उमेदवारांनी बीएस्सी पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २५ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ८ ते १४ फेब्रुवारी २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशनची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज मॅनेजर (एचआरएम), कैया साईट, न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि., पोस्ट कैगा, मार्गे कारवार, उत्तर कर्नाटक जिल्हा, कर्नाटक ५८१४०० या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ७ मार्च २०१४.

भारतीय अर्थ व सांख्यिकी सेवा परीक्षा-२०१४ अंतर्गत ३८ जागा
उमेदवारांनी अर्थशास्त्र, बिझनेस इकोनॉमिक, इकॉनॉमिट्रिक्स, सांख्यिकी, मॅथेमॅटिकल, स्टॅटिस्टिक्स यासारख्या विषयातील पदव्युत्तर पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी. वयोगट २१ ते ३० वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाची ८ ते १४ फेब्रुवारी २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या http://www.upsconline.nic.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १० मार्च २०१४.

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी- हैद्राबाद येथे एक्झिक्युटिव्ह असिस्टंटच्या ९ जागा
अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर अथवा संगणक विज्ञान विषयातील पदवीधारक असायला हवेत आणि त्यांना प्रशासनविषयक कामाचे ज्ञान असायला हवे. वयोमर्यादा ४० वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १८ ते २४ जानेवारी २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली इंडियन ऑफ टेक्नॉलॉजी- हैद्राबादची जाहिरात पाहावी अथवा आयआयटी-हैद्राबादच्या http://www.iith.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील अर्ज दि रजिस्ट्रार, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी- हैद्राबाद, ऑर्डनन्स फॅक्टरी इस्टेट, येड्डुमल्लीपुरम्, जि. मेडक ५०२२०५, आंध्र प्रदेश या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १४ मार्च २०१४.

अंतराळ तंत्रज्ञान विभाग- अहमदाबाद येथे इंजिनीअर्सच्या १२ जागा
अर्जदारांनी संगणक विज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, जिओ-इन्फरमॅटिक्स, भौतिकशास्त्र, गणित, समुद्रशास्त्र, रसायनशास्त्र यासारख्या विषयातील एमएस्सी अथवा एमटेक पदव्युत्तर पात्रता कमीतकमी ६०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी.
वयोमर्यादा ३५ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १५ ते २१ फेब्रुवारी २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली अंतराळ तंत्रज्ञान विभागाची जाहिरात पाहावी अथवा या विभागाच्या http://www.sac.gov.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर (आरएमटी अँड रेव्ह), बिल्डिंग नं. ३०-डी, स्पेस अप्लिकेशन सेंटर, अंबावाडी विस्तार पोस्ट ऑफिस, जोधपूर टेक्वन्स, अहमदाबाद ३८००१५ (गुजरात) या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १८ मार्च २०१४.

Story img Loader