डिफेन्स साइन्टिफिक इन्फर्मेशन अ‍ॅण्ड डॉक्युमेंटेशन सेंटर, दिल्ली येथील २ फेलोशिप्स – अर्जदारांनी विज्ञान, माहिती तंत्रज्ञान, संगणकशास्त्र यासारख्या विषयांतील पदव्युत्तर पदवी कमीत कमी प्रथमश्रेणीसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी, ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १७ ते २३ नोव्हेंबर २०१२ च्या अंकात प्रकाशित झालेली डिफेन्स साइन्टिफिक इन्फर्मेशन अ‍ॅण्ड डॉक्युमेंटेशन सेंटरची जाहिरात पहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज डायरेक्टर, डिफेन्स साइन्टिफिक इन्फर्मेशन अ‍ॅण्ड डॉक्युमेंटेशन सेंटर, डीआरडीओ मेटकॅप हाऊस, दिल्ली ११००५४ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ६ डिसेंबर २०१२.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इन्स्ट्रमेंटस् रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट देहराडून येथील ५ संशोधनपर फेलोशिप्स –
अर्जदारांनी भौतिकशास्त्र, अप्लाईड फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, लेसर टेक्नॉलॉजी यासारख्या विषयांत एमएस्सी किंवा इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड कम्युनिकेशनमध्ये बीई/ बीटेक केलेले असावे. एमटेक पात्रताधारकांना प्राधान्य देण्यात येईल. वयोमर्यादा २८ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १७ ते २३ नोव्हेंबर २०१२ च्या अंकात प्रकाशित झालेली  इन्स्ट्रमेंटस् रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटची जाहिरात पहावी.
तपशीलवार व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज डायरेक्टर, इन्स्ट्रमेंटस् रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट, रायपूर रोड, देहराडून २४८००८ (उत्तराखंड) या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ७ डिसेंबर २०१२.

कामगार राज्य विमा रुग्णालयात परिचारिकांच्या ३० जागा  – अर्जदारांनी बीएस्सी (नर्सिग) व मिडवाईफरी पात्रता पूर्ण केलेली असावी व त्यांची राष्ट्रीय नर्सिग कौन्सिलमध्ये नोंदणी झालेली असावी.
वयोमर्यादा, वेतनश्रेणी, अर्जाचा नमुना, अधिक माहिती व तपशिलासाठी ईएसआय पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस, कोलकाताच्या दूरध्वनी क्र. ०३३-२४६७२७९५ वर संपर्क साधावा अथवा इन्स्टिटय़ूटच्या http://www.esicwestbangal.org   या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ डिसेंबर २०१२.

ट्रायबल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनमध्ये ज्युनिअर कमर्शियल असिस्टंटच्या ४१ जागा – आवश्यक शैक्षणिकपात्रता, वयोमर्यादा, अर्जाचा नमुना व इतर तपशिलासाठी ‘ट्रायफेड’च्या http://www.tribesindia.com या संकेतस्थळावर भेट द्यावी. अथवा ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १७ ते २३ नोव्हेंबर २०१२ च्या अंकात प्रकाशित झालेली ‘ट्रायफेड’ची जाहिरात पहावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख  १७ डिसेंबर २०१२.

सीमा सुरक्षा दलात स्टेनोग्राफर्सच्या ८२ जागा – अर्जदार बारावी उत्तीर्ण असावेत अथवा त्यांनी शालान्त परीक्षा उत्तीर्ण केल्यावर सेक्रेटरियल वा कमर्शियस प्रॅक्टिसेस् विषयातील पदविका उत्तीर्ण केलेली असावी व ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा २५ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ३ ते ९ नोव्हेंबर २०१२ च्या अंकात प्रकाशित झालेली सीमा सुरक्षा दलाची जाहिरात पाहावी अथवा दलाच्या http://www.bsf.nic.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ डिसेंबर २०१२.

केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवालयात असिस्टंट टेक्निकल ऑफिसर्सच्या ८ जागा –
अर्जदारांनी फोटोग्राफी, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, एरोनॉटिकल इंजीनिअरिंग यासारख्या विषयातील पदवी परीक्षा चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा ३० वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १० ते १६ नोव्हेंबर २०१२ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवालयाची जाहिरात पहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज असिस्टंट डायरेक्टर (पर्स-ए), पोस्ट बॅग नं. ३००३, लोधी रोड, नवी दिल्ली ११०००३ या पत्त्यावर साध्या टपालाने पाठविण्याची शेवटची तारीख १० डिसेंबर २०१२.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Employment opportunity