संरक्षण दलाच्या विविध विभागांमध्ये अधिकारी पदांवर नेमणूक करण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या कंबाइंड डिफेन्स सव्र्हिसेस एक्झामिनेशन- २०१५ या निवड परीक्षेची अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे.
उपलब्ध जागा
या स्पर्धा परीक्षेद्वारे ४६३ जागा भरण्यात येणार असून त्यामध्ये इंडियन मिलिटरी अकादमी- २०० जागा, इंडियन नेव्हल अकादमी- ४५ जागा, एअरफोर्स अकादमी- ३२ जागा व ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी- १८६ जागा उपलब्ध आहेत. महिला उमेदवारांसाठी
११ जागांचा समावेश आहे.
आवश्यक शैक्षणिक अर्हता
अर्जदार खाली नमूद केल्यानुसार
पात्रताधारक असावेत-
इंडियन मिलिटरी अकादमी व ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी : कुठल्याही विषयातील पदवीधर.
इंडियन नेव्हल अकादमी : अभियांत्रिकीतील पदवीधर.
एअरफोर्स अकादमी : बारावी गणित व भौतिकशास्त्रासह उत्तीर्ण आणि त्यानंतर पदवी उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकीमधील पदवीधर.
या शैक्षणिक पात्रतेखेरीज उमेदवार शारीरिकदृष्टय़ाही पात्र असावेत.
वयोमर्यादा
अर्जदार खालील वयोगटातील असावेत-
इंडियन मिलिटरी अकादमी व इंडियन नेव्हल अकादमी : २० ते २३ वर्षे.
एअरफोर्स अकादमी : १९ ते २३ वर्षे.
ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी :
१८ ते २४ वर्षे.
निवड प्रक्रिया
अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे
१ नोव्हेंबर २०१५ रोजी देशांतर्गत विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात येईल. त्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई व नागपूर या परीक्षा केंद्रांचा समावेश असेल. लेखी निवड परीक्षेत निर्धारित गुणांक प्राप्त करणाऱ्या उमेदवारांना निवड प्रक्रिया, मुलाखत व शारीरिक क्षमता चाचणीसाठी बोलावण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल व त्यांची सैन्यदलाच्या संबंधित विभागात अधिकारी पदावर निवड होईल.
अर्जासह भरायचे शुल्क
अर्जासह भरायचे शुल्क म्हणून
२०० रु. रोखीने स्टेट बँक ऑफ इंडिया अथवा सहयोगी बँकेच्या कुठल्याही शाखेत भरणे आवश्यक आहे.
अधिक माहिती
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २५ ते ३१ जुलै २०१५च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या http://www.upsc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची मुदत
संगणकीय पद्धतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या http://www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर १४ ऑगस्ट २०१५ पर्यंत अर्ज करावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा