अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २३ ते २९ नोव्हेंबरच्या अंकात प्रकाशित झालेली मेडिकल ऑफिसर सिलेक्शन बोर्ड-२०१३ ची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज दि डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल बोर्ड-२०१३, डायरेक्टोरेट जनरल-आयटीबीपी, ब्लॉक-२ सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली- ११०००३ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १७ डिसेंबर २०१३.
रिझव्र्ह बँकेत असिस्टंट मॅनेजर-सिक्युरिटीच्या ३४ जागा :
अर्जदारांनी सैन्य दलात अधिकारी पदावर कमीतकमी पाच वर्षे काम केलेले असावे. या व्यक्ती शारीरिकदृष्टय़ा सक्षम असाव्यात. वयोमर्यादा ४० वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २३ ते २९ नोव्हेंबर २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली रिझव्र्ह बँक ऑफ इंडियाची जाहिरात पाहावी अथवा बँकेच्या http://www.rbi.org.in संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ डिसेंबर २०१३.
डायरेक्टर ऑफ प्लान्ट प्रोटेक्शन- फरिदाबाद येथे संशोधन साहाय्यकांच्या १५ जागा :
अर्जदार कृषी वा कृषी विज्ञान विषयातील पदवीधर असावेत. वयोमर्यादा २५ वर्षे.
अर्जाचा नमुना व इतर तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १६ ते २२ नोव्हेंबर २०१३च्या अंकात प्रकाशित झालेली कर्मचारी निवड आयोग- पश्चिम क्षेत्रची जाहिरात पाहावी. अथवा आयोगाच्या http://www.sscwr.net या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज क्षेत्रीय निर्देशक, कर्मचारी निवड आयोग, पश्चिम क्षेत्र, पहिला मजला, प्रतिष्ठा भवन, १०१, महर्षी कर्वे मार्ग, मुंबई ४०००२० या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २० डिसेंबर २०१३.
भूगर्भ मंत्रालयात संशोधकांच्या ६ जागा :
अर्जदारांनी जिओफिजिक्समध्ये पदव्युत्तर पदवी कमीतकमी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांचा शैक्षणिक आलेख उत्तम असावा. वयोमर्यादा ५० वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ३० नोव्हेंबर – ४ डिसेंबर २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली भूगर्भ मंत्रालयाची जाहिरात पाहावी अथवा मंत्रालयाच्या http://www.moes.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले आणि आवश्यक ते कागदपत्र आणि तपशिलासह असणारे अर्ज डायरेक्टर (एम्प्लॉयमेंट), मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सेस, पृथ्वी भवन, लोधी रोड, नवी दिल्ली ११०००३ या पत्त्यावर रजिस्टर्ड टपालाने पाठविण्याची शेवटची तारीख २० डिसेंबर २०१३.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात कॉन्स्टेबल, ड्रायव्हर, पंप ऑपरेटरच्या ६० जागा :
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण झालेले असावेत. त्याच्याजवळ अवजड वाहन चालविण्याचा परवाना असावा व ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा २६ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ३० नोव्हेंबर- ६ डिसेंबर २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज डीआयजी, सीआयएसएफ- वेस्ट झोन, सीआयएसएफ कॉम्प्लेक्स, सेक्टर ३५, खारघर, नवी मुंबई ४१०२१० या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २१ डिसेंबर २०१३.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा