येत्या ५ जानेवारीला उपशिक्षणाधिकारी पदासाठी परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेचा आराखडा आणि सुधारित अभ्यासक्रमांची माहिती देत या परीक्षेची तयारी कशी करावी, यासंबंधीचे मार्गदर्शन-
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अनेक परीक्षांच्या अभ्यासक्रमांत बदल केलेला आहे. त्यात उपशिक्षणाधिकारी गट- ब या परीक्षेचाही समावेश आहे. पूर्वी उपशिक्षणाधिकारी व्हायचे असेल तर परीक्षार्थीची शैक्षणिक पात्रता पदवी + बी.एड्., उच्च पदवी + एम.एड्. तसेच अध्यापन क्षेत्रातील काही वर्षांचा अनुभव असावा लागत असे. परंतु दिवसेंदिवस वाढती स्पर्धा लक्षात घेऊन प्रवेश परीक्षेतून चिकित्सक उपशिक्षणाधिकारी शैक्षणिक खात्याला मिळावेत, यासाठी आयोगाने उपशिक्षणाधिकारी पदाची परीक्षा पदवीधरांसाठी खुली केली आहे. डी.एड्., बी.एड्., व एम.एड्. यांच्या कोणत्याही अभ्यासक्रमाचा निकष या परीक्षेसाठी आयोगाने लावलेला नाही. त्यामुळे बी.एड्. पदवीधारकांसोबतच फ्रेशर पदवीधारकांना या परीक्षेच्या निमित्ताने एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
नव्या अभ्यासक्रमानुसार, या परीक्षेची मांडणी आपल्याला तीन टप्प्यांत करता येईल-
१. अभ्यासक्रमाची माहिती करून घेणे : येत्या ५ जानेवारीला उपशिक्षणाधिकारी पदासाठी आयोग परीक्षा घेणार आहे. ती परीक्षा १०० गुणांची असून त्यात १०० बहुपर्यायी प्रश्न असतील. परीक्षेचा कालावधी एक तासाचा असतो. याचा अर्थ असा की, आयोगाला आपल्याकडून वेळेचे नियोजन, अचूकता व काटेकोरपणा अपेक्षित आहे. या परीक्षेचे नियोजन परीक्षार्थीनी योग्य पद्धतीने केले तर परीक्षेत प्रावीण्य मिळवणे फारसे कठीण नाही. आयोगाच्या अभ्यासक्रमात एकूण १० घटकांचा समावेश आहे. त्यात चालू घडामोडी, भारताचा- विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल- महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह, राजकीय यंत्रणा (विशेषत: महाराष्ट्राच्या संदर्भात), अर्थव्यवस्था व नियोजन, संगणक व माहिती तंत्रज्ञान, माहिती अधिकार अधिनियम – २००५, मानवी हक्क व जबाबदाऱ्या, सामान्य विज्ञान, बुद्धिमापन चाचणी.
 प्रत्येक घटकाचे अपेक्षित गुण व आधारित अभ्यासक्रम याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.
१. चालू घडामोडी : प्रत्येक परीक्षेत सुमारे १५ टक्के वेटेज चालू घडामोडी या घटकाला दिले जाते. ज्यात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय चालू घडामोडी यावरील प्रश्न अपेक्षित असतात. उपशिक्षणाधिकारी परीक्षांचा विचार करून जर चालू घडामोडी अभ्यासल्या तर आपल्याला राज्यस्तरीय ६० टक्के, राष्ट्रीय ३० टक्के व आंतरराष्ट्रीय १० टक्के प्रश्न अपेक्षित आहेत. ज्यात आपल्याला सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय, क्रीडा, अर्थ व वाणिज्य, विज्ञान व तंत्रज्ञान, भौगोलिक, ग्रंथसंपदा व लेखन, विविध पुरस्कार व नामांकन, अर्थसंकल्प (केंद्रीय, राज्य व रेल्वे), महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या, महत्त्वाच्या वैज्ञानिक प्रगती इत्यादी. परीक्षार्थीनी चालू घडामोडींचा अभ्यास करताना राज्य सरकारचे लोकराज्य मासिक, केंद्र सरकारचे योजना, कुरुक्षेत्र इयर बुक तसेच आघाडीची वृत्तपत्रे, काही शासकीय वेबसाइट्स यांचे वाचन करावे. उपयुक्त माहितीचे संकलन करणेही परीक्षेसाठी उपयुक्त ठरते.
२. भारताचा- विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास : या घटकामध्ये आयोगाला परीक्षार्थीकडून ब्रिटिश सत्तेची स्थापना देशामध्ये केव्हा झाली, त्यांचे आगमन,  सामाजिक व सांस्कृतिक बदल, सामाजिक, आíथक जागृती, राष्ट्रीय चळवळ, स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर भारत, राज्यातील समाजसुधारक- ज्यात गोपाळ गणेश आगरकर, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज हे महत्त्वाचे समाजसुधारक अभ्यासणे गरजेचे आहे. या घटकावर साधारणत: ९ ते १० प्रश्न परीक्षेला अपेक्षित आहेत. ज्यात ब्रिटिश सत्तेची भारतामध्ये स्थापना (दोन प्रश्न), सामाजिक व सांस्कृतिक बदल (एक प्रश्न), सामाजिक व आíथक जागृती (एक प्रश्न), राष्ट्रीय चळवळ (एक प्रश्न), स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर भारत (दोन प्रश्न), महाराष्ट्रातील समाजसुधारक (तीन प्रश्न) अपेक्षित आहे. या घटकांसाठी संदर्भग्रंथ राज्य मंडळाच्या पाठय़क्रमाची इतिहासाची पुस्तके, एनसीईआरटीची इतिहासाची अभ्यासक्रमानुसारची पाठय़पुस्तके, ग्रोवर व बेल्लेकर, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसारचे इतिहास घटक, जयसिंगराव पवार इत्यादी संदर्भग्रंथ म्हणून विद्यार्थ्यांनी अभ्यासायला हरकत नाही.
३. भूगोल : या घटकात परीक्षार्थीना प्राकृतिक भूगोल, महाराष्ट्राचा आíथक भूगोल, महाराष्ट्राचा मानवी व सामाजिक भूगोल, पर्यावरणीय भूगोल, लोकसंख्या, भूगोलशास्त्र व हवामान अभ्यासावे. साधारणत: आठ ते दहा प्रश्न अपेक्षित आहेत. भूगोलाचा अभ्यास करताना नकाशा प्रामुख्याने वापरणे गरजेचे असते. नकाशाद्वारे भूगोलाचा अभ्यास केल्यास कमी वेळेत उत्तम आकलन होऊ शकते. राज्याच्या भूगोलात नसíगक सीमा, राज्याची प्राकृतिक रचना, नदीप्रणाली, राज्याचे हवामान, वनस्पती जीवन, प्राणीसंपत्ती/ अभयारण्ये/ राष्ट्रीय उद्याने, जलसिंचन, विविध जलाशये, राज्यातील नदीप्रकल्प व जिल्हा, राज्यातील जलविद्युत प्रकल्प, राज्याचे आंतरराष्ट्रीय प्रकल्प व सहकारी राज्ये, राज्यातील औष्णिक विद्युत केंद्रे, खनिज संपत्ती, उद्योगधंदे, वीजनिर्मिती, वाहतूक व दळणवळण, पर्यटन, राज्यातील प्रमुख किल्ले, विविध संशोधन संस्था, विकास योजना, पर्यावरण, हवामानाचा इतर घटकांवर होणारा परिणाम, राज्यातील लोकसंख्यावाढ व विकास इत्यादी घटक अभ्यासणे महत्त्वाचे आहे. भूगोल या घटकाच्या अभ्यासासाठी परीक्षार्थीनी राज्य शिक्षण मंडळाची भूगोलाची पाठय़पुस्तके, एनसीईआरटीची भूगोलाच्या अभ्यासक्रमानुसारची पाठय़पुस्तके, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ यांची भूगोल अभ्यासक्रमावरील पाठय़पुस्तके महत्त्वाची आहेत.
४. राजकीय यंत्रणा (शासकीय रचना, अधिकार व काय्रे) : उपशिक्षणाधिकारी परीक्षेसाठी आयोगाकडून या घटकावर सात ते आठ प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. या घटकामध्ये प्रामुख्याने राज्यघटना, भारतीय घटनेची उगमस्थाने, घटनेचा सरनामा, मूलभूत अधिकार व मूलभूत कर्तव्ये, घटनात्मक अधिकार, घटनादुरुस्ती, भारताचे संघराज्य, कार्यकारी मंडळ (राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ), कायदेमंडळ (संसद), लोकसभा, राज्यसभा, संसदीय समित्या, राज्याचे विधिमंडळ (कलम १६८), विधानसभा, विधान परिषद, राज्याचे कार्यकारी मंडळ (राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ), भारतीय न्याय व्यवस्था, सर्वोच्च न्यायालय (कलम १२४), उच्च न्यायालय (कलम २१४), कनिष्ठ न्यायालये, केंद्रीय लोकसेवा आयोग व राज्य लोकसेवा आयोग, निर्वाचन/ निवडणूक आयोग, महान्यायवादी (कलम ७६), महाधिवक्ता (कलम १६५), नियंत्रण व महालेखापरीक्षक (कलम १४८) व भारताची मानचिन्हे इत्यादी घटकांवर अभ्यास करणे गरजेचे आहे. यासाठी परीक्षार्थीनी संदर्भग्रंथ यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ यांची अभ्यासक्रमानुसारची पाठय़पुस्तके, राज्य शिक्षण मंडळाची नागरिकशास्त्र व राज्यघटनेची पाठय़पुस्तके अभ्यासावीत.
५. अर्थव्यवस्था व नियोजन : आयोगाकडून या घटकावर आठ ते नऊ प्रश्न अपेक्षित आहेत. ज्यात प्रामुख्याने भारतीय अर्थव्यवस्था, नागरी व ग्रामीण पायाभूत सुविधांचा विकास, उद्योग – गरजा, सहकार, आíथक सुधारणा, आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ, गरिबीचे निर्देशांक व अंदाज, रोजगार निर्धारणाचे घटक, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था हे प्रमुख घटक होत. दिलेल्या घटकात भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने, बेरोजगारी व प्रादेशिक असमतोल, नियोजन, प्रक्रिया, प्रकार, पंचवार्षकि योजनेचा आढावा, मूल्यमापन, विकासाचे सामाजिक व आíथक निदर्शक, राज्य व स्थानिक स्तरावरील नियोजन, विकेंद्रीकरण संबंधातील ७३वी व ७४वी सुधारणा, ऊर्जा, पाणीपुरवठा, स्वच्छता, गृहनिर्माण, परिवहन, संसूचना (टपाल, तारायंत्र, व दूरसंच), रेडीओ नेटवर्क, दूरचित्रवाणी, इंटरनेट महाजाल, केंद्र व राज्यशासनाचे उपक्रम, बी.ओ.एल.टी. (बांधा, वापरा, भाडेपट्टय़ाने द्या), आíथक व सामाजिक विकासात उद्योगाचे महत्त्व व भूमिका, विशेषत: राज्याच्या संदर्भात शिथिलीकरण, खासगीकरण व जागतिकीकरण यांचे लघुउद्योगावरील परिणाम, धोरण उपाययोजना व कार्यक्रम, सहकार-संकल्पना, जुनी नवीन तत्त्वे, राज्यधोरण व सहकार क्षेत्रे, आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवली चळवळ, आंतरराष्ट्रीय विकास अभिकरण, गरिबीचे निर्देशांक व अंदाज, राज्याची अर्थव्यवस्था : कृषी, उद्योग व सेवा क्षेत्रांची ठळक वैशिष्टय़े, महाराष्ट्रातील दुष्काळ व्यवस्थापन, राज्यातील एफडीआय, विकास व कृषी अर्थशास्त्र आणि भारतीय उद्योग पायाभूत सुविधा व सेवाक्षेत्र हे घटक बारकाईने अभ्यासणे गरजेचे आहे. प्रामुख्याने अर्थव्यवस्था व नियोजन या घटकांवर आकडेवारी कशी लक्षात ठेवता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या घटकासाठी संदर्भग्रंथ प्रतियोगिता किरण – अर्थव्यवस्था मिनिस्ट्री ऑफ इन्फॉम्रेशन अ‍ॅण्ड ब्रॉडकािस्टग वेबसाइटवरून चालू आकडेवारी विद्यार्थ्यांनी गोळा करावी. तसेच केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या वित्त मंत्रालयाच्या शासकीय संकेतस्थळावरून माहिती गोळा करायला पाहिजे.
६. संगणक व माहिती तंत्रज्ञान : आजचे युग हे संगणक युग आहे. त्यामुळे प्रशासनाला संगणक ही एक अत्यंत गरजेची बाब बनलेली आहे. प्रशासकीय व्यक्तीला संगणक हाताळता यावेत व त्याचे ज्ञान असावे यासाठी आयोगाकडून या घटकावर सात ते आठ प्रश्न परीक्षेला विचारणे अपेक्षित आहे. प्रश्नपत्रिका बहुपर्यायी असल्यामुळे त्या घटकाची संपूर्ण माहिती आपल्याला अचूक असेल तर परीक्षार्थी अचूक पर्यायापर्यंत पोहचू शकतात. त्यासाठी त्यांनी माहिती तंत्रज्ञान, शैक्षणिक तंत्रविज्ञान, दृक्श्राव्य साधने, संगणकाचा इतिहास, संगणकाचे गुणधर्म आणि वैशिष्टय़े, द्विमान पद्धती, डिझाईन टुल्स आणि प्रोग्रािमग भाषा, संगणकाची उपकरणे, स्मृती, संगणकाची कार्यपद्धती, मायक्रोसॉफ्ट िवडोज, मायक्रोसॉफ्ट ऑफिस, मायक्रोसॉफ्ट एक्सेल, मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट, मायक्रोसॉफ्ट एक्सेस, आधुनिक समाजात संगणकाची भूमिका, संप्रेषण/कम्युनिकेशन मीडिया, सायबर गुन्हा, आय.टी. अमेंडमेंट अ‍ॅक्ट २००, शासनाचे कार्यक्रम व माहिती तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मूलभूत प्रश्न व त्यांचे भवितव्य, संगणक संक्षिप्त संज्ञा व त्यांचा विस्तार इत्यादी घटक परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. संदर्भग्रंथ म्हणून विद्यार्थ्यांनी एम.एस.सी.आय.टी.चा अभ्यासक्रमाची पुस्तके वाचावी.
७. माहितीचा अधिकार अधिनियम २००५ :  उपशिक्षणाधिकारी परीक्षेत या घटकावर सात ते आठ प्रश्न आयोगाकडून अपेक्षित आहेत. माहिती अधिकार मूलभूत माहिती- अभ्यासक्रम (स्पर्धा परीक्षांचा), माहितीची गरज, माहितीचे सामथ्र्य, अभिव्यक्तीचा अधिकार, माहिती कशासाठी व कोणती मागावी, माहितीचा अधिकार अधिनियम २००५, माहिती अधिकार कायद्याची महत्त्वाची उद्दिष्टे, पाश्र्वभूमी, जागतिक इतिहास, भारतातील चळवळ, माहिती अधिकारामुळे काय होईल, माहितीचा अधिकार कोणासाठी कायदा, माहितीच्या अधिकारात कोणती माहिती मिळेल, जन माहिती अधिकारी कोण असतो? काय काम करतो? अर्ज न करताही माहिती मिळेल, माहिती अधिकाराचा अर्ज कसा भरावा, माहिती मिळविण्यासाठी नागरिकांचा मार्ग – तक्ता, माहिती अधिकारात माहिती किती दिवसांत मिळेल? कोण देईल? कोणती माहिती मिळणार नाही, माहिती अधिकाऱ्याकडून माहिती मिळाली नाही तर काय करावे, माहिती अधिकाऱ्याला शिक्षा काय होईल, पहिल्या अपिलात माहिती मिळाली नाही तर काय करावे, माहिती आयोग म्हणजे काय, माहिती आयुक्तांची काय्रे, माहिती अधिकाराचे प्रशिक्षण कार्यक्रम, माहिती अधिकाराचे फायदे व अपेक्षित परिणाम, माहिती आयोगाचे पत्ते, माहिती अधिकार अर्जाची नोंदवही – तक्ता, माहितीचा अधिकार अधिनियम २००५ यासाठी विद्यार्थ्यांनी संदर्भग्रंथ म्हणून ‘यशदा’ने प्रकाशित केलेली माहितीचा अधिकारपुस्तिका वाचावी.
८. मानवी हक्क व जबाबदाऱ्या : प्रशासनाच्या दृष्टीने मानवी हक्क व जबाबदाऱ्या हाताळणे महत्त्वाचे असते. परीक्षेत या घटकावर सात ते आठ प्रश्न अपेक्षित आहेत. ते प्रश्न मानव संसाधन विकास : संकल्पना, भारतातील लोकसंख्येची स्थिती, भारतातील बेरोजगारी, मानव संसाधन विकासासाठी कार्यरत शासकीय व निमशासकीय संस्था, शिक्षण आणि मानव विकास संसाधन, भारतातील शिक्षणपद्धतीचा विकास, शिक्षणासंदर्भातील विविध समस्या, विविध सामाजिक घटकांसाठीचे शिक्षण, औपचारिक-अनौपचारिक शिक्षण, शिक्षणातील विविध प्रवाह, देशातील व्यावसायिक व तांत्रिक शिक्षणपद्धती, आरोग्य आणि मानव संसाधन विकास, भारतातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था, शासनाची आरोग्यविषयक भूमिका, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, आरोग्यविषयक विविध योजना व कार्यक्रम, जागतिक आरोग्य संघटना, भारतातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा इतिहास व विकास, ग्रामीण विकास व पंचायतराज संस्थांची भूमिका, ग्रामीण विकासासाठीचे संस्थात्मक उपाय, ग्रामीण विकास व शाश्वत रोजगार, ग्रामीण विकास व पायाभूत सुविधा, भारताची १५वी जनगणना, आठवा वार्षकि शैक्षणिक स्थिती अहवाल (असर २०१२), सहकार क्षेत्रातील सुधारणा, मानव विकास, सर्वासाठी दर्जेदार, मोफत आरोग्यसेवा, वसाहतकालीन ग्रामीण विकासाचे प्रयत्न, मानव संसाधन विकासातील कार्यरत विविध राष्ट्रीय संस्था या अनुषंगाने अभ्यास करावा. सद्यस्थितीतील घटनांचा अभ्यास करणेही आवश्यक ठरते.
९. सामान्यविज्ञान : स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून सामान्यविज्ञान हा घटक महत्त्वाचा ठरतो. प्रत्येक परीक्षेला या घटकावर प्रश्न विचारले जातात. परीक्षेत या घटकावर १० ते १२ प्रश्न अपेक्षित असतात. ज्यात जीवशास्त्र (तीन ते चार प्रश्न), भौतिकशास्त्र (तीन ते चार प्रश्न), रसायनशास्त्र (दोन ते तीन प्रश्न), आरोग्यशास्त्र (एक ते दोन प्रश्न) व सामान्यविज्ञान (एक ते दोन प्रश्न) अपेक्षित आहेत; परंतु, यात असलेले उपघटक अभ्यासणे गरजेचे ठरते. प्रकाश, ध्वनी, गती, कार्य आणि ऊर्जा, बल व बलाचे वर्गीकरण, चुंबकत्व, धाराविद्युत, उष्णता, रासायनिक संज्ञा व सूत्रे, द्रव्याचे स्वरूप, मूलद्रव्याचे वर्गीकरण, अणू संरचना, कार्बनी संयुगे, सजीवांचे वर्गीकरण, सजीवांतील संघटन, जीवनप्रक्रिया, मानवी शरीर, पोषकद्रव्ये, मानवी आरोग्य या घटकांसाठी विद्यार्थ्यांनी राज्य शिक्षण मंडळाची आठवी ते दहावीपर्यंतची विज्ञान पाठय़पुस्तके, एन.सी.ई.आर.टी.ची विज्ञानाची आठवी ते दहावीपर्यंतची पुस्तके वाचावीत.
१०. बुद्धिमापन चाचणी : योग्य वेळस योग्य निर्णय घेणारी व्यक्ती उत्तम प्रशासनासाठी आवश्यक असते. त्याची चाचपणी करण्याच्या दृष्टीने परीक्षेत साधारणत: १२ ते १५ प्रश्न बुद्धिमापन चाचणीवर अपेक्षित असतात. हे प्रश्न सोडवताना महत्त्वाची भूमिका म्हणजे वेळेचे नियोजन. एक प्रश्न सोडविण्यासाठी आयोगाने आपल्याला ३६ ते ३८ सेकंद वेळ दिलेला असतो. त्यात प्रश्नाचे आकलन करून घेत उत्तर लिहिण्याची कसरत परीक्षार्थीला साधावी लागते. त्यामुळे या घटकासाठी अचूकसराव महत्त्वाचा असतो. प्रामुख्याने यात संख्यांची ओळख, संख्यामालिका, संख्या संबंध, अक्षरमाला – लयबद्ध मालिका, विसंगत घटक, सांकेतिक भाषा, समान संबंध, बठक व्यवस्था, दिशा, घडय़ाळ, नातेसंबंध, दिनदíशका, ठोकळे व सोंगटी, वेन आकृती, तर्क अनुमान, पृथक्करण, कूटप्रश्न, वय-वष्रे, सरासरी, गुणोत्तर प्रमाण, काळ, काम, वेग, शेकडेवारी, भूमिती, संकीर्ण (परीक्षेतील प्रश्न), माहिती विश्लेषण, आकृत्यांची संख्या मोजणे या घटकांवरील परीक्षाभिमुख सराव करणे गरजेचे आहे.
कोणत्याही परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांनी एक व्यूहरचना बनवायला हवी. सुमारे ८० टक्के प्रश्न आपण कसे सोडवू, याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित करायला हवे. प्रत्येक उदाहरण- काठिण्य पातळी, मध्यम पातळी व सर्वसामान्य पातळी या पद्धतीने ३६ ते ३८ सेकंदांत सोडवण्याचा प्रयत्न करायला हवा. या परीक्षेचा अभ्यासक्रम जाणून योग्य त्या संदर्भग्रंथांचा- प्रामुख्याने शासनमान्य संदर्भग्रंथांचा अभ्यास करणे उत्तम.  
gopaldarji21@gmail.com

education board warning against schools for obstructing students while filling exam application zws
परीक्षा अर्ज भरताना अडवणूक केल्यास शाळांवर कारवाई;  शिक्षण मंडळाचा इशारा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Morya Gosavi Sanjeev Samadhi Festival begins in chinchwad Pune news
पिंपरी: मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाला मंगळवारपासून प्रारंभ; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची उपस्थितीती
IND vs AUS 3rd Test Match Timing Date Venue What Time Does the Gabba Test Start
IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया गाबा कसोटी पहाटे किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या योग्य वेळ
academic degree on experience
विश्लेषण : अनुभवाच्या आधारे पदवी कशी मिळणार?
NEET Postgraduate Exam Schedule Announced Wardha news
नीट पदव्युत्तर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; वैद्यक आयोग म्हणतो…
upsc released announced annual time table
‘यूपीएससी’कडून विविध परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कोणती परीक्षा कधी होणार?
UPSC CSE Mains Result 2024 : यूपीएससी नागरी सेवा मुख्य परीक्षा 2024 चा निकाल जाहीर; ‘येथे’ ऑनलाइन पाहा निकाल
Story img Loader