इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ इंटेग्रेटिव्ह मेडिसीनमध्ये टेक्निकल असिस्टंट १७ जागा :
उमेदवारांनी बीएस्सी- विज्ञान, बीएस्सी- कृषी अथवा बीफार्म पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २५ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १५ ते २१ जून २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ इंटेग्रेटिव्ह मेडिसीनची जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्याwww.iiim.res.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जुलै २०१३.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सेंट्रल सायंटिफिक इन्स्ट्रमेंटस ऑर्गनायझेशनमध्ये टेक्निकल असिस्टंटच्या ४ जागा :
अर्जदार बारावी उत्तीर्ण व इंजिनीअरिंगमधील पदविकाधारक असायला हवेत. अनुभवी उमेदवारांना प्राधान्य. वयोमर्यादा २८ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ८ ते १४ जून २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली सीएसआयआर- सेंट्रल सायंटिफिक इन्स्ट्रमेंट्स ऑर्गनायझेशनची जाहिरात पाहावी अथवा ऑर्गनायझेशनच्या www.csio.res.in या  संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेत स्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ जुलै २०१३.
भारतीय कंटेनर निगममध्ये सीनिअर असिस्टंट (फायनान्स अ‍ॅण्ड अकाऊंट्सच्या) १८ जागा : अर्जदारांनी बीकॉम पात्रता कमीत कमी ५०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांना संगणकाचे ज्ञान असायला हवे. वयोमर्यादा २८ वर्षे.
अधिक माहिती व अर्जाच्या नमुन्यासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १५ ते २१ जून २०१३ च्या अंकात प्रकाशित  झालेली कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची जाहिरात पाहावी अथवा कॉपोरेशनच्या www.concarindia.co.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जुलै २०१३.

अणु-ऊर्जा विभागात टेक्निशियन्सच्या ८ जागा :
अर्जदारांनी बारावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी व ते आयटीआय पात्रताधारक असावेत. वयोमर्यादा २५ वर्षे.
यासंदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी अणु-ऊर्जा विभाग- कालपक्कमच्या http//www.igcar.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जुलै २०१३.

सैन्यदलात बारावी उत्तीर्णासाठी ८५ जागा : अर्जदारांनी १०+२ शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत बारावीची परीक्षा गणित, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र हे विषय घेऊन व कमीत कमी ६०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत.
वयोगट- १६.५ ते १९.५ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १८ ते २४ एप्रिल २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली सैन्यदलाची जाहिरात पाहावी अथवा सैन्यदलाच्या www.joinarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेत स्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जुलै २०१३.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Employment opportunities