवारीसुद्धा हेच निदर्शनास आणते की, विद्यार्थ्यांचा ओढा परंपरागत शिक्षणापासून उदा. अभियांत्रिकी, वैद्यकीय, वाणिज्य या क्षेत्रांपासून झपाटय़ाने कमी होत चाललेला आहे. आजचा विद्यार्थी काही तरी नवीन व ‘हटके’ करण्याचा ध्यास घेऊन पुढे चालला आहे, जागतिकीकरणामुळे त्यांना अनेक नवीन पर्यायही उपलब्ध होत आहेत. बऱ्याच तरुणांना नवनवीन कार्यक्षेत्र शोधून काढायची आहेत, स्वत:च्या कल्पनांवर आधारित उद्योग, स्टार्ट-अप चालू करायचे आहेत. कोणतीही नवीन संकल्पना, विचार, प्रक्रिया किंवा उपाय याचा गाभा ही सर्जनशीलता (creativity) असते. या बाबींचा सर्वागीण विचार केला तर असे जाणवते की, ‘क्रिएटिव्ह’ क्षेत्रातील शिक्षण ही प्रत्येक विद्यार्थ्यांची गरज बनली आहे.

क्रिएटिव्ह क्षेत्रात करिअर करणे प्रत्येकाला शक्य आहे का?

काही दिवसांपूर्वीच मला एका पालकांचा ‘डिझाइनमधील करिअर’ याविषयी माहिती घेण्यासाठी फोन आला. स्वत:चा परिचय करून दिल्यावर त्यांनी सांगितले की- ‘माझी मुलगी सध्या ११वी सायन्सला शिकते आहे. तिला लहानपणापासूनच काही तरी नवीन व अनवट करायला आवडते. उदा. ती कागदाची मॉडेल्स बनवते, विविध माध्यमांचा वापर करून उत्कृष्ट रंगकला करते, घरात प्रसंगानुरूप सजावट करणे हे तिला खूप आवडते, टाळेबंदीच्या काळात तिने -भारतीय कला व संस्कृती – यावर काही वाचन केले आहे.’ पुढे ते असेही म्हणाले की, ‘तिला ‘टिपिकल करिअर’ करायचे नाही, परंतु ज्या क्षेत्रात तिच्या सर्जनशीलतेला, कलागुणांना व तार्किक विचार प्रक्रियेला योग्य संधी मिळेल असेच काहीसे करायचे आहे.’
दुसरा अनुभव म्हणजे मागील महिन्यात आम्ही महाविद्यालयीन विद्याथ्यांसाठी ‘डिझाइन थिंकिंग’ या विषयावर ऑनलाइन कार्यशाळा आयोजित केली होती. सुरुवातीच्या काही मिनिटांत असा प्रश्न विचारला की, ‘आपल्यापैकी किती विद्यार्थ्यांना असे वाटते की, ते ‘क्रिएटिव्ह’ आहेत?’ उपस्थित असलेल्या १२२ मुलांपैकी फक्त तीन मुलांनी ‘हो’ असे उत्तर दिले. पुढे त्याच सत्रात आम्ही काही क्रिएटिव्हिटी संबंधात अ‍ॅक्टिव्हिटीज व प्रयोग केले, त्या कार्यशाळेच्या शेवटी तोच प्रश्न त्यांना पुन्हा विचारला तर ११५ मुलांनी ‘हो’ असे उत्तर दिले.

हे दोन्ही अनुभव आजवर झालेल्या मानसशास्त्रीय प्रयोग आणि शोधनिबंधातून प्रसिद्ध झालेल्या निष्कर्षांस सहमती देतात की, मूलत: प्रत्येक व्यक्ती क्रिएटिव्ह असते. काहींना त्याची प्रचीती आलेली असते, तर काहींना त्या क्षेत्रात स्वत:चा शोध घेण्याची संधी मिळालेली नसते. प्रत्येकाच्या क्रिएटिव्हिटीची व्याप्ती व खोली कमी-अधिक असू शकते, परंतु प्रत्येकाजवळ वेगळा विचार करण्याची वृत्ती, नवीन घडविण्याची क्षमता आणि उपजतच कला-गुण असतात. परंतु दैनंदिन व्यवहार, कामातला तोचतोचपणा, सभोवतालची परिस्थिती आणि अनेक इतर घटक यामुळे त्या क्षमतेचा विकास होत नाही. याचाच असाही अर्थ होतो की, योग्य प्रकारची संधी, मार्गदर्शन, प्रोत्साहन व अनुरूप परिस्थिती यांची सांगड घातल्यास प्रत्येकाला क्रिएटिव्ह क्षेत्रात करिअर करणे शक्य आहे.

क्रिएटिव्हिटी म्हणजे काय?

आपण बऱ्याचदा दैनंदिन वापरात – डिझाइन, जुगाड, इनोव्हेशन (Innovation), कल्पकता, नवनिर्मिती अशा अनेक संज्ञा पर्यायी शब्द म्हणून वापरतो. पुढील लेखात आपण त्यावर सखोल विवेचन पाहणार आहोत, परंतु थोडक्यात बोलायचे झाले तर या सर्व गोष्टींमध्ये एक समान धागा आहे व तो म्हणजे क्रिएटिव्हिटी (सर्जनशीलता).

सर्जनशीलता या विषयात बरेच संशोधन विविध क्षेत्रांतील विद्वान मंडळींनी केले आहे आणि ते अखंड चालू आहे. याविषयी वाद व प्रतिवादही बरेच आहेत. परंतु या लेखाच्या संदर्भात लिहायचे झाले तर आपण सर्जनशीलततेची सोपी व्याख्या अशी करू शकतो- सर्जनशीलता ही अशी क्षमता आहे त्याद्वारे आपण नावीन्यपूर्ण, विस्मयकारक व मूल्यवान कल्पना किंवा कलाकृतीची निर्मिती करू शकतो (चित्र १ पहा). या तीनही गोष्टींची एकत्र गुंफण घालून केलेली नवनिर्मिती मग ते मनमोहक संगीत असो, रोजच्या जीवनातील वस्तू असो, एखाद्या कंपनीचे बोधचिन्ह असो, एखाद्या हॉटेलची अंतर्रचना असो, एखादे खेळणे असो की, एखादे नवीन मोबाइल अ‍ॅप्लिकेशन.

क्रिएटिव्ह क्षेत्रातील करिअर कारण्यासाठी अभ्यासक्रम कोणते?

आजच्या विद्यार्थ्यांना सर्जनशील-केंद्रित शिक्षण घेण्याचे अनेक पर्याय सहज उपलब्ध आहेत. त्यामध्ये पदव्युत्तर, पदवी, पदविका, थोडय़ा कालावधीचे कोर्सेस, प्रमाणपत्र कोर्सेस, स्व-गतीने शिकायचे ऑनलाइन कोर्सेस व छोटय़ाा अवधीच्या कार्यशाळा यांचा समावेश करता येईल. या लेखमालेत आपण प्रामुख्याने औद्योगिक व व्यवसायाभिमुख कोर्सेसची माहिती घेणार आहोत.

क्रिएटिव्ह क्षेत्रातील करिअर्सची पाच क्षेत्रांत विभागणी करता येईल – डिझाइन, आर्किटेक्चर, फॅशन, कला आणि लिबरल आर्ट (चित्र २ पहा)

पुढील लेखात आपण ‘डिझाइन’ व त्या क्षेत्रातील करिअरविषयी अधिक सखोल माहिती घेऊ या.
लेखकांनी आयआयटी मुंबई येथून डिझाइनमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे, तसेच कॉर्पोरेट व शिक्षणक्षेत्रात कार्यरत आहेत.

Story img Loader