अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत. त्यांना संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. पोलीस वा संरक्षण दलातील कामाचा पाच वर्षांचा अनुभव असायला हवा. वयोमर्यादा २५ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी http://www.unionbankofindia.co.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, अथवा ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १९ ते २५ एप्रिल २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली युनियन बँक ऑफ इंडियाची
जाहिरात पाहावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ मे २०१४.
केंद्रीय भू-जल विभागात टेक्निकल ऑपरेटरच्या १४ जागा
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची ऑटो मेकॅनिक वा डिझेल मेकॅनिकची पात्रताधारक असावेत. वयोमर्यादा २७ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ५ ते ११ एप्रिल २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय भूजल विभाग जम्मूची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि तपशिलासह असणारे अर्ज दि रिजनल डायरेक्टर, सेंट्रल ग्राऊंड वॉटर बोर्ड, नॉर्थ वेस्टर्न हिमालयन रिजन, शास्त्री नगर, जम्मू २९८२९९ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ६ मे २०१४.
सेंट्रल प्रूफ एस्टॅब्लिशमेंट-इटारसी येथे कुशल कामगारांच्या ११ जागा
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पात्रताधारक व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा २७ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १२ ते १८ एप्रिल २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली सेंट्रल प्रूफ एस्टॅब्लिशमेंट-इटारसीची जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि तपशिलासह असणारे अर्ज दि कमांडंट, सेंट्रल प्रूफ एस्टॅब्लिशमेंट (डीजीक्यूए), इटारसी ४६१११४ (मध्य प्रदेश) या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख
६ मे २०१४.
संरक्षण मंत्रालयात जबलपूर येथे तांत्रिक कामगारांसाठी संधी
अर्जदारांनी शालान्त परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी व ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा २७ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी संरक्षण मंत्रालय जबलपूरची ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १२ ते १८ एप्रिल २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि तपशिलासह असणारे अर्ज दि कमांडंट, क्यूए अँड प्रूफ, सीनिअर क्वालिटी अॅशुरन्स एस्टॅब्लिशमेंट (आर्यामेंटस्) अँड एलपीआर, खमारिया, जबलपूर ४८२ ००५ (मप्र) या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ६ मे २०१४.
संरक्षण मंत्रालयांतर्गत त्रिचरापल्ली येथे फायरमनच्या १० जागा
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व अग्निशमनविषयक पात्रताधारक असायला हवेत. वयोमर्यादा २५ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी संरक्षण मंत्रालय, त्रिचरापल्लीची ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १९ ते २५ एप्रिल २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे अर्ज दि जनरल मॅनेजमेंट, हेवी अलॉय पिनेट्रेटर प्रोजेक्ट, त्रिचरापल्ली ६२० ०२५ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ६ मे २०१४.
इंडियन ऑईलमध्ये कायदा अधिकारी
उमेदवारांनी कायदा विषयातील पदवी कमीतकमी ६०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांना संबंधित कामाचा दोन वर्षांचा अनुभव असायला हवा.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ८ ते १४ मार्च २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली इंडियन ऑईलची जाहिरात पाहावी अथवा इंडियन ऑईलच्या http://www.iocl.com किंवा http://www.dat.ac.in या संकेतस्थळांना भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ मे २०१४.