उमेदवारांनी बीएस्सी पदवी भौतिकशास्त्र, गणित व रसायनशास्त्र हे विषय घेऊन व कमीत कमी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २५ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेन्ट न्यूज’च्या २५ ते ३१ जानेवारी २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशनची जाहिरात पाहावी अथवा कॉर्पोरेशनच्या http://www.npcil.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज- दी मॅनेजर (एचआरएम), नरोरा अ‍ॅटोमिक पॉवर स्टेशन, पोस्ट एसएपीएम टाऊनशिप, नरोरा, जि. बुलंदशहर, उ.प्र. या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २० फेब्रुवारी २०१४.
वायुदलात खेळाडूंसाठी संधी
अर्जदार बारावी उत्तीर्ण असावेत व त्यांनी अ‍ॅथलेटिक, फुटबॉल, व्हॉलीबॉल, नेमबाजी, भारोत्तोलन, बास्केटबॉल, क्रिकेट, कबड्डी, वॉटरपोलो, मुष्टियुद्ध, हॉकी, लॉन टेनिस वा पोहणे यांसारख्या क्रीडा प्रकारात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष कामगिरी बजावलेली असावी. वयोमर्यादा २१ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २५ ते ३१ जानेवारी २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली वायुदलाची खेळाडूविषयक जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज सेक्रेटरी, एअरफोर्स स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड्स, ४१२, एअरफोर्स स्टेशन, रेसकोर्स, नवी दिल्ली ११० ००३ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २१ फेब्रुवारी २०१४.
आयुध निर्माणीत कुशल कामगारांसाठी ३० जागा
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. वयोमर्यादा ३२ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २५ ते ३१ जानेवारी २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली आयुध निर्माणीची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि पोस्टल ऑर्डरसह असणारे अर्ज- जनरल मॅनेजर, इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरीज, त्रिचरापल्ली ६२० ०१६ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २२ फेब्रुवारी २०१४.    

Story img Loader