हिंदुस्थान एरोनॉटिक्समध्ये पदवीधर इंजिनीअर्ससाठी २०० जागा :
अर्जदारांनी एरोनॉटिकल, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल, मेटॅलर्जी, प्रॉडक्शन इंजिनीअरिंग यांसारख्या विषयातील पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी.
यासंदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी हिंदुस्थान एरोनॉटिकच्या http://www.hal-india.com/careersnew.com  या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख  ११ ऑक्टोबर २०१३.
मध्य-पूर्व रेल्वेमध्ये कुशल कामगारांसाठी २३४४ जागा :
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण झालेले असावेत व त्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची पात्रता पूर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३३ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १४ ते २० सप्टेंबर २०१३च्या अंकात प्रकाशित झालेली मध्य-पूर्व रेल्वेची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि पोस्टल ऑर्डरसह असणारे अर्ज असिस्टंट पर्सोनेल ऑफिसर (आरआरसी), रेल्वे रिक्रूटमेंट सेल, मध्य पूर्व रेल्वे, पोल्सन कॉम्प्लेक्स, दिघा घाट, पाटणा (बिहार) ८०००११ येथे पाठवा. शेवटची तारीख १४ ऑक्टोबर २०१३.
भारत कोकिंग कोलमध्ये माइनिंगविषयक  ४७२ जागा :
अर्जदारांनी माइिनगविषयक पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा व त्याशिवाय त्यांनी ओव्हरमन्स सर्टिफिकेट व प्रथमोपचार पात्रता पूर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३० वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ७ ते १३ सप्टेंबर २०१३च्या अंकात प्रकाशित झालेली भारत कोकिंग कोलची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज दि जनरल मॅनेजर (रिक्रूटमेंट), भारत कोकिंग कोल लिमिटेड, कोयला भवन, कोयला नगर, पोस्ट-बीसीसीएल टाऊनशिप, धनबाद-८२६००५ (झारखंड) या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १० ऑक्टोबर २०१३.
सफदरजंग रुग्णालय- दिल्ली येथे फिजिओथेरपीच्या आठ जागा :
अर्जदार फिजिओथेरपीमधील पदवीधर व पदव्युत्तर पात्रताधारक असावेत व त्यांना संबंधित कामाचा दोन वर्षांचा अनुभव असायला हवा.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ७ ते १३ सप्टेंबर २०१३च्या अंकात प्रकाशित झालेली सफदरजंग रुग्णालय- दिल्लीची जाहिरात पाहावी अथवा सफदरजंग रुग्णालयाच्या http://www.vmmc.sjh.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज डेप्युटी डायरेक्टर (अ‍ॅडमिनिस्ट्रेशन), सफदरजंग रुग्णालय, नवी दिल्ली-११००२९ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ९ ऑक्टोबर २०१३.
राजीव गांधी औद्योगिकी विश्वविद्यालयात संशोधनपर संधी :
अर्जदारांनी संगणक विज्ञान, बायो-टेक्नॉलॉजी, सिव्हिल इंजिनीअरिंग, मेकॅनिकल इंजिनीअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग यांसारख्या विषयातील पदव्युत्तर पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २१ ते २७ सप्टेंबर २०१३च्या अंकात प्रकाशित झालेली राजीव गांधी औद्योगिकी विश्व-विद्यालयाची जाहिरात पाहावी अथवा विश्वविद्यालयाच्या http://www.rgpv.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज रजिस्ट्रार, राजीव गांधी औद्योगिकी विश्वविद्यालय, एअरपोर्ट बायपास रोड, गांधी नगर, भोपाळ-४६२०३३ (मप्र) या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ११ ऑक्टोबर २०१३.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा