navi-kshitijeदिल्ली कँटोनमेंट बोर्डात कनिष्ठ कारकुनांच्या ११ जागा
उमेदवार बारावी उत्तीर्ण असावेत. त्यांनी इंग्रजी टंकलेखनाची ३५ शब्द प्रति मिनिट तर हिंदी टंकलेखनाची ३० शब्द  प्रति मिनिट पात्रता पूर्ण केलेली असावी. संगणकाचे ज्ञान आवश्यक.
अधिक माहिती व अर्जाच्या नमुन्यासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २२ ते २८ नोव्हेंबर २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली दिल्ली कँटोनमेंट बोर्डाची जाहिरात पाहावी अथवा http://www.cbdelhi.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज‘दि सीईओ, दिल्ली कँटोनमेंट बोर्ड, दिल्ली कँट- ११००१०’ या पत्त्यावर १५ डिसेंबर २०१४ पर्यंत पाठवावेत.

पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनमध्ये ज्युनिअर अकाऊंटंटच्या ६ जागा
उमेदवार ६० टक्के गुणांसह बीकॉम अथवा ५० टक्के गुणांसह एमकॉम झालेले असावेत. अकाऊंट्सविषयक कामाचा पाच वर्षांचा अनुभव असावा. वयोमर्यादा ३४ वर्षे. अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २९ नोव्हेंबर – ५ डिसेंबर २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली जाहिरात पाहावी अथवा http://www.pfcindia.com (करिअर पेज) संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर १५ डिसेंबर २०१४ पर्यंत अर्ज करावेत.

आयुध निर्माणी, अंबाझरी- नागपूर येथे कनिष्ठ कारकुनांच्या १० जागा
अधिक माहितीसाठी व अर्जाच्या नमुन्यासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २२ ते २८ नोव्हेंबर २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली आयुध निर्माणीची जाहिरात पाहावी अथवा आयुध निर्माणीच्या http://www.ofbindia.gov.in अथवा http://www.ofajadmin.com या संकेतस्थळांना भेट द्यावी. अर्ज वरील संकेतस्थळावर संगणकीय पद्धतीने १६ डिसेंबर २०१४ पर्यंत पाठवावेत.

नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल- खासगी सचिव पदाच्या ११ जागा
अर्जदार पदवीधर असावेत. त्यांच्याजवळ लघुलेखनाची १०० शब्द प्रति मिनिट तर टंकलेखनाची ४० शब्द प्रति मिनिट पात्रता असावी. संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे. कायदा विषयातील पदवीधरांना प्राधान्य. वयोमर्यादा ४० वर्षे.  अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २९ नोव्हेंबर – ५ डिसेंबर २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली नॅशनल ग्रीन ट्रायब्युनलची जाहिरात पाहावी अथवा ट्रायब्युनलच्या http://www.greentribunal.gov.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी.  अर्ज ‘रजिस्ट्रार जनरल, नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल, फरिदकोट हाऊस, कोपर्निकस मार्ग, नवी दिल्ली – ११०००१’ या पत्त्यावर २० डिसेंबर २०१४ पर्यंत पाठवावेत.

मध्य-पूर्व रेल्वेमध्ये स्काऊट आणि गाईडस्च्या ४ जागा
अर्जदार शालांत परीक्षा उत्तीर्ण असावेत. त्यांनी स्काऊटस् व गाईडस्मध्ये राष्ट्रीय स्तरावर विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावलेली असावी. वयोमर्यादा ३० वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २२ ते २८ नोव्हेंबर २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली मध्य-पूर्व रेल्वेची जाहिरात पाहावी. अर्ज सीनिअर पसरेनेल ऑफिसर- रिक्रुटमेंट, ईसी रेल्वे, हेडक्वार्टर ऑफिस, हाजीपूर, जि. वैशाली (बिहार)- ८४४१०१ या पत्त्यावर
२२ डिसेंबर २०१४ पर्यंत पाठवावेत.

इन्स्टिटय़ूट ऑफ मिनरल अँड मटेरियल्समध्ये साहाय्यकांच्या ३ जागा
अर्जदार पदवीधर असावेत. त्यांना संगणकाचे ज्ञान असावे. वयोमर्यादा २८ वर्षे.  तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २२-२८ नोव्हेंबर २०१४ च्या अंकातील जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या http://www.immt.res.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज ‘अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, सीएसआयआर- इन्स्टिटय़ूट ऑफ मिनरल्स अँड मटेरियल्स टेक्नॉलॉजी, भुवनेश्वर- ७५१०१३ (ओदिशा)’ या पत्त्यावर २२ डिसेंबर २०१४ पर्यंत पाठवावेत.

Story img Loader