लार्सन अॅण्ड टुब्रो उद्योग समूहांतर्गत असणाऱ्या ‘एल अॅण्ड टी हायड्रोकार्बन कंपनी’तर्फे निवडक व हुशार इंजिनीअर्सची इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, मद्रासच्या सहकार्याने एमटेक ऑफशोअर स्ट्रक्चरल इंजिनीअरिंग या विशेष अभ्यासक्रमात शिष्यवृत्तीसह निवड करण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे इंजिनीअरिंग पदवीधर उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत –
शैक्षणिक पात्रता : अर्जदार विद्यार्थ्यांनी इंजिनीअरिंगची पदवी परीक्षा प्रतिष्ठित संस्थेतून सिव्हिल वा स्ट्रक्चरल इंजिनीअरिंग विषयासह कमीत कमी ६०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा. गुणांच्या टक्केवारीची अट अनुसूचित जाती-जमातीच्या उमेदवारांसाठी पाच टक्क्य़ांनी शिथिलक्षम आहे.
विशेष सूचना : वरील शैक्षणिक पात्रतेशिवाय अर्जदार विद्यार्थ्यांनी ‘जीएटीई’ ही प्रवेश पात्रता दिलेली असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा : अर्जदार विद्यार्थ्यांचे वय १ ऑगस्ट २०१३ रोजी २३ वर्षांहून अधिक नसावे.
निवड पद्धती व प्रक्रिया : अर्जदार विद्यार्थ्यांपैकी पात्रताधारक विद्यार्थ्यांना निवड प्रक्रिया, समूहचर्चा व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची या योजनेअंतर्गत निवड करण्यात येईल.
निवड झालेल्या उमेदवारांना एलअॅण्डटी हायड्रोकार्बन कंपनीतर्फे इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी-मद्रास येथे एमटेक-ऑफशोअर स्ट्रक्चरल इंजिनीअरिंग अभ्यासक्रम करण्यासाठी विशेष शिष्यवृत्ती देण्यात येईल.
वरील अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना एलअॅण्डटी हायड्रोकार्बन कंपनीतर्फे त्यांच्या विविध प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळू शकेल.
अधिक माहिती व तपशील : वरील शिष्यवृत्ती योजनेच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी एलअॅण्डटी हायड्रोकार्बन कंपनीच्या iitmtech@Lntehc.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : संगणकीय पद्धतीने कंपनीच्या http://www.Larsentoubro.com-Careers-Opportunities-L&T Hydrocarbon-IIT Scholarship या संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १० मे २०१३.
शिक्षणवृत्त : ‘एल अॅण्ड टी’ची विशेष शिष्यवृत्ती
लार्सन अॅण्ड टुब्रो उद्योग समूहांतर्गत असणाऱ्या ‘एल अॅण्ड टी हायड्रोकार्बन कंपनी’तर्फे निवडक व हुशार इंजिनीअर्सची इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, मद्रासच्या सहकार्याने एमटेक ऑफशोअर स्ट्रक्चरल इंजिनीअरिंग या विशेष अभ्यासक्रमात शिष्यवृत्तीसह निवड करण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे इंजिनीअरिंग पदवीधर उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत -
First published on: 06-05-2013 at 12:35 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Education news special scholarship of l t