CBSE 10th Result 2022 News in Marathi : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, सीबीएसई लवकरच इयत्ता १०वी (वर्ष २०२२) बोर्डाचे निकाल जाहीर करेल अशी अपेक्षा आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्रीय बोर्ड सोमवारी, ४ जुलै रोजी मॅट्रिक निकाल जाहीर करेल अशी अपेक्षा होती, तथापि, १०वीचा निकाल आज जाहीर झाला नाही, तथापि, १०वीचा निकाल आज जाहीर झाला नाही, कारण त्याला उशीर लागणार आहे. आता, ताज्या अहवालांनुसार, सीबीएसई १०वी, २०२२ टर्म २ चा निकाल १३ जुलैपर्यंत आणि १२वीचा निकाल १५ जुलैपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे.
कोणत्याही नवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटवर नियमित तपासणी करण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीबीएसई १३ जुलै रोजी निकाल जाहीर करेल अशी अपेक्षा आहे. मात्र, शिक्षण मंडळाकडून निकालाच्या तारखेबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
दहावीनंतर पुढे काय? ‘हे’ आहेत करिअर करण्यासाठी ‘टॉप ५’ पर्याय
एकदा जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइट्स म्हणजेच cbseresults.nic.in, results.gov.in या साइट्सवरून त्यांचे निकाल तपासू आणि डाउनलोड करू शकतात. विद्यार्थ्यांना निकालाची तारीख जाणून घेण्यासाठी सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइट आणि सोशल मीडिया खात्यांवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे. सीबीएसईने नुकतेच ‘परिक्षा संगम’ नावाचे एक नवीन डिजिटल पोर्टल सुरू केले आहे, जे बोर्डाच्या सर्व परीक्षा आणि निकाल संबंधित अॅक्टिव्हिटी स्ट्रीमलाइन करेल. जाणून घेऊया, सीबीएसई इयत्ता १० वी निकाल कसा तपासायचा आणि डाउनलोड कसा करायचा?
सीबीएसई दहावीचे गुणपत्रक डाउनलोड करण्याची प्रक्रिया
- स्टेप १: शिक्षण मंडळाच्या cbseresults.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- स्टेप २: तुम्हाला होम पेजवर ‘CBSE 10th result 2022’ अशी लिंक मिळेल, त्यावर क्लिक करा.
- स्टेप ३: आता, विद्यार्थ्यांना त्यांचे आवश्यक डिटेल्स जसे की रोल नंबर, जन्मतारीख इत्यादी भरणे आवश्यक आहे.
- स्टेप ४: सीबीएसई इयत्ता १० वी निकाल २०२२ स्क्रीनवर दिसेल
- स्टेप ५: इयत्ता १० चे स्कोअरकार्ड डाउनलोड करा आणि पुढील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.
केंद्रीय शिक्षण मंडळ टर्म १ आणि टर्म २ च्या निकालांसाठी एकत्रित मार्कशीट देखील जारी करू शकते. विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे की प्रत्येक टर्ममध्ये ५० टक्के अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आला होता. कोविड-१९ महामारीमुळे निर्माण झालेल्या आव्हानांवर मात करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यावर्षी सीबीएसईने २६ एप्रिल ते १५ जून २०२२ या कालावधीत १० वी आणि १२ वीच्या परीक्षा घेतल्या. यानंतर ३५ लाखांहून अधिक विद्यार्थी त्यांच्या निकालाची वाट पाहत आहेत.