बृहन्मुंबई महानगरपालिकेत सिव्हिल इंजिनीअर्सच्या २६०   जागा – अर्जदारांनी सिव्हिल वा बांधकाम अभियांत्रिकीची परीक्षा कमीतकमी ६०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३३ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली बृहन्मुंबई महानगरपालिकेची जाहिरात पाहावी अथवा महानगरपालिकेच्या http://portal.mcgm.gov.in  या संकेतस्थळांना भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जानेवारी २०१३.
मध्य रेल्वेत खेळाडूंसाठी ३० जागा – उमेदवार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत व त्यांनी हॉकी, कबड्डी, अ‍ॅथलीट, बॅडमिंटन, मुष्टियुद्ध, हॉकी, फुटबॉल, व्हॉलिबॉल, भारोत्तोलन यांसारख्या क्रीडा प्रकारात राज्य वा राष्ट्रीय स्तरावर क्रीडा नैपुण्य प्राप्त केलेले असावे. वयोमर्यादा २५ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या
२९ डिसेंबर २०१२ ते ४ जानेवारी २०१३च्या अंकात प्रकाशित झालेली मध्य रेल्वेची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि तपशिलासह असणारे अर्ज असिस्टंट पर्सोनेल ऑफिसर (आरटी), चीफ पर्सोनेल ऑफिसर कार्यालय, पहिला मजला, छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई ४००००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २२ जानेवारी २०१३.
भाभा अणू संशोधन केंद्र, मुंबई येथे प्लंबरच्या ९ जागा – अर्जदारांनी शालान्त परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी व त्यानंतर प्लंबरची राष्ट्रीय स्तरावरील कौशल्यपात्रता पूर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३० वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या
२९ डिसेंबर २०१२ ते ४ जानेवारी २०१३च्या अंकात प्रकाशित झालेली भाभा अणू संशोधन केंद्राची जाहिरात पाहावी
संपूर्णपणे भरलेले आणि आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज असिस्टंट पर्सोनेल ऑफिसर (रिक्रूटमेंट), डायरेक्टोरेट ऑफ कन्स्ट्रक्शन, सव्‍‌र्हिसेस अँड इस्टेट मॅनेजमेंट, डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅटोमिक एनर्जी, दुसरा मजला, नॉर्थ विंग, व्ही. एस. भवन, अणुशक्तीनगर, मुंबई ४०००९४ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २३ जानेवारी २०१३.
अकाऊंटंट जनरल- महाराष्ट्र, नागपूर येथे खेळाडूंसाठी
७ जागा – अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत व त्यांनी फुटबॉल वा क्रिकेटमध्ये राज्य वा राष्ट्रीय स्तरावर विशेष क्रीडा नैपुण्य प्राप्त केलेले असावे. वयोमर्यादा २८ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २९ डिसेंबर २०१२ ते ४ जानेवारी २०१३च्या अंकात प्रकाशित झालेली अकाऊंटंट जनरल- नागपूरची जाहिरात पाहावी अथवा http://www.cag.gov.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि तपशिलासह असणारे अर्ज साध्या टपालाने वेल्फेअर ऑफिसर, ऑफिस ऑफ दि अकाऊंटंट जनरल, पोस्ट बॅग नं. २२०, सिव्हिल लाइन, नागपूर ४४०००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २४ जानेवारी २०१३.
भारतीय वायुदलात भोजनालय साहाय्यकांच्या पाच जागा – अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत व त्यांना हॉटेल, कॅटरिंग यांसारख्या क्षेत्रात काम करण्याचा कमीतकमी १ वर्षांचा अनुभव असायला हवा. वयोमर्यादा
२७ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ५ ते ११ जानेवारी २०१३च्या अंकात प्रकाशित झालेली भारतीय वायुदलाची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज स्क्वाड्रन कमांड ऑफिसर, एअरफोर्स स्टेशन, न्यू व्हीआयपी रोड, एअरपोर्ट सर्कल, वडोदरा (गुजरात) येथे पाठविण्याची शेवटची तारीख २४ जानेवारी २०१३.
राहुरी कृषी विद्यापीठांतर्गत धुळे, जळगाव, बोरगाव व मोहोळ येथे कृषी विषयातील विविध संधी – कृषी विज्ञान केंद्रांवर प्रोग्रॅम को-ऑर्डिनेटर, सीनियर असिस्टंट, विषय तज्ज्ञ, प्रोग्रॅम असिस्टंट, लॅबोरेटरी टेक्निशियन, फार्म मॅनेजर, सुपरिंटेंडेंट, साहाय्यक इ. पदांसाठीचे विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि तपशिलासह असणारे अर्ज कुलसचिव, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर ४१३७२२ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख – २५ जानेवारी २०१३.