एनटीपीसीमध्ये पदवीधर इंजिनीअर्ससाठी संधी  
अर्जदारांनी इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, इन्स्ट्रमेंटेशन इंजिनीअरिंगमधील पदवी परीक्षा चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांनी ‘जीएटीई-२०१४’ ही प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १४ ते २० सप्टेंबर २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली एनटीपीसीची जाहिरात पाहावी अथवा एनटीपीसीच्या http://www.ntpc.co.inया संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १ ऑक्टोबर २०१३.
पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनीअर्ससाठी संधी  
उमेदवारांनी इलेक्ट्रिकल पॉवर, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, पॉवर सिस्टीम इंजिनीअरिंगमधील पदवी कमीतकमी ६०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्याशिवाय, ‘जीएटीई-२०१४’ ही प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेन्ट न्यूज’च्या ३१ ऑगस्ट- ६ सप्टेंबर २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनची जाहिरात पाहावी अथवा कॉर्पोरेशनच्या http://gate.iitkgp.ac.in/gate 2014 या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ ऑक्टोबर २०१३.
केंद्रीय नियोजन विभागात सांख्यिकी अधिकाऱ्यांच्या २० जागा  
अर्जदारांनी अर्थशास्त्र, गणित व सांख्यिकी विषयांसह पदवी व त्यानंतर सांख्यिकी विषयातील पदव्युत्तर पदवी घेतलेली असावी व त्यांना संबंधित कामाचा सुमारे १ वर्षांचा अनुभव असायला हवा. वयोमर्यादा ३० वर्षे.
अर्जाचा नमुना, इतर तपशील व माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १४ ते २० सप्टेंबर २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या http://www.upsconline.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ ऑक्टोबर २०१३.
हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये पदवीधर इंजिनीअर्ससाठी संधी  
अर्जदारांनी  मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन व इन्स्ट्रमेंटेशन इंजिनीअरिंगमधील पदवी परीक्षा कमीतकमी ६०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ७ ते १३ सप्टेंबर २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनची जाहिरात पाहावी अथवा एचपीसीएलच्या http://www.hpclcareers.com  अथवा http://www.hindustanpetroleum.com  या संकेतस्थळांना भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळांवर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ ऑक्टोबर २०१३.
‘गेल’ इंडियामध्ये सीनियर इंजिनीअर्स- बॉयलरच्या २२ जागा  
अर्जदार मेकॅनिकल इंजिनीअर्समधील पदवीधर वा पदविकाधारक आणि बॉयलरविषयक पात्रताधारक असावेत व त्यांना संबंधित कामाचा अनुभव असायला हवा. वयोमर्यादा ३० वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘गेल’ इंडियाच्या http://www.gailonline.com  या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज एचआर हेड, ‘गेल’ (इंडिया लिमिटेड, ‘गेल’ भवन, १६, भिकमजी कामा प्लेस, नवी दिल्ली-११००६६ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ५ ऑक्टोबर २०१३.
भारत हेवी इलेक्ट्रिकल्समध्ये कुशल कामगारांसाठी ८०० जागा  
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण झालेले असावेत व त्यांनी मशिनिस्ट, टर्नर, फिटर, ब्लॅकस्मिथ, वेल्डर, सुतारकाम वा इलेक्ट्रिशियन विषयातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा अभ्यासक्रम कमीतकमी ६०% गुणांसह उत्तीर्ण केलेला असावा. वयोमर्यादा ३० वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंन्ट न्यूज’ १४ ते २० सप्टेंबर २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली भारत हेवी इलेक्ट्रिकल्सची जाहिरात पाहावी अथवा बीएचईएलच्या http://careers.bhd.in  अथवा http://www.bhdhyderabad.com या संकेतस्थळांना भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ ऑक्टोबर २०१३.