कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य प्रशिक्षणक्रम
डीडस् (डेव्हलपमेन्ट एज्युकेशन एम्पॉवरमेन्ट ऑफ दि डिसअॅडव्हान्टेज्ड इन सोसायटी) या स्वयंसेवी संस्थेतर्फे कर्णबधिर मुलांसाठी विनामूल्य शिक्षण, व्होकेशनल ट्रेनिंग तसेच नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. या संस्थेतर्फे कर्णबधिर मुलांसाठी विनामूल्य ‘कुकरी अॅण्ड फूड प्रॉडक्शन’ प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या एक वर्षांच्या अभ्यासक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना पाच वेगवेगळ्या खाद्यपद्धतींतील १३५ पाककृती शिकवल्या जातील. त्याचप्रमाणे बेकरी, पाश्चिमात्य, कॉन्टिनेन्टल आणि चायनीज प्रकारच्या पाककृतींचे प्रशिक्षण दिले जाईल. फूड कावर्ि्हग, प्रेझेन्टेशन आणि सवर्ि्हग तंत्रही शिकवले जाईल. आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमादरम्यान विद्यावेतनही दिले जाईल. या अभ्यासक्रमादरम्यान इंग्रजीचे लेखी आणि संवादाचे मूलभूत प्रशिक्षणही दिले जाईल. या प्रशिक्षणाअंती कर्णबधिर विद्यार्थ्यांना पंचतारांकित हॉटेल्समध्ये प्रशिक्षण आणि नोकरीची संधीही मिळवून दिली जाते. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मुला-मुलींचे दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण असायला हवे आणि त्यांचे वय १५ ते ३० वर्षे असायला हवे. अधिक माहितीसाठी प्रतिभा राव यांच्याशी ९८२०२३११५८ या मोबाइल क्रमांकावर तसेच ०२२-२६०५८०४८ / ४९ या क्रमांकावर संपर्क साधावा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा