अर्जदारांनी इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स वा सिव्हिल इंजिनीअरिंगमधील पदवी कमीतकमी ६५% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असावा. अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ९ ते १५ नोव्हेंबर २०१३च्या अंकात प्रकाशित झालेली नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरची जाहिरात पाहावी अथवा सेंटरच्या http://www.nrsc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, रिक्रुटमेंट सेक्शन, नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर, हैद्राबाद ५०००३७ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १० डिसेंबर २०१३.
आयुध निर्माणी-जबलपूर येथे कुशल कामगारांच्या ३४२ जागा :
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण झालेले असावेत व त्यांनी फिटर ग्राइंडर, मशिनिस्ट, मेसन, मिलर, मिलराइट, पेंटर, टर्नर वा वेल्डर यांसारख्या विषयांतील राष्ट्रीय स्तरावरील कौशल्य पात्रता परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १६ ते २२ नोव्हेंबर २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली आयुध निर्माणी- जबलपूरची जाहिरात पाहावी अथवा http://www.vfj.nic.inया संकेतस्थळाला भेट द्यावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज जनरल मॅनेजर, ऑर्डनन्स व्हेईकल फॅक्टरी, जबलपूर (म.प्र.) ४८२००९ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १२ डिसेंबर २०१३.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयात सायंटिस्ट-मायक्रोबायोलॉजी म्हणून १३ जागा :
अर्जदारांनी मायक्रोबायोलॉजी, बॅक्टोरोलॉजी यांसारख्या विषयांतील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण केलेली असावी व त्यांना संबंधित कामाचा ३ वर्षांचा अनुभव असायला हवा. वयोमर्यादा ४५ वर्षे. यासंदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २३ ते २९ नोव्हेंबर २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या http:www.upsconline.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ डिसेंबर २०१३.
‘ओएनजीसी’मध्ये मॅनेजर-एचआरच्या १४ जागा :
अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत व त्यांना सरकारी वा महसूल-राजस्वविषयक कामाचा २ ते ३ वर्षांचा अनुभव असायला हवा. वयोमर्यादा ४४ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २३ ते २९ नोव्हेंबर २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली ऑइल अँड नॅचरल गॅस कॉपरेरेशनची जाहिरात पाहावी अथवा ओएनजीसीच्या http://www.ongcindia.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले, आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे तपशीलवार अर्ज डेप्युटी जनरल मॅनेजर (आयई)-रिक्रुटमेंट ओएनजीसी, ग्रीन हिल्स, ‘बी’ विंग, तेल भवन, देहराडून २४८००३ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १३ डिसेंबर २०१३.
स्टील अॅथॉरिटी ऑफ इंडियामध्ये ज्युनिअर असिस्टंटच्या ८६ जागा :
अर्जदार कमीतकमी ५५% गुणांसह पदवीधर व संगणकविषयक पात्रताधारक असायला हवेत. याशिवाय त्यांच्याजवळ इंग्रजी टंकलेखनाची ४० शब्द प्रतिमिनीट तर हिंदी टंकलेखनाची ३५ शब्द प्रतिमिनीट पात्रता असायला हवी. वयोमर्यादा २८ वर्षे. यासंदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २३ ते २९ नोव्हेंबर २०१३च्या अंकात प्रकाशित झालेली स्टील अॅथॉरिटी ऑफ इंडियाची जाहिरात पाहावी अथवा ‘सेल’ च्या http://www.sail.co.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ डिसेंबर २०१३.
सैन्यदलात नवागत इंजिनीअर्ससाठी ८० जागा :
अर्जदार इंजिनीअरिंग अंतर्गत सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, ऑटोमोबाइल, एरोनॉटिकल, एव्हिएशन, कॉम्पुटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रमेंटेशन, आर्किटेक्चरल, फूड टेक्नॉलॉजी, केमिकल इंजिनीअरिंग, मेटॅलर्जी वा इंडस्ट्रियल इंजिनीअरिंगच्या अंतिम वर्षांचे विद्यार्थी असावेत. त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असावा व ते शारीरिकदृष्टय़ा पात्र असायला हवेत. वयोमर्यादा २७ वर्षे. यासंदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ९ ते १५ नोव्हेंबर २०१३ ज्या अंकात प्रकाशित झालेली सैन्यदलाची जाहिरात पाहावी अथवा सैन्यदलाच्या http://www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ डिसेंबर २०१३.
केंद्र सरकार मुद्रणालय-फरिदाबाद येथे मशिनमन (ऑफसेट)च्या २४ जागा : अर्जदारांनी प्रिंटिंग टेक्नॉलॉजी (ऑफसेट) मधील पदविका पूर्ण केलेली असावी व त्यांना संबंधित कामाचा ५ वर्षांचा अनुभव असायला हवा. वयोमर्यादा २७ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २३ ते २९ नोव्हेंबर २०१३ च्या अंकात प्रकाशित झालेली केंदी्रय सेवा-योजन विभागाची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज दि मॅनेजर, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया प्रेस, एनआयटी, फरिदाबाद (हरियाणा) या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १६ डिसेंबर २०१३.
‘इस्रो’मध्ये प्रशिक्षार्थी इंजिनीअर्सच्या १५ जागा :
अर्जदारांनी इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स वा सिव्हिल इंजिनीअरिंगमधील पदवी कमीतकमी ६५% गुणांसह
First published on: 09-12-2013 at 07:37 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Employment opportunities