केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेतील ‘सामान्य अध्ययन’ या घटकामध्ये ‘एथिक्स अॅण्ड इंटीग्रिटी’ या पेपरचा समावेश झाला आहे. त्या अनुषंगाने गेल्या काही लेखांमधून आपण नतिक तत्त्वज्ञ व नीतिनियमविषयक चौकटींची ओळख करून घेतली. याच पेपरमधील एक घटक म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता. उत्तम प्रशासक होण्याचा संबंध जितका बुद्धिमत्तेशी आहे, तितकाच तो भावनिक बुद्धिमत्तेशीदेखील आहे. हे लक्षात घेऊन भावनिक बुद्धिमत्ता (Emotional Intelligence) आणि वृत्ती (Attitude) या उपघटकांचा समावेश करण्यात आला आहे. आजच्या लेखात आपण भावनिक बुद्धिमत्ता म्हणजेच Emotional Intelligence याचा विचार करणार आहोत.
आपण अनेकदा सभोवताली अशा व्यक्ती बघतो ज्या अतिशय ‘बुद्धिमान’ व ‘हुशार’ असतात, मात्र आयुष्यातील साधी आव्हाने स्वीकारणे त्यांना अतिशय अवघड जाते. अनेकदा ‘बुद्धिमत्ता’ परीक्षेमध्ये गुण मिळवून देऊ शकत नाही अथवा कामाच्या ठिकाणी पुरेशी ‘बुद्धिमत्ता’ असूनही फारशी प्रगती साधता येत नाही. या आणि अशा अनेक वेगवेगळ्या घटनांमधून आपणास हे पाहता येते की, ‘बुद्धिमान’ व्यक्ती ही ‘यशस्वी’ व्यक्ती असतेच असे नाही; किंबहुना त्यांच्या अपयशाचे गमक हे त्यांच्या बुद्धिमत्तेच्या असण्याशी किंवा नसण्याशी जोडलेले नसून वेगळ्याच घटकांशी संबंधित असते.
भावनिक बुद्धिप्रामाण्याच्या अभ्यासाचे मूळ आपल्याला डार्वनिच्या सद्धांतिक कामामध्ये आढळून येते. डार्वनिने हे सर्वात प्रथम मांडले की, भावनिकरीत्या व्यक्त होता येणे हे तग धरून ठेवण्यासाठी (Survivalआवश्यक असते.
अनेक वर्षांच्या अभ्यासानंतर शास्त्रज्ञांना हे लक्षात आले आहे की, केवळ बुद्धिमत्ता तपासून बघणे (जी बुद्धिमत्ता चाचण्या/ बुद्धय़ांक – Intelligence test/ Intelligence quotient यामधून तपासली जाऊ शकते.) यामधून एखाद्या व्यक्तीच्या क्षमतांची पूर्ण पारख होऊ शकत नाही. सर्वसामान्यत: ‘बुद्धिमत्ता’ या शब्दामधून ज्या प्रकारच्या क्षमतांची अपेक्षा केली जाते, त्यापलीकडे जाऊन मानवी भावनांवर आधारित बुद्धिमापनाची नवीन प्रणाली विकसित करण्यात आली. भावनिक बुद्धिमत्ता (Emotional Intelligence) हा तुलनेने नवीन असा संशोधनाचा व अभ्यासाचा विषय आहे; परंतु चौकटीत म्हटल्याप्रमाणे या विचाराचे बीज आपल्याला डार्वनिच्या संशोधनातदेखील दिसून येते.
भावनिक बुद्धय़ांक (Emotional Quotient) जास्त असणाऱ्या व्यक्ती कामाच्या ठिकाणी अधिक यशस्वी होतात, असे अनेक पाहणीअंती सिद्ध झाले आहे.
बुद्धिमत्तेचे प्रकार
गेल्या शतकापर्यंत ‘बुद्धिमत्ता’ या संकल्पनेच्या कक्षा केवळ स्मरणशक्ती, आत्मसात करण्याचा वेग अथवा समस्या सोडवणूक म्हणजेच Cognitive Abilities (संज्ञानात्मक क्षमता) इथवरच रुंदावल्या होत्या. मात्र, विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात काही शास्त्रज्ञांनी बुद्धिमत्तेचे स्वरूप केवळ संज्ञानात्मक (Cognitive) नसून त्यापेक्षा पुष्कळच विस्तृत असल्याचे सिद्ध केले.
भावनिक बुद्धिमत्तेचा इतिहास
१९२० – एडवर्ड थॉर्नडाईक यांनी सर्वप्रथम ‘सामाजिक बुद्धिमत्ता’ अशी संकल्पना मांडली.
१९४० – डेव्हिड वेश्लर, कद चे जनक, यांनी हुशारी केवळ बुद्धिमत्तेवर अवलंबून नसल्याचे मत मांडले.
१९६६ – ल्यूनन (Leunen) यांनी एक (Emotional Intelligence) वर आधारित शोधनिबंध प्रसिद्ध केला.
१९७४ – क्लॉड स्टायनर यांनी ‘भावनिक साक्षरता’ या विषयावरील लेख प्रसिद्ध केला.
१९८३ – हॉवर्ड गार्डनर यांनी Multiple Intelligence वरील लिखाण प्रसिद्ध केले.
१९९० – पीटर सॅलोवे व जॅक मेयर यांनी आपली भावनिक बुद्धिमत्तेची मांडणी केली.
१९९५ – डॅनियल गोलमन यांनी भावनिक बुद्धिमत्तेवर आधारित पुस्तक प्रसिद्ध केले.
वरील चौकटीमध्ये भावनिक बुद्धिमत्तेवरील संशोधनाचा इतिहास मांडला आहे. यामधील काही सद्धांतिक चौकटी या काळाच्या मोजपट्टीवर जास्त खऱ्या उतरल्या आहेत. जसे की, हॉवर्ड गार्डनर यांनी केलेले काम Frames of Mind : The theory of multiple intelligence. यामध्ये त्यांनी मनुष्याकडे एकापेक्षा अधिक प्रकारच्या ‘बुद्धिमत्ता’ असल्याची संकल्पना मांडली.
एकूण सात विविध प्रकारच्या बुद्धिमत्तांचे त्यांनी प्रमुखत: वैयक्तिक (Intrapersonal)आणि आंतरवैयक्तिक (Intrapersonal) प्रकार पाडले. तसेच डॅनियल गोलमन यांनी Emotional Intelligence : Why it can matter more than IQ हे पुस्तक १९९५ मध्ये प्रसिद्ध केले. त्यांच्या या अतिप्रसिद्ध पुस्तकानंतर Emotional Intelligence अथवा भावनिक बुद्धिमत्ता ही संज्ञा अधिक प्रचलित झाली.
भावनांचे महत्त्व
डार्वनिने म्हटल्याप्रमाणे, शास्त्रज्ञांनी असे सिद्ध केले आहे की, भावनांमागे जीवशास्त्रीय कारण असते. भावना एक प्रकारे हे निदíशत करत असतात की, एखादी गोष्ट मानवाच्या गरजेनुसार पूर्ण होत आहे अथवा नाही. जेव्हा आपल्याला हवी असणारी गोष्ट/ वस्तू आपल्याला मिळत नाही किंवा पुरेशा प्रमाणात मिळत नाही, तेव्हा आपल्यामध्ये नकारात्मक भावना निर्माण होतात. यामध्ये राग, भीती, निराशा या आणि यांसारख्या भावनांचा समावेश होतो. व्यक्तीच्या त्याच्या भावनांवर असलेल्या नियंत्रणामधून किंवा त्याच्या अभावातून व्यक्तीला अनेक विविध परिणामांना सामोरे जावे लागते. हे परिणाम सामाजिक, मानसिक किंवा शारीरिकदेखील असू शकतात.
भावनिक बुद्धिमत्ता
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेतील ‘सामान्य अध्ययन’ या घटकामध्ये ‘एथिक्स अॅण्ड इंटीग्रिटी’ या पेपरचा समावेश झाला आहे.
आणखी वाचा
First published on: 25-11-2013 at 07:40 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Emotional intelligence