नौदल गोदी-मुंबई येथे प्रशिक्षार्थीच्या ३२५ जागा
उमेदवारांनी शालांत परीक्षा ५० टक्के गुणांसह व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची पात्रता कमीतकमी ६५ टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २० वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २० ते २६ सप्टेंबर २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली नौदल गोदी, मुंबईची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज डॉकयार्ड अॅपरेंटिस स्कूल, नेव्हल डॉकयार्ड, मुंबई ४०००२३ या पत्त्यावर १५ ऑक्टोबर २०१४ पर्यंत पाठवावेत.

इन्स्टिटय़ूट ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी, मोहाली येथे सायन्टिस्टच्या ७ जागा
उमेदवारांनी नॅचरल, अॅग्रिकल्चरल वा नॅनो सायन्समधील पदव्युत्तर पदवी अथवा अभियांत्रिकी, तंत्रज्ञान विषयातील पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी. त्यांना संबंधित कामाचा दोन वर्षांचा अनुभव असावा. वयोमर्यादा ३५ वर्षे.
अधिक माहितीसाठी इन्स्टिटय़ूट ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या http://www.inst.ac.in/corcers.html या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज डायरेक्टर, इन्स्टिटय़ूट ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी, हबितात सेंटर, सेक्टर- ६४, फेज-१०, मोहाली १६००६२ (पंजाब) या पत्त्यावर १५ ऑक्टोबर २०१४ पर्यंत पाठवावेत.

संरक्षण मंत्रालयांतर्गत नाशिक रोड येथे कनिष्ठ कारकुनांच्या ३१ जागा
उमेदवार बारावी उत्तीर्ण असावेत. त्यांनी इंग्रजी टंकलेखनाची ३५ शब्द प्रतिमिनीट तर हिंदी टंकलेखनाची ३० शब्द प्रतिमिनीट पात्रता पूर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २५ वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २७ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली संरक्षण मंत्रालय, नाशिक रोडची जाहिरात पाहावी.
संपूर्णपणे भरलेले अर्ज दि कमांडिंग ऑफिसर, आर्टिलरी रेकॉर्डस्, नाशिक रोड कँप, जि. नाशिक- ४२२१०२ या पत्त्यावर १६ ऑक्टोबर २०१४ पर्यंत पाठवावेत.

आयुध निर्माणी- अंबरनाथ येथे कनिष्ठ कारकुनांच्या ७ जागा
अर्जदार बारावी उत्तीर्ण असावेत. त्यांनी इंग्रजी टंकलेखनाची ३५ शब्द प्रतिमिनीट तर हिंदी टंकलेखनाची ३० शब्द प्रतिमिनीट पात्रता पूर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २७ वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २७ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरच्या अंकात प्रकाशित झालेली आयुध निर्माणी, अंबरनाथची जाहिरात पाहावी अथवा आयुध निर्माणीच्या http://www.ofb.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर १६ ऑक्टोबर २०१४ पर्यंत अर्ज करावा.

मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी- अंबरनाथ येथे कनिष्ठ कारकुनांच्या १४ जागा
अर्जदार बारावी उत्तीर्ण असावेत. त्यांनी इंग्रजी टंकलेखनाची ३५ शब्द प्रतिमिनीट तर हिंदी टंकलेखनाची ३० शब्द प्रतिमिनीट पात्रता पूर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २७ वर्षे.
अर्जाच्या तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २७ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली मशीन टूल प्रोटोटाईप फॅक्टरीची जाहिरात पाहावी अथवा फॅक्टरीच्या http://www.ofbindia.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज जनरल मॅनेजर, मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी, अंबरनाथ (जि. ठाणे) ४२१५०२ या पत्त्यावर  १७ ऑक्टोबर २०१४ पर्यंत अर्ज करावेत.

‘डीआरडीओ’मध्ये सीनिअर टेक्निकल असिस्टंटच्या ४१९ जागा
उमेदवारांनी अभियांत्रिकीमधील पदविका अथवा बीएस्सी पदवी उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २८ वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २७ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ)ची जाहिरात पाहावी अथवा  http://www.drdo.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर १७ ऑक्टोबर २०१४ पर्यंत अर्ज करावेत.