navi-kshitijeनॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ, अहमदाबाद येथे टेक्निशियनच्या ५ जागा :
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण आणि प्रयोगशाळाविषयक पात्रताधारक असावेत. वयोमर्यादा २८ वर्षे.
अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १ ते ७ नोव्हेंबर २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ, अहमदाबादची जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या http://www.icmr.nic.in अथवा  http://www.nioh.org  या संकेतस्थळांना भेट द्यावी.
संपूर्णपणे भरलेले अर्ज डायरेक्टर, नॅशनल इन्स्टिटय़ूट  ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ, मेघानीनगर, अहमदाबाद- ३८००१६ (गुजरात) या पत्त्यावर २ डिसेंबर २०१४ पर्यंत पाठवावेत.

इंडियन ऑईलमध्ये रिसर्च ऑफिसर (केमिकल्स)च्या ७ जागा
उमेदवारांनी केमिकल इंजिनीअिरगमधील पदव्युत्तर पदवी परीक्षा कमीत कमी ६५ टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २८ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १ ते ७ नोव्हेंबर २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली इंडियन ऑईलची जाहिरात पाहावी अथवा इंडियन ऑईलच्या http://iocl.com/download/Recruitment Research Devlopment 2014 pdf  या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज साध्या टपालाने इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड, आर अॅण्ड डी सेंटर, पोस्ट
बॉक्स नं. ७२०, एस्कॉर्ट नगर पोस्ट ऑफिस, फरिदाबाद- १२१००७ या पत्त्यावर ५ डिसेंबर २०१५ पर्यंत पाठवावेत.

सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिटय़ूटमध्ये संशोधकांच्या १२ जागा :
संपूर्ण माहितीसाठी  ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १५ ते २१ नोव्हेंबरच्या अंकात प्रकाशित झालेली सेंट्रल
रोड रिसर्च इन्स्टिटय़ूट, दिल्लीची जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या http://www.crridom.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र असणारे अर्ज कंट्रोलर ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन, सीएसआयआर-सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिटय़ूट,
दिल्ली- मथुरा रोड, पोस्ट-सीआरआरआय, नवी दिल्ली- ११००२५ या पत्त्यावर ७ डिसेंबर २०१४ पर्यंत पाठवावेत.

दक्षिण-पूर्व रेल्वेमध्ये खेळाडूंसाठी २१ जागा
अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत. त्यांनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावलेली असावी. वयोमर्यादा २५ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ८ ते १४ नोव्हेंबर २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली दक्षिण-पूर्व रेल्वेची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज असिस्टंट पर्सोनेल ऑफिसर (रिक्रूटमेंट), साऊथ ईस्टर्न रेल्वे, ११, मार्डन रिच रोड, कोलकाता-७०००४३ या पत्त्यावर ८ डिसेंबर २०१४ पर्यंत पाठवावेत.    

Story img Loader