अशोक ट्रस्ट फॉर रिसर्च इन इकॉलॉजी अ‍ॅण्ड दि एन्व्हायरॉनमेंट, बंगळुरू येथे संवर्धन आणि शाश्वत विकासविषयक संशोधनपर पीएच.डी करण्यासाठी संधी उपलब्ध आहेत.
अभ्यासक्रमाचा तपशील
‘अत्री’च्या संशोधनपर पीएच.डी अभ्यासक्रमाला मणिपाल विद्यापीठाची मान्यता प्राप्त आहे. संवर्धन व शाश्वत विकास अभ्यासक्रमांतर्गत प्रामुख्याने जीवशास्त्र संवर्धन, संवर्धनविषयक नियोजन, वन-व्यवस्थापन, जीवनविषयक विकास, पर्यावरण संवर्धनविषयक उपक्रम, जलसंचय व जलनियोजन आणि पर्यावरणविषयक बदल या विषयांचा समावेश
करण्यात आला आहे.
शैक्षणिक अर्हता
उमेदवारांनी सामाजिक विज्ञान, नैसर्गिक विज्ञान, अभियांत्रिकी यासारख्या विषयातील पदव्युत्तर पदवी किमान ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असावा. त्यांना संशोधनविषयक कामाची आवड असावी.
निवड पद्धती
अर्जदारांपैकी पात्र उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलावण्यात येईल. ही निवड परीक्षा बंगळुरू
येथे १ जून २०१५ रोजी घेण्यात येईल.
अर्जदारांची पदव्युत्तर परीक्षेतील गुणांची टक्केवारी आणि ‘अत्री’च्या पात्रता परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येऊन त्याआधारे त्यांची संशोधनपर पीएच.डीसाठी नोंदणी करण्यात येईल.
ज्या अर्जदारांनी विद्यापीठ अनुदान आयोग- सीएसआयआर, नेट, गेट, आयसीएसएसआर यासारखी पात्रता परीक्षा दिलेली असेल अशांनी ही पीएच.डी पात्रता परीक्षा देणे अनिवार्य नसून त्यांना त्यांच्या पात्रतेनुसार थेट मुलाखतीसाठी बोलावले जाऊ शकते.
संशोधनाचा कालावधी   
योजनेअंतर्गत निवड झालेल्या संशोधकांचा त्यांच्या संशोधनपर पीएच.डीचा कालावधी साधारणपणे दोन वर्षांचा असेल.
शिष्यवृत्ती
त्यादरम्यान दरमहा त्यांना १६ हजार रु. ते १८ हजार रुपयांची शैक्षणिक शिष्यवृत्ती आणि वार्षिक आकस्मिक खर्चापोटी ५० हजार रु. अतिरिक्त देण्यात येतील.
अधिक माहिती
योजनेच्या संदर्भात अधिक माहितीसाठी बंगळुरूच्या ‘अशोक ट्रस्ट फॉर रिसर्च इन इकॉलॉजी अ‍ॅण्ड दि एन्व्हायरॉनमेंट’ http://www.atree.org./faculty अथवा http://www.atree.org/phd-programme  या संकेतस्थळांना भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याची मुदत
संपूर्ण भरलेले व आवश्यक तो तपशील, कागदपत्र आणि प्रस्तावित संशोधन विषयाच्या प्रारूपासह असणारे नोंदणी अर्ज ‘दि कन्व्हेअर, अकादमी फॉर कन्झव्‍‌र्हेशन सायन्स अ‍ॅण्ड सस्टेनेबल स्टडीज, अशोक ट्रस्ट फॉर रिसर्च इन इकॉलॉजी अ‍ॅण्ड दि एन्व्हायरॉनमेंट’ (अत्री), रॉयल एन्क्लेव्ह, श्रीरामपुरा, जक्कूर, बंगळुरू ५६००६४ या पत्त्यावर ६ एप्रिल २०१५ पर्यंत पाठवावेत.     

Story img Loader