केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात असिस्टंट कमांडंट पदी निवड करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या असिस्टंट कमांडंट निवड परीक्षा- २०१४ साठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
जागांची संख्या व तपशील : या पात्रता परीक्षेद्वारे निवड करण्यात येणाऱ्या जागांची एकूण संख्या १३६ असून त्यामध्ये सीमा सुरक्षा बल ६८, केंद्रीय राखीव पोलीस दल २८ तर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल ४० याप्रमाणे जागांचा समावेश आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत अथवा पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षांच्या परीक्षेला बसलेले असावेत.
वयोमर्यादा : २५ वर्षे. राखीव गटातील उमेदवारांसाठी शिथिलक्षम.
निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा देशांतर्गत निवडक परीक्षा केंद्रांवर १३ जुलै २०१४ रोजी घेण्यात येईल. त्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई व नागपूर या परीक्षा केंद्रांचा समावेश असेल.
लेखी निवड परीक्षेत निर्धारित गुणांक मिळविणाऱ्या उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणी व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.
अर्जासह भरावयाचे शुल्क : अर्जासह भरावयाचे शुल्क म्हणून २०० रु. रोखीने स्टेट बँक ऑफ इंडिया अथवा सहयोगी बँकेत रोखीने भरणे आवश्यक आहे.
अर्जाचा नमुना व तपशील : अर्जाच्या नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १२ ते १८ एप्रिल २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या http://www.upsc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : संगणकीय पद्धतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या http://www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ मे २०१४.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा