मागील लेखात आपण भावनिक बुद्धिमत्ता (Emotional Intelligence) या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेतील Ethics and Integrity या पेपरमधील घटकाविषयी माहिती करून घेतली. आजच्या लेखात आपण भावनिक बुद्धिमत्ता ही सर्वसामान्य बुद्धिमत्तेपेक्षा कशी वेगळी आहे, हे पाहणार आहोत. त्याआधी भावनांचे मानवी आयुष्यातील महत्त्व समजावून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. सर्वसामान्य बुद्धिमत्ता जेव्हा भावनांबरोबर जोडली जाते. तेव्हा त्या संयोगातून विलक्षण सामथ्र्य निर्माण होते.
भावनांचे महत्त्व – भावना हे शरीराचे संवादी माध्यम मानले जाते. त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे हे शरीरासाठी विघातक ठरू शकते. उच्च भावनिक बुद्धय़ांक असणाऱ्या व्यक्ती ज्याप्रमाणे अधिक यशस्वी असतात, त्याचप्रमाणे त्या अधिक निरोगी, आनंदी व नातेसंबंधात अधिक सुखी असतात.
उच्च भावनिक बुद्धय़ांक असणाऱ्या व्यक्तींमध्ये अनेक भावनांचा निरोगी समतोल आढळतो. जसे की – स्व-नियंत्रण, आनंद, इच्छा, मत्री, परिपूर्णता, प्रशंसा, जागरूकता, स्वायत्तता,  मानसिक शांतता, समाधान, स्वातंत्र्य.  
या उलट ज्या व्यक्तींचा भावनिक बुद्धय़ांक कमी असतो, त्यांना खालील भावनांच्या मिश्रणाला सामोरे जावे लागते. एकटेपणा, भीती, रिकामपण, दडपण, निराशा, बांधीलकी, अवलंबित्व,राग, चिडचिड, आळस, अस्थिरता इ.
म्हणूनच आपल्या एकंदर आनंदी व गुणवत्तापूर्ण आयुष्याकरिता उच्च भावनिक बुद्धिमत्ता निर्माण करणे आवश्यक आहे. या सगळ्यातून भावनिक बुद्धिमत्तेची एक व्याख्या खालीलप्रमाणे केली जाऊ शकते –
व्यक्तीच्या भावनांचा वापर करून घेऊन संवाद साधण्याची, लक्षात ठेवण्याची, वर्णन करण्याची, बोध घेण्याची, समजून घेण्याची, ओळखण्याची, भावना समजावून सांगण्याची आंतरिक क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय.
अर्थात भावनिक बुद्धिमत्ता व सामान्य बुद्धिमत्ता या दोघांमधील विसंगती व सारखेपणा यांचा बारकाईने विचार करणे यामध्येच भावनिक बुद्धिमत्ता समजून घेण्याचे सार एकवटले आहेत. म्हणूनच भावनांचा मेंदूशी काय संबंध आहे हे पाहणे गरजेचे ठरते.
भावना व मेंदू – भावनिक बुद्धिमत्ता हे सर्वसामान्य बुद्धिमत्तेच्या विरूद्ध क्षमता मोजणारे मापक नाही. भावनिक बुद्धिमत्ता व सर्वसामान्य बुद्धिमत्ता यांचा   अनोखा मिलाफ व्यक्तीची एकूण बुद्धिमत्ता ठरवत असतो.
म्हणूनच जी व्यक्ती उच्च भावनिक बुद्धिमत्ता असणारी असते, तिच्याकडे सर्वसामान्य बुद्धिमत्ता कमी असते किंवा नसते असा याचा अर्थ होत नाही. भावनिक बुद्धिमत्ता सर्वसामान्य बुद्धिमत्तेच्या विरुद्धचे वैशिष्टय़ नाही तर या दोन्ही बुद्धिमत्तांचे प्रकार एकमेकांस पूरक आहेत म्हणूनच स्वत:च्या भावनांवर उत्तम नियंत्रण असणारी व्यक्ती जिच्यामध्ये वरील निरोगी भावनांचा समतोल आढळतो, ती व्यक्ती सामान्य बुद्धिमत्तेचेदेखील उच्च प्रतीचे दर्शन घडवू शकते.
आपल्या सर्वानाच कधी ना कधी स्वत:च्या भावनांवर ताबा नसल्याचा अनुभव आला आहे. यामागील एक कारणमीमांसा म्हणजे भावनांचा आणि मेंदूचा गुंतागुंतीचा असलेला संबंध. पंचेंद्रियांकडून मिळालेला कोणताही संदेश हा मेंदूतील thalamus(थॅलॅमस) कडे पाठविला जातो व तेथून त्याचे रासायनिक संदेशात ‘भाषांतर’ केले जाते. अशा प्रकारे बहुतेक सर्व संदेश मेंदूच्या वस्तुनिष्ठपणे विचारप्रक्रिया करणाऱ्या केंद्रकाकडे पाठविले जातात. मात्र अशा संदेशांमध्ये भावनांचे मिश्रण असल्यास हे संदेश amygdala (अमिग्डेला) या मेंदूमधील भावनिक केंद्राकडे पाठविले जातात. याच वेळेस संदेशातील बहुतेक भाग हा मेंदूतील वस्तुनिष्ठपणे विचार करणाऱ्या केंद्रकाकडे पाठविला जातो व काही भाग सरळ अमिग्डेलाकडे जातो. मेंदूला या संदेशावर पूर्णपणे वस्तुनिष्ठपणे काम करण्याची संधी न देताच हा संदेश amygdala कडे जातो. म्हणजेच काही संदेशांसाठी प्रतिसाद हा केवळ लगेचच मिळणारा भावनिक प्रतिसादच असतो.
मेंदू आणि भावना यांच्यातील विकास हा अर्भकाच्या टप्प्यापासूनच होत असतो व मानवी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर भावनिक बुद्धिमत्तेचा स्तर बदलत असतो. इथे लक्षात घेण्यासारखा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण आपल्या भावनांना दूर लोटण्याचा किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचा अथवा त्यापासून सुटका करून घेण्याचा प्रयत्न करणे चूक आहे. आपल्या भावना या सतत आपल्या बरोबर असतात. आपल्या भावनांची मुळे आपल्या उत्क्रांतीमध्ये व जीवशास्त्रामध्ये दडलेली आहेत. आपल्या भावनांविषयी माहिती करून घेणे व त्यावर योग्य नियंत्रण मिळवणे हे आपल्यासाठी गरजेचे आहे.
अनेक संस्थांना व प्रशासकांना हे उत्तमरीत्या उमजले आहे की, केवळ कद  (Intelligence Quotient) व्यक्तीच्या यशाची अथवा गुणवत्तेची हमी देऊ शकत नाही.
वरील सर्व चच्रेचा आढावा घेतल्यास आपल्या असे लक्षात येते की, उत्तम प्रशासक ही व्यक्ती केवळ उत्तम सामान्य बुद्धिमत्ता असणारी असणे पुरेसे ठरत नाही. याच बाबीचा विचार करून आयोगाने मुख्य परीक्षेतील Ethics and Integrity या पेपरच्या माध्यमातून या विषयावर जास्त ऊहापोह घडवून आणल्याचे दिसून येते. तसेच मुळातच भावनिक बुद्धिमत्तेचे प्रशासनातील स्थान व महत्त्व उमेदवारांच्या लक्षात आणून देणे हा हेतूदेखील यामागे आहे.                                                                                                           
admin@theuniqueacademy.com
( भाग २ )

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
nda government set up a national commission to review the performance of constitution zws
संविधानभान : संविधानाच्या कामगिरीचा आढावा 
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
school students ai education
नवे वर्ष ‘एआय’चे; शिक्षण संस्थांना काय करावे लागणार?
Success Story Of Safin Hasan In Marathi
Success Story : जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेला भेट देताच मनात जागं झालं स्वप्न; यूपीएससी परीक्षेला जाताना बसला मोठा धक्का अन्…; वाचा ‘या’ आयपीएस अधिकाऱ्याची गोष्ट
rahul gandhi devendra fadnavis
Devendra Fadnavis: “…हेच राहुल गांधींचं एकमेव ध्येय”, देवेंद्र फडणवीसांची बीड-परभणी दौऱ्यावरून थेट टीका!
success story Of IPS Shakti Awasthi In Marathi
कोण आहे ‘हा’ आयपीएस अधिकारी? ज्यांना मुलाखतीत विचारला होता ‘3 Idiots’ चित्रपटाशी संबंधित प्रश्न
Story img Loader