आता इथे तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हा डीजे म्हणजे नेमका काय प्रकार आहे? तर हा डीजे म्हणजे अशी असामी असते, जी डिस्कोथेक, पब किंवा पार्टीमधील वातावरण रंगतदार व उत्साही ठेवायला मदत करते नि त्या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या लोकांना खऱ्या अर्थाने पार्टीत सामील करून घेते. असे अनेक प्रसंग आहेत, जसे, लग्न, साखरपुडा, बर्थ डे पार्टी किंवा तत्सम स्वरूपाचे समारंभ अशा ठिकाणी गरजेनुसार डीजेंना आमंत्रित केले जाते.
वेगवेगळे साऊंडट्रॅकचे मििक्सग करण्याचे तंत्र या डीजेला अवगत असले पाहिजे. त्याचबरोबर इलेक्ट्रो, जॅझ, रॉक आणि हाऊस या संगीत प्रकाराची उत्तम जाण असली पाहिजे. तसेच वाद्य व संगीतासंदर्भातील विविध सॉफ्टवेअरची माहिती व त्यांचा नेमका वापर करण्याचे तंत्र त्यास असले पाहिजे. याशिवाय लोकांना आवडणारी गाणी, कोणकोणत्या गाण्यांवर लोक मनमुरादपणे नाचू शकतात, हेदेखील त्यास माहिती असले पाहिजे. तसेच या गाण्यांचे टप्पे कसे घ्यायचे, म्हणजे सुरुवात, मध्य व शेवट कशा पद्धतीने करावा, हे त्यास नेमकेपणाने अवगत असले पाहिजे. थोडक्यात काय, तर विशिष्ट ठिकाणी (डिस्कोथेक, पब इ.) जमलेल्या लोकांचे मनोरंजन कसे करता येईल, याची जबाबदारी घेणारा घटक म्हणजे डीजे होय.
डीजे कसे व्हावे यासाठी खास प्रशिक्षण देणारा असा कोर्स नाही. पण ज्याला संगीताची जाण आहे आणि त्याचे मििक्सग, कॉम्बिनेशन कसे करावयाचे याचे तंत्र माहीत असेल तर अशी व्यक्ती प्रत्यक्ष डीजे म्हणून कामाला सुरुवात करून खूप काही अनुभवाने शिकू शकते. त्याचबरोबर या व्यक्तीजवळ उत्तम संवादकौशल्यदेखील असावे.
अलीकडे बदलत्या काळानुसार डीजेच्या करिअरला चांगलीच मागणी व लोकप्रियता मिळू लागली आहे. याला कारणही तसेच आहे, यापूर्वी डिस्कोथेक किंवा पबमध्ये जाणे म्हणजे चन समजली जात असे. पण अलीकडे अशा ठिकाणी किंवा तत्सम स्वरूपाच्या पार्टीजना जाणे हे सोशल स्टेटसची बाब बनले आहे. दुसरे असे की, अशा या ठिकाणी डीजे म्हणून काही तास काम केल्यानंतर चांगली घसघशीत कमाई पदरात पडते. शिवाय एकदा तुमचे काम पसंत पडले की आपोआप इतर ठिकाणांहूनदेखील कामासाठी विचारणा होते, जसे फार्म हाऊस पार्टीसाठी, बँक्वेट हॉल किंवा जिथे विविध स्वरूपांच्या पार्टीचे सातत्याने आयोजन होत असते अशी मोठमोठी हॉटेल्स आदी.
मनोरंजन आणि ब्रॉडकास्टिंग क्षेत्रात झपाटय़ाने होणाऱ्या नवीन बदलांमुळे करिअरसंदर्भातील नवनवीन पर्याय विकसित होऊ लागले आहेत. या पर्यायांना असलेली मागणी लक्षात घेऊन अलीकडेच काही संस्थांनी पुढाकार घेऊन ही मागणी पूर्ण करणाऱ्या कोर्सची रचना केली आहे. यामध्ये काही नावाजलेल्या संस्था अशा आहेत, ज्या डीजेबाबत कोर्स चालवितात – स्पिंलटर्स डीजे स्कूल, मुंबई; आझारेडो अकाउटिक्स, मुंबई; स्पिन गुरू डीजे अॅण्ड रिमिक्सिंग अॅकेडमी, नवी दिल्ली; पनाचे द डीजे स्कूल, हैदराबाद; आणि डीजे ट्रेिनग अॅकेडमी, अहमदाबाद या काही संस्थांचा समावेश आहे.
डीजेला मिळणारा कामाचा मोबदला हा त्या पार्टीचे स्वरूप, ती ज्या ठिकाणी आयोजित केली आहे ते ठिकाण, पार्टीला उपस्थित असणाऱ्या लोकांची संख्या आदी गोष्टींवर अवलंबून असते. सर्वसाधारणपणे एका रात्रीच्या कामासाठी त्याला पाच ते आठ हजारांपर्यंत कामाचा मोबदला मिळतो. त्यातही डीजेची लोकप्रियता आणि काम उत्तम असेल तर या दरात आणखी काही पटींनी वाढ होऊ शकते.
जोश जागविणारे डीजे आणि आरजे!
नृत्य ही एक कला आहे. पार्टी छानशी रंगात आली आहे. संगीत घुमूू लागले आहे की, मग नकळत पार्टीला आलेल्या मंडळींचे पाय ताल धरू लागतात. तशातच एकापाठोपाठ ‘अमुक गाणे लावा, तमुक वाजवा,’ अशा फर्माईशी सुरू होतात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 31-12-2012 at 12:25 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dj and rj makes tremendous feelings