अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत व त्यांनी बॅडमिंटन व टेबल टेनिस यांसारख्या क्रीडा प्रकारात राष्ट्रीय स्तरावर विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावलेली असावी. वयोमर्यादा २६ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १९ ते २५ ऑक्टोबर २०१३च्या अंकात प्रकाशित झालेली अकाऊंटंट जनरल- उत्तराखंड यांची जाहिरात पाहावी अथवा http://www.cag.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशीलासह असणारे अर्ज डेप्युटी अकाऊंटंट जनरल (अ‍ॅडमिन) ऑफिस ऑफ दि प्रिन्सिपल अकाउंटंट जनरल (ए अ‍ॅण्ड ई) ओबेरॉय मोटर्स बिल्डिंग, शाहरणपूर मार्ग, भाजरा, देहराडून- २४८१७१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख
२० नोव्हेंबर २०१३.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अकाऊंटंट जनरल कार्यालय- उत्तर प्रदेश येथे खेळाडूंसाठी १२ जागा
अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत व त्यांनी क्रिकेट, टेबल टेनिस, बॅडमिंटन, फुटबॉल, हॉकी यांसारख्या क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी बजावलेली असावी. वयोमर्यादा २६ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १९ ते २५ ऑक्टोबर २०१३च्या अंकात प्रकाशित झालेली अकाउंटंट जनरल- उत्तर प्रदेश यांची जाहिरात पाहावी अथवा http://www.cag.gov.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व कागदपत्रांसह असणारे अर्ज सीनिअर डेप्युटी अकाउंटंट जनरल (अ‍ॅडमिन) प्रिन्सिपल अकाउंटंट जनरल
(जी अ‍ॅण्ड एसएसए), उत्तर प्रदेश, अलाहाबाद या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २० नोव्हेंबर २०१३.

भाभा अणू संशोधन केंद्रात म्हैसूर येथे टेक्निशियन म्हणून संधी
अर्जदार शालांत परीक्षा उत्तीर्ण असावेत व त्यांनी बॉयलर ऑपरेटरविषयक पात्रता कमीत कमी द्वितीय श्रेणीसह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २५ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १० ते २५ ऑक्टोबर २०१३च्या अंकात प्रकाशित झालेली भाभा अणू संशोधन केंद्राची जाहिरात पाहावी अथवा बीएआरसीच्या http://www.barc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे, भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर-३ भाभा अ‍ॅटॉमिक रिसर्च सेंटर, पोस्ट बॅग नं. ०१, येळवल पोस्ट, म्हैसूर-५६११३० या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २० नोव्हेंबर २०१३.

आयुध निर्माणी- कानपूर येथे कुशल कामगारांसाठी ४७५ जागा
अर्जदार शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेले असावेत व त्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची फिटर, माशिनिस्ट, वेल्डर, इलेट्रोप्लेटर, इलेक्ट्रिशियन, पेंटर, मिलराईट, टर्नर टूल मेकर, ब्लॅक स्मिथ, सुतारकाम यांसारखी पात्रता पूर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३२ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २६ ऑक्टोबर-
१ नोव्हेंबर २०१३च्या अंकात प्रकाशित झालेली आयुध निर्माणी- कानपूरची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि डिमांड ड्राफ्ट असणारे अर्ज दि सीनिअर जनरल मॅनेजर, ऑर्डनन्स फॅक्टरी, काल्पी रोड, कानपूर, (उप्र)- २०८००९ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख
२३ नोव्हेंबर २०१३.
सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ कॉटन रिसर्च- नागपूर  येथे तांत्रिक साहाय्यकांच्या ५ जागा
अर्जदारांनी कृषी-विज्ञान विषयातील पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी. अनुभवी उमेदवारांना प्राधान्य.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २६ ऑक्टोबर-
१ नोव्हेंबर २०१३च्या अंकात प्रकाशित झालेली सेंट्रल रिसर्च ऑफ कॉटन रिसर्चची जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या  http://www.cicr.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज डायरेक्टर, सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ कॉटन रिसर्च, पोस्ट बॅग नं. ०२, शंकरनगर पोस्ट ऑफिस, नागपूर ४४००१० या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख
२४ नोव्हेंबर २०१३.

अकाऊंटंट जनरल कार्यालय- झारखंड येथे खेळाडूंसाठी ६ जागा
अर्जदार पदवीधर असावा व त्यांनी बॅडमिंटन, टेबल टेनिस यांसारख्या क्रीडा प्रकारात राष्ट्रीय स्तरावर विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावलेली असावी. वयोमर्यादा २६ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २५ ऑक्टोबर- १ नोव्हेंबर २०१३च्या अंकात प्रकाशित झालेली अकाउंटंट जनरल- झारखंडची जाहिरात पाहावी अथवा http://www.cag.gov.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि तपशिलासह असणारे अर्ज डेप्युटी अकाउंटंट जनरल (अ‍ॅडमिन), अकाउंटंट जनरल (ए अ‍ॅण्ड ई)- झारखंड दोरांदा, रांची ८३४००२ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २५ नोव्हेंबर २०१३.