अर्जदार गणित, रसायनशास्त्र वा भौतिकशास्त्र या विषयांसह विज्ञान विषयातील पदवी घेतलेली असावी अथवा ते इंजिनीअरिंगमधील पदविकाधारक असायला हवेत.
वयोमर्यादा २५ वर्षे.
या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ११ ते १७ जानेवारी २०१४च्या अंकात प्रकाशित झालेली नौदल गोदी- मुंबईची जाहिरात पाहावी अथवा नौदल गोदीच्या http://www.godiwadabhartee.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ फेब्रुवारी २०१४.

नौदल गोदी-मुंबई येथे कुशल कामगारांसाठी ३४७ जागा :
अर्जदार शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेले असावेत व त्यांनी मेकॅनिक विषयातील अँप्रेंटिसशिप उमेदवारी पूर्ण केलेली असावी. ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत व त्यांना सैन्य दलाच्या तांत्रिक विभागातील संबंधित कामाचा
२ वर्षांचा अनुभव असायला हवा. इंग्रजीचे ज्ञान आवश्यक.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ११ ते १७ जानेवारी २०१४च्या अंकात प्रकाशित झालेली नौदल गोदी मुंबईची जाहिरात पाहावी अथवा नौदल गोदीच्या http://www.godiwadabhartee.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ फेब्रुवारी २०१४.

पॉवर फायनान्स कॉपरेरेशनमध्ये ज्युनिअर अकाऊंटंटच्या ५ जागा :
उमेदवारांनी बी.कॉम. पदवी ६०% गुणांसह अथवा एम.कॉम.-पदव्युत्तर पदवी कमीत कमी ५५% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांना संबंधित कामाचा ६ वर्षांचा अनुभव असायला हवा. वयोमर्यादा ३४ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ११ ते १७ जानेवारी २०१४च्या अंकात प्रकाशित झालेली पॉवर फायनान्स कॉपरेरेशनची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि तपशिलासह असणारे अर्ज दी सीनिअर मॅनेजर (एचआर), पॉवर फायनान्स कॉपरेरेशन लि. १- ऊर्जा निधी, बाराखंबा लेन, नवी दिल्ली ११०००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ५ फेब्रुवारी २०१४.

एनटीपीसीमध्ये अकाऊंटंटच्या ३८ जागा :
 उमेदवारांना चार्टर्ड अकाऊंटंसी वा कॉस्ट अकाऊंटंसीची पात्रता पूर्ण केलेली असावी व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असावा.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १८ ते २४ जानेवारी २०१४च्या
अंकात प्रकाशित झालेली ‘एनटीपीसी’ची जाहिरात पाहावी अथवा ‘एनपीटीसी’च्या http://www.ntpccareers.net या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १० फेब्रुवारी २०१४.

न्यूक्लिअर पॉवर कॉपरेरेशनमध्ये मेकॅनिकल इंजिनीअर्सच्या ६ जागा :
अर्जदारांनी मेकॅनिकल इंजिनीअरिंगमधील पदविका कमीत कमी ६०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २५ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ११ ते १७ जानेवारी २०१४च्या अंकात प्रकाशित झालेली न्यूक्लिअर पॉवर कॉपरेरेशन ऑफ इंडियाची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले आणि आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज मॅनेजर (एचआर) एचआरएम सेक्शन, न्यूक्लिअर पॉवर कॉपरेरेशन ऑफ
इंडिया लिमिटेड, मद्रास अ‍ॅटॉमिक पॉवर स्टेशन, कालपक्कम ४०३१०२ (तामिळनाडू) या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ५ फेब्रुवारी २०१४.   

Story img Loader