सांस्कृतिक मंत्रालयात अर्काईव्हल असिस्टंटच्या २४ जागा
अर्जदार आधुनिक भारताचा इतिहास यासारख्या विषयातील पदव्युत्तर पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण असावेत. त्यांनी ‘अर्काईव्हज व रेकॉर्डस् मॅनेजमेंट’ विषयातील पात्रता पूर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ४० वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १३ ते १९ सप्टेंबर २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली सांस्कृतिक मंत्रालयाची जाहिरात पाहावी.
संपूर्णपणे भरलेले अर्ज ‘डायरेक्टर, जनरल ऑफ नॅशनल आर्काईव्हज ऑफ इंडिया, जनपथ, नवी दिल्ली ११० ००१ या पत्त्यावर ७ ऑक्टोबर २०१४ पर्यंत पाठवावेत.

स्टील अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये ऑपरेटर कम टेक्निशियन ट्रेनीजच्या १५४ जागा  
अर्जदार मेटॅलर्जी, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स, केमिकल इंजिनीअरिंगमधील पदविकाधारक असावेत.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १३ ते १९ सप्टेंबर २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाची जाहिरात पाहावी अथवा ‘सेल’च्या http://www.sail.co.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर ८ ऑक्टोबर २०१४ पर्यंत पाठवावेत.

इंडो-तिबेटन सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबलच्या ४९७ जागा
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची मॅसन, सुतारकाम, प्लंबर वा इलेक्ट्रिशियन यासारखी पात्रताधारक असावेत. त्यांना संबंधित कामाचा एक वर्षांचा अनुभव असावा. वयोमर्यादा २३ वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १३ ते १९ सप्टेंबर २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली इंडो-तिबेट सीमा सुरक्षा दलाची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज दि इन्स्पेक्टर जनरल (सेंट्रल)-फ्रंटियर, आयटीबी पॉलिस, प्लॉट नं. १६३-१६४, (ई-८), त्रिलोचननगर, पोस्ट त्रिलंगा, भोपाळ (मप्र) ४६२०३९ या पत्त्यावर ९ ऑक्टोबर २०१४ पर्यंत पाठवावेत.

आर्मड् फोर्सेस मेडिकल कॉलेज- पुणे येथे लेबॉरेटरी असिस्टंटच्या ६ जागा  
उमेदवार शालान्त परीक्षा उत्तीर्ण असावेत. त्यांना प्रयोगशाळाविषयक कामाचा एक वर्षांचा अनुभव असावा. वयोमर्यादा २७ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २३ ते २९ सप्टेंबर २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली एएफएमसी- पुणेची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र असणारे अर्ज दि कमांडंट, आर्मड् फोर्सेस मेडिकल कॉलेज, पुणे-सोलापूर मार्ग, पुणे- ४११०४० या पत्त्यावर १० ऑक्टोबर २०१४ पर्यंत पाठवावेत.

ब्रेथवाईट कंपनीमध्ये कारकुनांच्या २० जागा
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण असावेत. त्यांना संगणकाचे ज्ञान असावे. वयोमर्यादा ३० वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २३ ते २९ ऑगस्ट २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली सार्वजनिक क्षेत्रातील आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीतील ब्रेथवाईट अॅण्ड कंपनीची जाहिरात पाहावी.
संपूर्ण भरलेले अर्ज सीनिअर मॅनेजर (पीएएस) ब्रेथवाईट अॅण्ड कं. लि., ५, हाईड रोड, कोलकोता ७०००४३ या पत्त्यावर १० ऑक्टोबर २०१४ पर्यंत पाठवावेत.

 नौदलाच्या दक्षिण विभाग मुख्यालयात ड्राफ्टस्मनच्या ४०३ जागा
उमेदवार सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, शिप कन्स्ट्रक्शन वा नेव्हल आर्किटेक्चर विषयातील पदविकाधारक असावेत.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ९ ते १५ ऑगस्ट २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली नौदलाची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज दि फ्लॅग ऑफिसर- कमांडिंग इन चीफ, हेडक्वॉर्टर्स- सदर्न नेव्हल कमांड, कोची- ४, केरळ येथे १० ऑक्टोबर २०१४ पर्यंत पाठवावेत.   

Story img Loader