यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

संस्थेची ओळख

दूरशिक्षणाच्या क्षेत्रातील अग्रगण्य संस्था म्हणून नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा गौरवोल्लेख केला जातो. १ जुलै, १९८९ रोजी या विद्यापीठाची स्थापना झाली. नाशिक येथील ‘ज्ञानगंगोत्री’ या मुख्य शैक्षणिक संकुलामधून या विद्यापीठाचे प्रशासकीय कार्य चालते. हे विद्यापीठ दूरशिक्षणाच्या माध्यमातून नेहमीच्या अभ्यासक्रमांसोबतच इतर विद्यापीठांमध्ये उपलब्ध नसलेले अनेक अभ्यासक्रमही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत आहे. शास्त्रशुद्ध संप्रेषण आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून दूरशिक्षणाच्या विविध योजना राबविण्यामध्ये हे विद्यापीठ अग्रेसर मानले जाते. रोजगाराभिमुख शिक्षण, अभ्यासक्रमांसाठी अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर, सुलभ प्रवेशप्रक्रिया, अभ्यासक्रम निवडीचे स्वातंत्र्य, राज्यभरात उपलब्ध असलेली अभ्यासकेंद्रे ही या विद्यापीठाची महत्त्वाची वैशिष्टय़े ठरतात. कवी कुसुमाग्रजांनी लिहिलेले ‘एक प्रतिज्ञा असे आमुची ज्ञानाची साधना’ हे विद्यापीठ गीत या संस्थेच्या स्थापनेमागची उद्दिष्टय़े आणि संस्थेच्या कार्याची प्रेरणा सातत्याने अधोरेखित करत आहे. राज्यातील इतर पारंपरिक विद्यापीठे काही जिल्ह्य़ांपुरती मर्यादित असतानाच, मुक्त विद्यापीठ मात्र राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील दिसते. विद्यापीठाचे मुख्य कार्यालय हे नाशिक येथे असले, तरी आपल्या विभागीय केंद्रांच्या माध्यमातून हे विद्यापीठ राज्यातील इतर सर्वच विभागांमध्ये आपल्या सेवा पुरवत आहे. राज्यात नाशिकसह अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर, कल्याण, मुंबई, नांदेड, नागपूर, पुणे, सोलापूर येथे विद्यापीठाची विभागीय केंद्रे आहेत. या शिवाय राज्यभरात सर्वत्र असलेल्या अभ्यास केंद्रांच्या जाळ्यामधून हे विद्यापीठ समाजातील अगदी शेवटच्या घटकापर्यंत शैक्षणिक सोयी-सुविधा पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील आहे.

अभ्यासक्रम – विद्यापीठाला मिळालेल्या विशेष दर्जामुळे हे विद्यापीठ प्रमाणपत्र, पदविका आणि पदवी स्तरावरील विविध पारंपरिक, तसेच विशेष अभ्यासक्रम दूरशिक्षणाद्वारे राज्यभरातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू शकते. विद्यापीठाचे शैक्षणिक सेवा, मानव्य विद्या व सामाजिक शास्त्र, वाणिज्य व व्यवस्थापन, कृषी विज्ञान, शिक्षणशास्त्र, कॉम्प्युटर सायन्स, आरोग्य विज्ञान, वास्तुकला- विज्ञान व तंत्रज्ञान हे विभाग त्यासाठी वेगवेगळे अभ्यासक्रम चालवतात. शैक्षणिक सेवा विभागामध्ये मानवी हक्क प्रमाणपत्र, बी. ए. ग्राहक सेवा, गांधी विचार दर्शन पदविका, शैक्षणिक संप्रेषण तसेच संप्रेषण या विषयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.  मानव्य विद्या व सामाजिक शास्त्र विभागांतर्गत पत्रकारिता पदविका आणि पदवी, लायब्ररी सायन्सचा पदवी अभ्यासक्रम चालतो. वाणिज्य व व्यवस्थापन विभागामध्ये को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेंटची पदविका, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट पदविका, एमबीए आदी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. कृषी विज्ञान विभागात माळीकाम प्रमाणपत्र अभ्यासक्रम, फळउत्पादन, पालेभाज्या उत्पादन विषयातील पदविका, शेतीवर आधारित उद्योगांच्या व्यवस्थापनाशी निगडित पदविका, कृषी पत्रकारिता विषयातील पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. शिक्षणशास्त्रामध्ये शाळा व्यवस्थापनाची पदविका, मूल्यशिक्षणाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम, तर कॉम्प्युटर सायन्स अंतर्गत नानाविध प्रोग्रामिंग लँग्वेजशी निगडित प्रमाणपत्र आणि पदविका अभ्यासक्रम चालविले जातात. निरंतर शिक्षणांतर्गत विद्यापीठामध्ये विविध कौशल्याधारित पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम, परकीय भाषांचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. वास्तुकला, विज्ञान व तंत्रज्ञान विभागामध्ये वास्तुशास्त्रामधील बी. आर्च हा पदवी अभ्यासक्रम, तसेच अ‍ॅक्चुरिअल सायन्स विषयातील पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम चालविला जातो. आरोग्य विज्ञान विभागांतर्गत योग शिक्षक पदविका, मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ, इंडस्ट्रिअल ड्रग सायन्स विषयातील पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. दूरशिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांच्या स्वयंअध्ययनाला चालना देणारे हे अभ्यासक्रम गरजू विद्यार्थ्यांची शैक्षणिक भूक भागविण्यासाठी उपयुक्त ठरत आहेत.

सुविधा

विद्यापीठाने दूरशिक्षणाच्या सोयी-सुविधा राज्यभरात पोहोचविण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला आहे. त्या आधारे आपल्या अभ्यास केंद्रांमधून आभासी वर्गाचे जाळे उभारले आहे. विद्यापीठाने ‘व्हिडीओ ऑन डिमांड’ची सुविधा पुरविण्याचा प्रयोगही यशस्वी करून दाखविला आहे. या उपक्रमांतर्गत विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या गटांसाठी विशिष्ट विषयांवर आधारित व्हिडीओ प्लेअर्स आपल्या संकेतस्थळामार्फत संबंधितांपर्यंत पोहोचविण्याची सुविधा विकसित केली आहे. शिक्षणाचे कार्य केवळ महाविद्यालयीन शिक्षणापुरते मर्यादित न ठेवता ते इतर गटांपर्यंतही पोहोचावेत, या उद्देशानेही विद्यापीठाने प्रयत्न केले आहेत. त्यातूनच पुढे आलेला उपक्रम म्हणून विद्यापीठाच्या ‘मोबाइल लर्निग सेंटर’चा विचार केला जातो. मोबाइल व्हॅनच्या मदतीने शहरापासून लांबवरच्या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांसाठी कॉम्प्युटरचे अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात या उपक्रमाने मोठा वाटा उचललेला आहे. विद्यापीठाच्या नाशिक येथील संकुलाच्या आवारामध्ये भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या मदतीने कृषी विज्ञान केंद्रही चालविले जाते. विद्यापीठाच्या स्वत:च्या ऑडिओ व्हिज्युअल सेंटरमध्ये अभ्यासक्रमांवर आधारित दृकश्राव्य कार्यक्रमांची निर्मिती केली जाते. त्यासाठी आवश्यक अत्याधुनिक सुविधा विद्यापीठाने उभारल्या आहेत. विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून सोयी-सुविधा आणि सूचना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या जातात. दूरशिक्षणामध्ये नवमाध्यमांची उपयुक्तता विचारात घेत विद्यापीठाने फेसबुक पेजच्या माध्यमातूनही आपल्या सोयी-सुविधांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पावले उचलली आहेत.

योगेश बोराटे -borateys@gmail.com