अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पात्रताधारक असायला हवेत. वयोमर्यादा ३३ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ३० नोव्हेंबर- ६ डिसेंबर २०१३च्या अंकात प्रकाशित झालेली पश्चिम रेल्वेची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज असिस्टंट पर्सोनेल ऑफिसर (रिक्रूटमेंट), रेल्वे रिक्रूटमेंट सेल- वेस्टर्न रेल्वे, पार्सल डेपो, अलियाई प्रेमजी मार्ग, ग्रँट रोड (पूर्व), मुंबई ४०० ००७ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख
१४ जानेवारी २०१४.
पूर्व तटीय रेल्वेमध्ये स्काऊट-गाइडस्साठी ८ जागा
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण झालेले असावेत व त्यांनी स्काऊट व गाइडस्मध्ये विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावलेली असावी. वयोमर्यादा
३३ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ३० नोव्हेंबर-
६ डिसेंबर २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली पूर्व तटीय रेल्वेची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज दि असिस्टंट पर्सोनल ऑफिसर (रिक्रूटमेंट), दुसरा मजला, साऊथ ब्लॉक, रेल सदन, पोस्ट मंचेश्वर, भुवनेश्वर, ओडिशा ७५१ ०१७ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १४ जानेवारी २०१४.
उत्तर रेल्वेमध्ये खेळाडूंसाठी ६ जागा
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण झालेले असावेत व त्यांनी अ‍ॅथलेटिक्स व व्हॉलीबॉल या क्रीडा प्रकारात राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष कामगिरी बजावलेली असावी. वयोमर्यादा २५ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’ च्या २३ ते २९ नोव्हेंबर २०१३च्या अंकात प्रकाशित झालेली उत्तर रेल्वेची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज डिव्हिजनल स्पोर्टस सेक्रेटरी, स्पोर्टस सेल, डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर ऑफिस, नॉर्दन रेल्वेज, लखनऊ (उप्र) या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १५ जानेवारी २०१४.
पश्चिम-मध्य रेल्वेमध्ये कुशल कामगारांच्या ४५१७ जागा
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पात्रताधारक व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा ३३ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १४ ते २० डिसेंबर २०१३च्या अंकात प्रकाशित झालेली पश्चिम-मध्य रेल्वेची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज रेल्वे रिक्रूटमेंट सेल, वेस्ट सेंट्रल रेल्वे, नेहरू रेल्वे कॉलनी, हौबाग, जबलपूर (मप्र) ४८२ ००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १५ जानेवारी २०१४.
‘एनटीपीसी’मध्ये प्रशिक्षार्थी इंजिनीअर्ससाठी संधी
उमेदवारांनी इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, इंस्ट्रुमेंटेशन इंजिनीअरिंगमधील पदवी परीक्षा चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांनी ‘गेट-२०१४’ ही पात्रता परीक्षा दिलेली असावी.
या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या
२१ ते २७ डिसेंबर २०१३च्या अंकात प्रकाशित झालेली एनटीपीसीची जाहिरात पाहावी अथवा एनटीपीसीच्या http://www.ntpc.co.in किंवा  http://www.ntpccareers.net या संकेतस्थळांना भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ जानेवारी २०१४.
सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्समध्ये इंजिनीअर्ससाठी १० जागा
उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन अथवा मेकॅनिकल इंजिनीअरिंगमधील पदवी अथवा पदव्युत्तर पदवी कमीत कमी ६५% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांनी जीएटीई-२०१४ ही प्रवेश पात्रता पूर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २७ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ५ ते ११ ऑक्टोबर २०१३च्या अंकात प्रकाशित झालेली सेंट्रल इलेक्ट्रॉनिकची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज असिस्टंट जनरल मॅनेजर (एचआरडी), सेंट्रल इलेक्ट्रॉनिक लि. शाहिदाबाद (जि. गाजियाबाद), उप्र २०१ ०१० या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २० जानेवारी २०१४.   

Story img Loader