कर्मचारी निवड आयोगाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक निवड परीक्षा २०१३ अंतर्गत ११७६ जागा :
अर्जदार कुठल्याही विषयाचे पदवीधर व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा २५ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १७ ते २२ मार्च २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली कर्मचारी निवड आयोगाची जाहिरात पाहावी अथवा कर्मचारी निवड आयोगाच्या http:www.ssc.nic.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर तर विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज क्षेत्रीय निदेशक (पश्चिम रेल्वे), कर्मचारी निवड आयोग, पहिला मजला, साउथ विंग, प्रतिष्ठा भवन, १०१, महर्षी कर्वे मार्ग, मुंबई-४०००२० या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १२ एप्रिल २०१३.

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हायड्रॉलॉजीमध्ये संशोधकांच्या १२ जागा : उमेदवारांनी केमिकल, मेटॅलर्जी, सिव्हिल, कृषी, पर्यावरणशास्त्र, नैसर्गिक स्रोत इंजिनीअरिंगमधील पदवी अथवा एमएस्सी पात्रता चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २५ वर्षे.
या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २३ ते २९ मार्च २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हायड्रॉलॉजीची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज सीनिअर अ‍ॅडमिन. ऑफिसर, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हायड्रॉलॉजी, रुडकी २४७६६७ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १३ एप्रिल २०१३.

वेस्टर्न नेव्हल कमांडमध्ये लेबॉरेटरी डेमॉन्स्ट्रेटरच्या १५ जागा :
अर्जदारांनी भौतिकशास्त्र व रसायनशास्त्रासह बीएस्सी किंवा इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल इंजिनीअरिंगमधील पदविका उत्तीर्ण केलेली असावी व ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा २६ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २३ ते २९ मार्च २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली वेस्टर्न नेव्हल कमांडची जाहिरात वाचावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज दि फ्लॅग ऑफिसर- कमांडिंग इन- चीफ, हेडक्वार्टर्स, वेस्टर्न नेव्हल कमांड, शहीद भगतसिंह मार्ग, मुंबई-४००००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १४ एप्रिल २०१३.

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनमध्ये हिंदी अधिकाऱ्यांच्या ३ जागा :
उमेदवारांनी इंग्रजी विषयासह पदवी व त्यानंतर हिंदीतील पदव्युत्तर पात्रता अथवा हिंदी विषयासह पदवी व त्यानंतर इंग्रजीतील पदव्युत्तर पात्रता प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३० वर्षे.
यासंदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनच्या http://www.powergridindia.com  या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ एप्रिल २०१३.

राजा रामण्णा सेंटर फॉर अ‍ॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी- इंदोर येथे कुशल कामगारांच्या १३ जागा :
अर्जदारांनी १० वी वा १२ वीची परीक्षा कमीतकमी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण करून त्यानंतर इलेक्ट्रॉनिक, इन्स्ट्रमेंटेशन, फिटर, इलेक्ट्रिकल यांसारख्या विषयातील राष्ट्रीय स्तरावरील कौशल्य पात्रता पूर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २२ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १४ ते २२ मार्च २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली राजा रामण्णा सेंटरची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर-३, राजा रामण्णा सेंटर फॉर अ‍ॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी, डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅटॉमिक एनर्जी, पोस्ट ऑफिस- सीएटी, इंदोर- ४५२०१३ (मप्र) या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १५ एप्रिल २०१३.

रिझव्‍‌र्ह बँकेत खेळाडूंसाठी सहाय्यकांच्या ५० जागा :
अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत व त्यांनी क्रिकेट, फुटबॉल, टेबलटेनिस यांसारख्या क्रीडा प्रकारात राज्य वा राष्ट्रीय स्तरावर विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावलेली असावी. वयोमर्यादा २६ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २३ ते २९ मार्च २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाची जाहिरात पाहावी अथवा रिझव्‍‌र्ह बँकेच्या http://www.rbi.org.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि डिमांड ड्राफ्टसह असणारे अर्ज साध्या टपालाने रिजनल डायरेक्टर, रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया, रिक्रुटमेंट सेक्शन, मुंबई सेंट्रल, मुंबई-४००००८
या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख -१५ एप्रिल २०१३.   

Story img Loader