केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) आज, ३० नोव्हेंबरपासून इयत्ता दहावी टर्म १ ची परीक्षा घेणार आहे. सी बी एस सी इयत्ता दहावी टर्म १ च्या परीक्षेचा पहिला दिवस सकाळी ११.३० पासून सामाजिक शास्त्राच्या पेपरने सुरू होईल. १ तास आणि ३० मिनिटे. सीबीएसई इयत्ता दहावी टर्म १ च्या परीक्षेसाठी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बहु-निवडीचे प्रश्न असेल. सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षा ११ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहेत.

विद्यार्थ्यांनी सोबत सीबीएसई टर्म १ प्रवेशपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. सीबीएसई प्रथमच बोर्ड परीक्षा ओएमआर शीटसह घेणार आहे. विद्यार्थ्यांनी फक्त काळा किंवा निळा पॉइंट पेन वापरून योग्य पर्याय गडद करणे आवश्यक आहे. परीक्षेदरम्यान पेन्सिल वापरण्यास मनाई आहे.

परीक्षा केंद्रावर ‘या’ गोष्टी घेऊन जाऊ नकात

मोबाईल

कॅल्क्युलेटर

रफ पॅड

नकाशे

ग्राफ पेपर

ब्लूटूथ डिव्हाइस

इलेक्ट्रॉनिक वस्तू

अधिक तपशील

सीबीएसई टर्म १ इयत्ता 10 ची परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर, २०२१ मध्ये घेतली जाईल, तर टर्म २ मार्च-एप्रिल २०२२ मध्ये घेतली जाईल.

सीबीएसई टर्म १ बोर्डाच्या परीक्षा ९० मिनिटे (१ तास ३० मिनिटे) कालावधीत होतील.

इयत्ता १०, १२ ची टर्म १ परीक्षा MCQ आधारित असेल.

हिवाळ्याचा हंगाम लक्षात घेऊन बोर्डाची पहिली परीक्षा सकाळी साडेअकरा वाजता सुरू झाल्या आहेत.

सीबीएसई बोर्ड २०२२ चा निकाल मिळविण्यासाठी सीबीएसई इयत्ता १० च्या बोर्ड परीक्षेचे गुण टर्म २ गुणांसह जोडले जातील.

Story img Loader