अर्जदार बीएस्सी असावेत अथवा त्यांनी इंजिनीअरिंगमधील पदविका पूर्ण केलेली असावी. अनुभवी उमेदवारांना प्राधान्य. वयोमर्यादा ३० वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ५ ते १२ जुलै २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट-खरगपूरची जाहिरात पाहावी अथवा आयआयटीच्या http://www.iitkgp.ac.in/ topfiles/non-teaching-top.php या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज असिस्टंट रजिस्ट्रार, ई-३, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, खरगपूर ७२१३०२ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३० जुलै २०१३.
रस्ते विकास मंत्रालयात चालक-मेकॅनिकच्या ६१२ जागा उपलब्ध :
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत व त्यांच्याजवळ अवजड वाहन चालविण्याचा परवाना असायला हवा. वयोमर्यादा २८ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ८ ते १४ जून २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाची जाहिरात पाहावी अथवा मंत्रालयाच्या www.bro.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज कमांडंट-जीआरईएफ सेंटर, दिघी कँप, पुणे ४११ ०१५ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची
तारीख ३० जुलै २०१३.
फूड कॉर्पोरेशनमध्ये मॅनेजमेंट ट्रेनीजच्या ४६० जागा :
अर्जदारांनी कृषी वा इंजिनीअरिंगसह कुठल्याही विषयातील पदवी प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण केलेली असावी अथवा एमबीए, सीए, आयसीडब्ल्यूए अथवा कंपनी सेक्रेटरीविषयक पात्रता चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २८ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ६ ते १२ जुलै २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची जाहिरात पाहावी अथवा एफसीआयच्या www.jobsportal.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०१३.
ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस-पाटणा येथे परिचारिकांच्या ६०० जागा :
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण झालेले असावेत आणि त्यांचे नर्सिग काउन्सिलकडे नोंदणी झालेली असावी. अनुभवी उमेदवारांना प्राधान्य. वयोमर्यादा ३० वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ८ ते १२ जुलै २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेसची जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या www.aiimspatna.org या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०१३.
संरक्षण उत्पादन विभाग- खडकी येथे कुशल कामगारांच्या ४ जागा :
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण झालेले असावेत व त्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची सुतारकाम, मशिनिस्ट, फिटर, पेंटर, पॅकर यांसारखी पात्रता परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २७ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २२ ते २८ जुलै २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली संरक्षण उत्पादन विभाग, खडकीची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज दि कंट्रोलर, सीक्यूएस (एमई), औंध रोड, खडकी-पुणे ४११ ०२० या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १ ऑगस्ट २०१३.
सशस्त्र सीमा बलात चालकांच्या ६४५ जागा :
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण झालेले असावेत. ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत व त्यांच्याजवळ अवजड वाहन चालविण्याचा परवाना असायला हवा. वयोमर्यादा २८ वर्षे. यासंदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २२ ते २८ जून २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली सशस्त्र सीमा बलाची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि डिमांड ड्राफ्टसह असणारे अर्ज दि इन्स्पेक्टर जनरल, एफटीआर-एचक्यू, एसएसबी- राणीडांगा, पोस्ट-माटीपारा, जि. दार्जिलिंग (प. बंगाल) ७३४०१० या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १ ऑगस्ट २०१३.
छात्र-सैनिकांसाठी सैन्यदलात ५० जागा :
अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर आणि शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत व त्यांनी छात्र-सेनेची ‘सी’ प्रमाणपत्र पात्रता पूर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २५ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २९ जून ते ५ जुलै २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली सैन्यदलाची जाहिरात पाहावी अथवा सैन्यदलाच्या http://www.joinindianarmy.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
पात्रताधारक छात्र-सैनिकांनी संपूर्णपणे भरलेले अर्ज आपल्या संबंधित छात्रसेना मुख्यालयात जमा करण्याची शेवटची तारीख १ ऑगस्ट २०१३.
रोजगार संधी: आयआयटी-खरगपूर येथे टेक्निशियन्स-साठी १५ जागा
अर्जदार बीएस्सी असावेत अथवा त्यांनी इंजिनीअरिंगमधील पदविका पूर्ण केलेली असावी. अनुभवी उमेदवारांना प्राधान्य. वयोमर्यादा ३० वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ५ ते १२ जुलै २०१३ च्या अंकात प्रकाशित
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 29-07-2013 at 08:41 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Employment opportunities