अर्जदारांनी शालान्त परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी व त्यानंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची मशिनिस्ट, फिटर, मेकॅनिक, इलेक्ट्रोप्लेटर, वेल्डर, पेंटर, डिझेल मेकॅनिक, पॉवर इलेक्ट्रिशियन, प्लंबर, रिगर यासारखी पात्रता परीक्षा ६०% गुणांसह उत्तीर्ण झालेली असावी. वयोमर्यादा २० वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २८ सप्टेंबर- ४ ऑक्टोबर २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली नेव्हल डॉकयार्ड- मुंबईची जाहिरात पाहावी.
संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील व कागदपत्रांसह असणारे अर्ज डॉकयार्ड अ‍ॅप्रेंटिस स्कूल, नेव्हल डॉकयार्ड, मुंबई ४०००२३ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर २०१३.
जिऑलॉजिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडियामध्ये असिस्टंट जिऑलॉजिस्टच्या ६६ जागा  
अर्जदारांनी भौतिकशास्त्र, भूगर्भशास्त्र वा गणित विषयातील पदव्युत्तर पदवी वा अभियांत्रिकीमधील पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३० वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २८ सप्टेंबर- ४ ऑक्टोबर २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या http://www.upsconline.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख  १८ ऑक्टोबर २०१३.
नौदलात पायलट म्हणून संधी  
अर्जदार पुरुष वा महिला उमेदवारांनी बारावीची परीक्षा गणित व भौतिकशास्त्र विषयांसह उत्तीर्ण करून त्यानंतर कुठल्याही विषयातील पदवी घेतलेली असावी व ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा २४ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी भारतीय नौदलाच्या http://www.nausena-bharti.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी अथवा प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली नौदलाची जाहिरात पाहावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख  १८ ऑक्टोबर २०१३.
भारत पेट्रोलियम क्राफ्टस्मनच्या १० जागा
अर्जदारांनी मेकॅनिकल, इन्स्ट्रमेंटेशन इंजिनीयरिंगमधील पदविका पात्रता प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांना संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव असायला हवा. वयोमर्यादा ३० वर्षे.
या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २८ सप्टेंबर- ४ ऑक्टोबर २०१३च्या अंकात प्रकाशित झालेली भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या http://www.bpclcareers.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज दि चीफ मॅनेजर (एचआर), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि., मुंबई रिफायनरी, माहूल, मुंबई ४०००७४ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १८ ऑक्टोबर २०१३.
आयुध निर्माणी- कानपूर येथे कुशल कामगारांच्या १०६ जागा अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण झालेले असावेत व त्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची मशिनिस्ट, टर्नर, फिटर, ग्राइंडर, मिलराईट, इलेक्ट्रिशियन, फिटर, पेंटर यासारखी पात्रता धारण केलेली असावी व ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा ३२ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २८ सप्टेंबर- ४ ऑक्टोबर २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली आयुध निर्माणी- कानपूरची जाहिरात पाहावी अथवा आयुध निर्माणीच्या  http://www.fieldauuindia.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते शुल्क आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज जनरल मॅनेजर, फिल्ड गन फॅक्टरी, काल्पी रोड, कानपूर (उप्र) २०८००९ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १८ ऑक्टोबर २०१३.
दक्षिण-पूर्व रेल्वेत स्काऊटस् व गाईडसाठी १० जागा  
अर्जदाराने शालान्त परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. याशिवाय त्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची पात्रता पूर्ण केलेली असावी व त्यांनी आणि गाईडस्विषयक प्रावीण्य प्राप्त केलेले असावे. वयोमर्यादा ३३ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २१ ते २७ सप्टेंबर २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली दपू रेल्वेची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या तपशिलासह असणारे अर्ज असिस्टंट पर्सोनेल ऑफिसर (रिक्रुटमेंट), साऊथ इस्टर्न रेल्वे, ११, गार्डन रिच रोड, कोलकाता ७०००४३ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २१ ऑक्टोबर २०१३.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा