उमेदवारांनी मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन अथवा इन्स्ट्रमेन्टेशन इंजिनीअरिंगमधील पदवी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्याशिवाय त्यांनी जीएटीई- २०१४ ही प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी. वयोमर्यादा २५ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या http://www.hpclcareers.com अथवा http://www.hindustanpetroleum.com या संकेतस्थळांना भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ जानेवारी २०१४.
‘इस्रो’मध्ये टेक्निशियन्ससाठी ६० जागा
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण असावेत व त्यांनी फिटर, प्लंबर, डिझेल मेकॅनिक, रेफ्रिजरेशन, वेल्डर, पंप ऑपरेटर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक, मेकॅनिक यासारख्या विषयातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची पात्रता पूर्ण केलेली असावी.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २१ ते २७ डिसेंबर २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली ‘इस्रो’ची जाहिरात पाहावी अथवा ‘इस्रो’च्या http://www.shar.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, रिक्रुटमेंट सेक्शन, सतीश धवन स्पेस सेंटर- सहार, श्रीहरिकोटा, ५२४१२४, जि. नेल्लोर, आंध्र प्रदेश या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १० जानेवारी २०१४.
सैन्यदलात खानपान अधिकाऱ्यांच्या ७ जागा
अर्जदार बारावी उत्तीर्ण झालेले असावेत व त्यांनी कॅटरिंग टेक्नॉलॉजी वा हॉटेल मॅनेजमेंटमधील पदविका उत्तीर्ण केलेली असावी. हिंदी व इंग्रजीचे ज्ञान आवश्यक. वयोमर्यादा २७ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ७ ते १३ डिसेंबर २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली सैन्यदलाच्या खानपान विभागाची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज आर्मी सप्लाय कॉर्पस् सेंटर (साऊथ), पोस्ट आग्रम, बंगळुरू- ५६०००७ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ११ जानेवारी २०१४.
आयुध निर्माणी- इटारसी येथे फायरमनच्या १३ जागा
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण झालेले असावेत व त्यांनी अग्निशमनविषयक प्रशिक्षण- पात्रता पूर्ण केलेली असावी.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २१ ते २७ डिसेंबर २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली आयुध निर्माणी- इटारसीची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज जनरल मॅनेजर, ऑर्डनन्स फॅक्टरी, इटारसी, मध्य प्रदेश- ४६११२२ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १२ जानेवारी २०१४.
एअर फोर्स कॉमन अॅडमिशन टेस्ट- २०१४
अर्जदारांनी इंजिनीअरिंगसह कुठल्याही विषयातील पदवी कमीत कमी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा २३ वर्षे.
यासंदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १४ ते २० डिसेंबर २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली भारतीय हवाई दलाची जाहिरात पाहावी अथवा हवाई दलाच्या http://www.careerairforce.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ जानेवारी २०१४.
सीमा सुरक्षा दलात स्टेनोग्राफर्सच्या २५ जागा
अर्जदार बारावीची परीक्षा उत्तीर्ण व लघुलेखनाची ८० शब्द प्रतिमिनिट, तर टंकलेखनाची ३५ शब्द प्रतिमिनिट पात्रता उत्तीर्ण झालेले असावेत व ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा २५ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १४ ते २० डिसेंबर २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली सीमा सुरक्षा दलाची जाहिरात पाहावी अथवा बीएसएफच्या http://www.bsf.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जानेवारी २०१४.
राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था, गोवा येथे टेक्निशियन्सच्या ५ जागा
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण झालेले असावेत व त्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची पात्रता पूर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २८ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १४ ते २० डिसेंबर २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र असणारे अर्ज कंट्रोलर ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशनोग्राफी, दोना पावला, गोवा- ४०३००४ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १३ जानेवारी २०१४.
हिंदुस्थान पेट्रोलियममध्ये प्रशिक्षणार्थी इंजिनीअर्ससाठी संधी
उमेदवारांनी मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन अथवा इन्स्ट्रमेन्टेशन इंजिनीअरिंगमधील पदवी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी
First published on: 06-01-2014 at 01:04 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Employment opportunities