प्रादेशिक सेनेत अधिकारी म्हणून संधी
अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावा. तो सेवारत असून शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवा. वयोमर्यादा ४२ वर्षे. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १३ ते १९ डिसेंबर २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली प्रादेशिक सेवेची जाहिरात पाहावी. महाराष्ट्रातील उमेदवारांनी आपले अर्ज ‘कमांडर, टेरिटोरियल आर्मी हेडक्वॉर्टर्स, सदर्न कमांड, पुणे- ४११००१’ या पत्त्यावर ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत पाठवावेत.

भारतीय हवाई दलात  महिलांना संधी
अर्जदार महिलांनी कुठल्याही विषयातील पदवी परीक्षा किमान ६० टक्के गुणांनी उत्तीर्ण केलेली असावी. त्या शारीरिकदृष्टय़ा सक्षम असाव्यात. वयोमर्यादा २४ वर्षे. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ६ ते १२ डिसेंबर २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली भारतीय हवाई दलाची जाहिरात पाहावी अथवा हवाई दलाच्या http://www.careerairforce.nic.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने या संकेतस्थळावर १ जानेवारी २०१५ पर्यंत अर्ज करावा.

संरक्षण उत्पादन विभागात वरिष्ठ संशोधन अधिकाऱ्यांच्या १८ जागा
अर्हता- मेकॅनिकल वा इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचे पदवीधर, उत्पादनविषयक कामाचा दोन वर्षांचा अनुभव. वयोमर्यादा ३५ वर्षे.
‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १३ ते १९ डिसेंबर २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या http://www.upsconline.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. या संकेतस्थळावर १ जानेवारी २०१५ पर्यंत अर्ज करावा.

भारतीय हवाई दलात वैमानिक म्हणून संधी
अर्हता- अभियांत्रिकी अथवा कुठल्याही विषयातील पदवीधर, शारीरिकदृष्टय़ा सक्षम. वयोमर्यादा
२४ वर्षे. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ६ ते १२ डिसेंबर २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली भारतीय हवाई दलाची जाहिरात पाहावी. हवाई दलाच्या http://www.careerairforce.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. या संकेतस्थळावर १ जानेवारी २०१५ पर्यंत अर्ज करावा.

डिफेन्स फूड रिसर्च लेबॉरेटरी, म्हैसूर येथे रिसर्च फेलोच्या ३ जागा
अर्हता- फूड सायन्स वा फूड टेक्नॉलॉजी यांसारख्या विषयातील एमएस्सी परीक्षा प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण.  वयोमर्यादा २८ वर्षे.
‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १३ ते १९ डिसेंबर २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली डिफेन्स फूड रिसर्च लेबॉरेटरी, म्हैसूरची जाहिरात पाहावी. अर्ज ‘डायरेक्टर, डिफेन्स फूड रिसर्च लेबॉरेटरी, सिद्धार्थनगर, म्हैसूर ५७००११’ या पत्त्यावर २ जानेवारी २०१५ पर्यंत पाठवावेत.

‘एमएसटीसी’मध्ये ज्युनिअर कॉम्प्युटर असिस्टंटच्या १५ जागा
अर्हता- कुठल्याही विषयातील पदवीधर, संगणक विषयातील पदविका उत्तीर्ण. वयोमर्यादा ३५ वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १३ ते १९ डिसेंबर २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली ‘एमएसटीसी’ची जाहिरात पाहावी अथवा ‘एमएसटीसी’च्या http://www.mstcindia.co.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. या संकेतस्थळावर २ जानेवारी २०१५ अर्ज करावा.

नौदलात बारावी उत्तीर्णासाठी संधी  
अर्हता- बारावीची परीक्षा गणित व भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र, जीवशास्त्र व संगणक विज्ञान यासारख्या विषयांसह उत्तीर्ण.  गुणांची टक्केवारी किमान ६० टक्के.  शारीरिकदृष्टय़ा सक्षम. वयोमर्यादा २० वर्षे.
‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १३ ते १९ डिसेंबर २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली भारतीय नौदलाची जाहिरात पाहावी अथवा नौदलाच्या http://www.nausena.bharti.nic.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी. या संकेतस्थळावर २ जानेवारी २०१५ पर्यंत अर्ज करावा.

केंद्र सरकारच्या आरोग्य सेवा योजनेत फार्मसिस्टच्या १३ जागा
अर्हता- बारावीची परीक्षा विज्ञान विषयांसह उत्तीर्ण. फार्मसी विषयातील पदविका प्राप्त असावी. फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाकडे पंजीकरण झालेले असावे. वयोमर्यादा ३० वर्षे.
‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १३ ते १९ डिसेंबर २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली संबंधित जाहिरात पाहावी.
अर्ज  ‘दि अ‍ॅडिशनल डायरेक्टर, सेंट्रल गव्हर्नमेन्ट हेल्थ स्कीम, बी-११४/११५, विभूती खंड, गोमती नगर, लखनऊ- २२६०१०’ या पत्त्यावर ३ जानेवारी २०१५ पर्यंत पाठवावेत.

सेंट्रल ऑर्डनन्स डेपो-मुंबई येथे सुपरिंटेंडेंट- स्टोर्सच्या ६ जागा
अर्हता- अभियांत्रिकीमधील पदविकाधारक व मटेरियल्स मॅनेजमेंटमध्ये पात्रताधारक असावेत. वयोमर्यादा २७ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १३ ते १९ डिसेंबर २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली सेंट्रल ऑर्डनन्स डेपो- मुंबईची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज ‘कमांडंट, सेंट्रल ऑर्डनन्स डेपो, आकुर्डी क्रॉस रोड नं. ३, कांदिवली (पूर्व), मुंबई- ४००१०१’ या पत्त्यावर ४ जानेवारी २०१५ पर्यंत पाठवावेत.    

Story img Loader