यालेखामध्ये आपण केस स्टडी सोडवण्यासाठी कशा प्रकारे तयारी करणे आवश्यक आहे हे पाहणार आहोत. मात्र त्याआधी आपण मुळातच केस स्टडी या प्रश्नप्रकारामध्ये नक्की काय करायचे आहे, हे पाहूयात. यूपीएससी पूर्वपरीक्षेमधील निर्णयक्षमता चाचणी व समस्या सोडवणूक (Decision Making and problem solving) या घटकांशी वरवर पाहता साध्यम्र्य वाटणारा असा हा घटक आहे. परंतु, जास्त बारकाईने विचार केल्यास आपल्या असे लक्षात येईल की, प्रश्नाचा बाज वगळता एकूण प्रश्नप्रकारांमध्ये पुष्कळ भिन्नता आहे. या पेपरमध्ये केस स्टडीचे उत्तर लिहीत असताना बरोबर अथवा चूक अशी बाजू घेणे हा मुख्य हेतू नाही. किंबहुना उमेदवाराने कोणतीही बाजू निवडली तरीही त्या बाजूतील बारकावे उलगडून दाखवता येतात की नाही, हा खरा कळीचा मुद्दा आहे. तसेच एकंदरीतच दिलेल्या प्रकरणामधील नतिक द्विधा काय आहे, हे नेमके ओळखता येते का, हे तपासणे हादेखील एक हेतू आहे. मात्र, असे असले तरीही दिलेल्या प्रकरणाची छाननी कशी करावी, यासाठी काही साधारण ठोकताळे असणे आवश्यक आहे. आपण अशा काही पायऱ्यांचा अभ्यास करणार आहोत. मुळातच ही प्रकरणेही चच्रेला प्राधान्य देण्याच्या हेतूने तयार केलेली असतात. जर दिलेल्या प्रकरणाला एक सरधोपट, बरोबर उत्तर असेल तर त्यातून केस स्टडी तयार होणार नाही. म्हणून अशा प्रश्नांना एकपेक्षा जास्त बरोबर उत्तरे (व कदाचित अनेक चुकीची) असू शकतात. म्हणूनच आपण कोणतेही बरोबर उत्तर निवडले तरी त्यातील गुंतागुंत समजावून घेणे, ती उलगडून दाखवणे हे खरे आव्हान आहे. असे करत असताना काही ठरावीक गोष्टी लक्षात ठेवाव्यात. हे टप्पे खालीलप्रमाणे –
* प्रश्नाचे विधान निश्चित करणे – यामध्ये विचारलेल्या निर्णयाबद्दल अशी कोणती बाब आहे, ज्यामुळे तुम्हाला नतिक द्विधेत सापडल्यासारखे वाटते. निर्णयातील कोणत्या पलूमुळे तुम्हाला अस्वस्थ वाटते, हे सर्वात आधी शोधून काढणे आवश्यक आहे.
* माहिती वेगळी करणे – अनेक प्रश्नांचे स्वरूप हे माहितीचे सखोल विश्लेषण केल्यावर संपूर्णपणे बदलते. माहितीचा बारकाईने विचार केल्याने प्रश्न नक्की काय आहे, हे समजण्यास मदत होते.
* संबंधित घटक ओळखणे – उदा. कोणत्या व्यक्तींचा दिलेल्या परिस्थितीमध्ये सक्रिय सहभाग आहे. नियम, व्यावसायिक नीतिनियम, इतर परिस्थितीजन्य घटक यांचादेखील विचार गरजेचा आहे.
* प्राप्त शक्यतांची यादी करणे – कल्पकतेने कोणते पर्याय अमलात आणता येतील याचा विचार करावा. केवळ हे करणे योग्य आहे. म्हणून अशाच प्रकारे क्रिया केली पाहिजे असे म्हणून प्रश्नच निकालात काढणे असा याचा
मुख्य हेतू नाही.
* पर्याय तपासून पाहणे : पर्याय तपासून पाहण्यासाठी खालील चाचण्यांचा विचार करावा.
* हानीकारकता : कोणता पर्याय कमीतकमी हानी पोहोचवणारा आहे?
* प्रसिद्धी : आपण निवडलेल्या पर्यायाची वृत्तपत्रातून जाहीर चर्चा झाल्यास आपली तयारी आहे का?
* समर्थनीयता : आपल्या निर्णयाचे एखाद्या समितीपुढे अथवा चौकशी आयोगापुढे जाहीर समर्थन करता येईल का?
* सहकाऱ्यांचा कौल : आपण सुचवलेल्या पर्यायाबद्दल आपल्या सहकाऱ्यांचे काय मत होईल?
* व्यावसायिक निकष : आपल्या निर्णयाबद्दल व्यावसायिक बांधीलकी
आपण पाळली आहे का?
* संस्थात्मक निकष : आपण ज्या संस्थेमध्ये काम करीत आहोत, त्या संस्थेच्या मूल्यांना अनुसरून आपले वागणे आहे का?
* पर्याय निवड : वरील पायऱ्यांमधून परिस्थितीनुरूप पर्याय निवडावा.
* पुनर्चाचणी : वरील सर्व पायऱ्या तपासून पाहाव्यात. अशा प्रकारचा निर्णय भविष्यात तुम्हाला अथवा तुमच्या पदावरील कोणाला घ्यायला लागू नये, म्हणून कोणती दूरगामी व्यवस्था राबवणे शक्य आहे काय?
* यामध्ये धोरणांमधील बदल, प्रक्रियांतील बदल, संसाधनातील बदल अशा प्रकारचे बदल सुचविणे शक्य आहे.
* अशा प्रकारचा निर्णय भविष्यात घेण्याकरिता कोणती मदत व्यवस्था उभी करता येणे शक्य आहे का?
या प्रकारे केस स्टडी सोडवण्यासाठी पुढे काही प्रश्न दिले आहेत. विद्यार्थ्यांनी वरील पायऱ्यांचा वापर करीत त्याचे सविस्तर उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करावा. पुढील लेखात आपण त्याची उत्तरे एकापेक्षा अधिक दृष्टिकोनातून पाहणार आहोत.
प्रश्न :
* तुमच्या खात्याला ठरावीक रकमेचे अनुदान केंद्राकडून मिळाले आहे. आíथक वर्षांच्या शेवटी तुमच्याकडे अनुदानातील काही रक्कम शिल्लक आहे. तुम्हाला या रकमेच्या विनियोगाबद्दल निर्णय घ्यायचा आहे. तुम्हीही रक्कम केंद्राला परत करू शकता. केंद्रीय व्यवस्था प्रचंड आíथक तणावाचा सामना करत आहे. अथवा ज्या प्रकल्पांकरता अनुदान मिळाले नाही अशा प्रकल्पांवर खर्च करू शकता. यातून तुमचे सहकारी व कनिष्ठ अधिकारी प्रोत्साहित होऊ शकतात. यातून संपूर्ण अनुदानाची रक्कम खर्च होऊन पुढील वर्षांच्या अनुदानाच्या रकमेवर परिणाम होणार नाही. तुम्ही रक्कम परत केल्यास पुढील वर्षी अनुदानात मोठी कपात होण्याची शक्यता आहे. अशा वेळेस तुम्ही काय कराल? यामध्ये कोणती नतिक द्विधा आहे का? व्यवस्थापकीय प्रश्न आहे का? असल्यास कसा? नसल्यास का?
admin@theuniqueacademy.com
केस स्टडी एक समग्र आढावा
यालेखामध्ये आपण केस स्टडी सोडवण्यासाठी कशा प्रकारे तयारी करणे आवश्यक आहे हे पाहणार आहोत.
आणखी वाचा
First published on: 11-11-2013 at 07:28 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Case studies