अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत व त्यांनी क्रिकेट, बॅडमिंटन व टेबल टेनिस यासारख्या विषयात राष्ट्रीय स्तरावर विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेली असावी. वयोमर्यादा २७ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २ ते ८ नोव्हेंबर २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली ऑडिटर जनरल- महाराष्ट्रची जाहिरात पाहावी अथवा http://www.cag.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले आणि आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज डेप्युटी अकाउण्टण्ट जनरल (अ‍ॅडमिनिस्ट्रेशन), ऑफिस ऑफ दि अकाउण्टण्ट जनरल (अ‍ॅडिट), महाराष्ट्र – मुंबई ४०००२० या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ५ डिसेंबर २०१३.
सेंट्रल राईस रिसर्च इन्स्टिटय़ूट- कटक येथे टेक्नीशियन फार्म असिस्टंटच्या १३ जागा
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व कृषी विज्ञान- कृषी तंत्रज्ञान विषयातील पदविकाधारक असायला हवेत. अनुभवी उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. वयोमर्यादा ३० वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली सेंट्रल राईस रिसर्च इन्स्टिटय़ूटची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील कागदपत्रांसह असणारे अर्ज डायरेक्टर, सेंट्रल राईस रिसर्च इन्स्टिटय़ूट, कटक ७५३००० (ओडिशा) या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ६ डिसेंबर २०१३.
संरक्षण उत्पादन विभागात कनिष्ठ संशोधन अधिकारी-मेकॅनिकलच्या ८ जागा
अर्जदार मेकॅनिकलमधील पदवीधर असावेत व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा. अनुभवी उमेदवारांना प्राधान्य. वयोमर्यादा ३० वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ९ ते २५ नोव्हेंबर २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या http://www.upsconline.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ डिसेंबर २०१३.
सशस्त्र सीमा दलात हेडकॉन्स्टेबल-साहाय्यकांच्या ११० जागा
अर्जदार बारावी उत्तीर्ण असावेत. त्यांनी टंकलेखनाची ३५ शब्द प्रतिमिनीट पात्रता पूर्ण केलेली असावी. संगणकाचे ज्ञान व शारीरिकदृष्टय़ा पात्र असणे आवश्यक. वयोमर्यादा २५ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ९ ते १५ नोव्हेंबर २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली सशस्त्र सीमा दलाची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि डिमांड ड्राफ्टसह असणारे अर्ज दि डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल, सेक्टर एचक्यू, एसएसबी-खीडगा पोस्ट ऑफिस, सुसृता नगर, जि. दार्जिलिंग (प. बंगाल) २३४०१२ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ७ डिसेंबर २०१३.
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ हॉर्टिकल्चरल रिसर्च-बंगळुरू येथे कृषी साहाय्यकाच्या ५६ जागा
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व कृषी तंत्रज्ञान-औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पात्रताधारक असायला हवेत. वयोमर्यादा २५ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ९ ते १५ नोव्हेंबर २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ हॉर्टिकल्चरल रिसर्चची जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या http://www.iihr.eruet.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज डायरेक्टर, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ हॉर्टिकल्चर रिसर्च, देसरगट्टा लेक पोस्ट, बंगळुरू ५६००८९ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ८ डिसेंबर २०१३.
अकाउण्टण्ट जनरल कार्यालय-हरियाणा येथे खेळाडूंसाठी ऑडिटरच्या ८ जागा
अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत व त्यांनी फुटबॉल, क्रिकेट व हॉकी यासारख्या क्रीडा प्रकारात राष्ट्रीय स्तरावर विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेली असावी.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ९ ते १५ नोव्हेंबर २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली अकाउण्टण्ट जनरल- हरियाणाची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील व कागदपत्रांसह असणारे अर्ज डेप्युटी अकाउण्टण्ट जनरल (अ‍ॅडमिनिस्ट्रेशन) हरियाणा- चंदिगड या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ९ डिसेंबर २०१३.

Story img Loader