अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत व त्यांनी क्रिकेट, टेबलटेनिस, व्हॉलिबॉल, हॉकी वा फुटबॉल यांसारख्या क्रीडा प्रकारात राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावलेली असावी. वयोमर्यादा २५ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ८ ते १४ फेब्रुवारी २०१४च्या अंकात प्रकाशित झालेली आयकर विभाग-चेन्नईची जाहिरात पहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज जॉइंट कमिश्नर ऑफ इन्कमटॅक्स, आयकर भवन, १२१, म. गांधी रोड, नुनगंवक्कम, चेन्नई ६०००३४ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २४ फेब्रुवारी २०१४.
भाभा अणू-संशोधन केंद्र-म्हैसूर येथे कुशल कामगारांसाठी ९ जागा
अर्जदार शालांत परीक्षा उत्तीर्ण व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत.
वयोमर्यादा २६ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २५ ते ३१ जानेवारी २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली भाभा अणू-संशोधन केंद्राची जाहिरात पहावी.
संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर-३, भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटर, पोस्ट बॅग नं. ०१, येलवल पोस्ट, म्हैसूर ५७११३० (कर्नाटक) या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २५ फेब्रुवारी २०१४.
चंदिगढ प्रशासनात असिस्टंट इंजिनीअर- सिव्हिलच्या १५ जागा
अर्जदार सिव्हिल इंजिनीअरिंगमधील पदवीधर असावेत. वयोमर्यादा ३० वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ८ ते १४ फेब्रुवारी २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पहावी अथवा आयोगाच्या http://www.upsconline.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ फेब्रुवारी २०१४.
केंद्रीय भूजल विभाग- गुवाहाटी येथे कुशल कामगारांसाठी ७ जागा
अर्जदार शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेले असावेत व त्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची वेल्डर वा मेकॅनिक विषयक पात्रता पूर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २७ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ८ ते १४ फेब्रुवारी २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय भूजल विभागाची जाहिरात पहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज रिजनल डायरेक्टर, सेंट्रल ग्राऊंड वॉटर बोर्ड, नॉर्थ ईस्टर्न रिजन, बेटखुची- आयएसटीबी, गुवाहाटी ७८१ ०३५ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १ मार्च २०१४.
संरक्षण मंत्रालयात ‘डीआरडीओ’ नगर येथे ज्युनिअर रिसर्च फेलोशिपच्या १३ जागा
अर्जदारांनी मेकॅनिकल वा टेलिकॉम इंजिनीअरिंगमधील पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांना संशोधनपर कामात रुची असायला हवी. वयोमर्यादा २८ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली ‘डीआरडीओ’ नगरची जाहिरात पहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज डायरेक्टर, व्हीआयडीई, वाहननगर पोस्ट ऑफिस, नगर-अहमदनगर ४१४००६ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १ मार्च २०१४.
सैन्य दलात महिला पदवीधर इंजिनीअर्ससाठी १९ जागा
अर्जदार महिलांनी सिव्हिल, आर्किटेक्चरल, मेकॅनिकल, प्रॉडक्शन, ऑटोमोबाईल, एरोनॉटिकल, मेटॅलर्जिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, बायो-टेक्नॉलॉजी, इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजीमधील पदवी उत्तीर्ण केलेली असावी व त्या शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हव्यात. वयोगट २० ते २७ वर्षे.
यासंदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २५ ते ३१ जानेवारी २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली सैन्य दलाच्या तांत्रिक विभागाची जाहिरात पहावी अथवा सैन्य दलाच्या http://www.joinindianarmy.nic.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ मार्च २०१४.
सैन्य दलात तांत्रिक विभागात इंजिनीअर्ससाठी १०० जागा
अर्जदारांनी सिव्हिल, आर्किटेक्चरल, मेकॅनिकल, प्रॉडक्शन, ऑटोमोबाइल, एरोनॉटिकल, मेटॅलर्जिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, बायो-टेक्नॉलॉजी, इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजीमधील पदवी परीक्षा चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी व ते शारीरिकदृष्टय़ा पात्र असायला हवेत. वयोमर्यादा २६ वर्षे.
अर्जाचा नमुना, अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २५ ते ३१ जानेवारीच्या २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली सैन्य दलाची तांत्रिक विभागाची जाहिरात पहावी अथवा सैन्य दलाच्या http://www.joinindianarmy.nic.in  या संकेतस्थळाला भेट देऊन संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर ३ मार्च २०१४ पर्यंत अर्ज करावेत.